बोलण आणि करणं


बोलण आणि करणं! आज सकाळी नऊची लोकल हुकली. खर तर चूक माझीच होती. मी उठलो होतो, ७:४५ ला पण पुन्हा झोपलो. आणि मग जाग आली ८:२० ला. मागच्या दोन – तीन दिवसांपासून रोजच देवपूजा आणि अथर्वशीर्ष होताच नाही आहे. आणि माझा रोज रात्री झोपताना मी हाच विचार करतो कि उद्या सकाळी लवकर उठायचं. पण होताच नाही उठण. खरच आपण जे ठरवतो आणि करतो यात किती फरक पडत असतो. याचा असा कधी मी विचारच केला नव्हता. माझी आई नेहमी म्हणत असते कि ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’. आंपण जे बोलतो आणि ठरवतो यावर आपण चालव असा आईचा दंडक. वडील कोणतीही गोष्ट आधी बोलत नाहीत करून दाखवतात. आणि उरलो मी जो फ़क़्त ठरवतो करत नाही अस नाही पण ते कधी कधी.

मला अकरावी बारावीत असताना शेतकरी व्हाव अस नेहमी वाटायचं. दहावीच्या परीक्षेनंतर मी आमच्या शेतात जावून २० खड्डे खणले होते. आणि तिथे चिंचेची रोपे पण लावली होती. आता ती खूप मोठी झाली आहेत. संगणकाचा कोर्स करत असताना मला नेहमी एखादा तरी व्हायरस बनवावा अस वाटे. कधी कधी एखाद्याचा इमेल आयडी ह्याक करावा वाटे. असो त्यात मी यशस्वी झालो. एकदा माझ्या एका मित्राच्या मदत म्हणून मी त्याला एका मुलीचा इमेल आयडी साठी तिच्या मित्राचा रेडीफमेल ह्याक केला होता. त्यानंतर तर सवयच लागल्यासारखे झाले होते. माझ बघून आमचे छोटे बंधुराज तर, माझ्याही एक पाऊल पुढे.

त्याने तर ह्याकिंगची स्वाफ्टवेअर घेवून ह्याक कसे करायचे. आणि आपण पकडलो जातोय हे कसे समजायचे. याचे प्रात्यक्षिकच दाखवले होते. नंतर एखादा तरी चांगला प्रोग्राम बनवावा अस वाटे. तर त्यावेळी मी पंचांगातील गुणमेलन कोष्टक बनवले होते. मुलाच नावातील पाहिलं अक्षर आणि मुलीच्या नावातील पाहिलं अक्षर टाकल कि त्यांची रास नक्षत्र आणि दोघांचे गुण यायचे. त्यावेळी व्हीबी चालायचे. त्यात तो प्रोग्राम केला होता.

वडिलांना तो प्रोग्राम आवडला होता. सुरवातीच्या माझ्या पहिल्या नोकरीत मी नेहमी ल्यानमध्ये बसून माझ्या मित्राच्या संगणकावरील विनम्याप मधील गाणी बदलायचो. आणि तो विचार करायचा कि गाणी आपोआप कशी बदलली जातात. कधी कधी व्हायरस अलर्टचे मेसेज पाठवून इतरांना घाबरून द्यायचो. असो, ते त्यावेळची मस्ती. पण न मागच्या काही दिवसांपासून अस ठरवलेलं पूर्ण होताच नाही. जे ठरवतो त्यातलं खूपच कमी पूर्ण होत.

मुळात मी फळ बघून कर्म करणाऱ्यांपैकी. फळासाठी कर्म हाच हेतू. पण फ़क़्त कर्म होत. म्हणजे जे हव ते मिळतच नाही. पण बोलण आणि करणं ह्या गोष्टींचा ताळमेळ असायला हवा. नाही तर आपल्या बोलण्याला काहीच अर्थ रहात नाही. माझे वडील नेहमी म्हणतात कि, मोठी लोक मोठी होण्याच्या कारानातलं एक कारण म्हणजे बोलण आणि ते करून दाखवण. नुसता बोलणारा नारद असतो आणि जे बोलतो ते करून दाखवणारा नारायण.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.