बोलणे आणि करणे


बोलणे आणि करणे! आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो. बऱ्याच कल्पना मांडत असतो. अनेक चुका दिसतात त्या दाखवत देखील असतो. परंतु अनेकदा आपण स्वतः त्याचे पालन करतो का हे पाहायचे विसरतो. खरं तर एक गोष्ट आठवते. मला जे सांगायचे ते त्या गोष्टीचे सार आहे.

एकदा एक बाई आपल्या मुलाला घेऊन रामदास स्वामींकडे गेली. त्यांच्यापुढे मुलाला गुळ फार आवडतो. आणि तो सारखा तेच खात असतो. काही सांगून देखील तो ऐकत नाही. असे सांगू लागली. रामदास स्वामींनी बाईंचे म्हणणे ऐकून घेतले व पुन्हा काही दिवसांनी येण्यास सांगितले.

काही दिवसांनी पुन्हा ती बाई मुलाला सोबत घेऊन त्यांच्याकडे गेली. रामदास स्वामींनी त्या मुलाकडे पाहून म्हणाले, बाळा गुळ कमी खात जा! हे पाहून बाईचा पारा चढला. बाई स्वामींना म्हणाल्या हे एवढंच म्हणायचं होत तर ते त्या दिवशी का नाही म्हटलं?

त्यावर रामदास स्वामी म्हणाले, त्या दिवशी यासाठी मी म्हणू शकत नव्हतो कारण मी ही तेच करत होतो. आधी त्या योग्यतेचा होण्यासाठी काही दिवस घेतले.

हेच मलाही म्हणायचे आहे. बोलण्याआधी आपण बोलण्यायोग्य बनुया! बोलणे आणि करणे यात अंतर नको.

, ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.