बोलावे तसे चालावे


मध्यंतरी टाइम्स नाऊवरची राज ठाकरेंची मुलाखत बघितली. ते म्हणतात ना ‘बोलवे तसे चालावे त्याची वंदावी पाऊले’. तस आहे अगदी. देशभरात सिगारेटवर बंदी आहे. पण अजून देखील अनेक ठिकाणी ‘धुम्रपान बंदी’ असे फलक लावलेले आहेत. कारण सरकारच्या बंदीवर कोणाचा विश्वास नाही. शरद पवार खूप काही बोलतात. पण ते जे बोलतात ते किती पाळतात? विदेशीचा मुद्धा घेऊन पक्ष स्थापन केला. आणि आता त्याच कॉंग्रेस सरकारच्या सरकारेत मंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई मध्ये पंतप्रधान आले होते. ७६५ कोटींची घोषणा वगैरे झाली. अजून पर्यंत एक रुपया देखील आला नाही दिल्लीतून.

राष्ट्र्पती बाई तर काही विचारूच नका. ‘तुम्ही आतंकवाद्यांचा न घाबरता सामना करा’. पण राष्ट्रपती बाई तुम्ही सही का करत नाही अफझल गुरूच्या फाशीवर? का तुम्ही पण घाबरत आहे? विलासरावांनी मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्यांच्या परिवाराला दहा लाख आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची घोषणा केली. जखमींना मिळाले फ़क़्त पाच हजार. मोफत विजेची घोषणा निवडणुकीत केली. नंतर सरकार आल्यावर शरद पवार म्हणाले वीज मोफत देणे शक्य नाही. मुख्यमंत्र्यांची मध्यंतरी सकाळ मध्ये मुलाखत आली होती. त्यात त्यांना प्रश्न विचारण्यात आला की ‘१ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्याचे काय झाले?’ मुख्यमंत्री म्हणाले ‘नवीन एसइझेडचे प्रकल्प चालू होणार आहेत. त्यातून दोन लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.’ आता मला सांगा दोन लाख आणि एक कोटी यात काही फरक आहे की नाही.

आमच्या गल्लीत व्यायामासाठी डबलबार करून देण्याचे आश्वासन मागच्या निवडणुकीच्या वेळी एका राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने दिले होते. पण अजून देखील डबलबार येत आहे. लोकसभेच्या वेळी नगर मधून भाजपच्या विरुद्ध राष्ट्रवादीचा जो उमेदवार होता. तो आता राहुरी मतदार संघातून विधानसभेला भाजपकडून तिकीट घेऊन उभा आहे. आता मला सांगा त्या उमेदवारावर कसा विश्वास ठेवायचा की निवडून गेल्यावर तो भाजपातच राहील? विषय उरला राज ठाकरेचा, त्याने राष्ट्रीय वाहिनीला मराठीतून मुलाखत दिली. प्रश्न इंग्लिशमध्ये आणि उत्तरे मराठीत. तो म्हणाला की मराठीची बाजू घेणे काही गैर नाही. आणि तो हे त्याची मत मराठीतून व्यक्त केली. मला तरी बाबा या सगळ्या पक्षांच्या लफड्यात त्याच बोलण आणि त्याची कृती योग्य वाटली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.