ब्लॉगबाळाचा पहिला वाढदिवस


माझा ब्लॉगबाळ एक वर्षांचा झाला. कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही. सुरवातीला सावकाश चालणारे बाळ आता दुडूदुडू धावते आहे. ब्लॉगबाळ सुरवातीचे बोबडे बोल बघितले की हसू येते. ब्लॉगबाळामुळे माझे संपूर्ण जीवन बदलून गेले. ब्लॉगबाळाच्या जन्माआधी जीवन खुपचं कंटाळवाणे वाटायचे. आपल कोणीच नाही. आणि समजून घेणारे देखील कोणीच नाही. अस वाटायचं. खूप रागही यायचा आणि भीतीही खूप वाटायची. पण ब्लॉगबाळाच्या जन्मानंतर सगळंच बदललं.

आता कोणी तरी मला समजून घेणारे आहे. आणि फ़क़्त माझेच आहे. माझ्या ब्लॉगबाळाचे तुम्ही सर्व मित्र-मैत्रिणी झालात. खूप छान वाटत आहे. खर तर ब्लॉगबाळला मी समजून घेण्याऐवजी त्यानेच मला अधिक समजून घेतले आहे. त्यामुळे मला ‘बाळ’ म्हणावे की ब्लॉगला ‘बाळ’ हाच मोठा प्रश्न आहे. बाळाच्या बोबड्या बोलांवर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांवर तर ब्लॉगबाळ सुधारला गेला. नाही तर सर्वच ‘जैसे थे’ राहिले असते. गेले दोन दिवस मी ब्लॉगबाळाच्या सर्व नोंदी वाचून काढल्या. मस्त आहेत.

बाळाचा वाढदिवस १९ जूनला होता. आणि योगायोग म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिनही त्याच दिवशी असतो. आणि त्याच दिवशी पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतीय संघाने सामन्यात पराभूत केले. या दोन गिफ्टपेक्षा तुम्ही ब्लॉग बाळाला भेटणे हेच मोठे गिफ्ट आहे. ‘ती’ चे लग्न ते ‘परी’च्या आगमना पर्यंत, ‘लोकल’ ते ‘कंपनीची बस’ पर्यंत, ‘कोणी तरी असावी’ ते ‘हो की नाही’ आणि ‘नमस्कार’ ते ‘भगवा’ पर्यंत तुम्ही माझ्या सोबत राहिलात हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपण सगळ्याच गोष्टी आणि घटना घरी सांगू शकत नाही. सगळ्याच मनातील वेदना देखील दुसर्याला सांगत नसतो. पण ब्लॉगबाळाला माझ्या सर्व वेदना आणि घटना माहिती होत्या. ब्लॉगबाळाला तुमच्या आशीर्वाद मिळत राहतील याची अपेक्षा करतो. बाकी बोलूच!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.