भय इथले संपत नाही


काय रोज एक दिवस चालू आहे? एकदम झकास! रोजच काही ना काही अस घडते की सगळी गणित उलटी पूलटी. काल काही अप्सरा आली नाही. आणि दिवस एकदम बोर झाला होता. दुपारी जेवायची इच्छाच होत नव्हती. मग काय नाही जेवलो. दुपारी ‘चार’च्या दरम्यान आमच्या फ्लोरवर आमच्या कंपनीचे डॉक्टर आले. आणि या भल्या मोठ्या चोकोनातील सगळ्यांना एकत्र बोलावले. प्रॉजेक्ट मॅनेजरने सर्वांना आपल्या ब्लॉक मधील एका मुलीला स्वाइन फ्लू झाला आहे, अस सांगितले. त्यामुळे एकच गडबड सुरु झाली. डॉक्टरांनी काळजी घ्या, आणि त्यासाठी काय काय करायचे याच्या बर्याच गोष्टी सांगितल्या. अनेकांनी प्रश्न विचारले. आणि त्याची उत्तरे देखील त्यांना व्यवस्थित रित्या मिळाली. असो, याच दिवशी अप्सराला का सुट्टी घ्यावीशी वाटली?

माझ्या मनात भलत्याच शंका येत होत्या. काल प्रॉजेक्ट मॅनेजरने सर्वांना आपल्या ब्लॉक मधील एका मुलीला स्वाइन फ्लू झाला आहे, अस सांगितल्यावर मी अप्सराच्या डेस्कजवळ उभा होतो. आणि मी खाली मान घातली. आता हे तिच्या जिवलग मैत्रिणीने पहिले. असो, तिला काही शंका आली असा विचार काल येत होता. डेस्कवर येऊन बसलो तर, सगळेच गडबडलेले. माझ्या समोरच्या ‘रो’ मधील मुलींपैकी एक मुलगी बाकीच्या तिच्या टीममधील सगळ्यांना सांगत होती की, एक मुलगी मागील आठवड्यात तिच्या बाजूला असलेल्या मिटिंग रूम मध्ये येऊन रडत होती. त्यावेळी हिने तिथे जावून रडण्याचे कारण विचारले. पण तिने काही सांगितले नाही. त्यानंतर ती दिसलीच नाही. मग ती कशी काय यावर त्यांची बरीच चर्चा चालू होती. माझ्या बाजुवाल्याचे वेगळेच. त्याच्या प्रॉजेक्टमधील एक मुलगी सुट्टीवर आहे. हा तिलाच स्वाइन फ्लू झाला असेल अशा गप्पा मारत होता. बोलता बोलता तिला श्वसनाचा त्रास होत होता असाही बोलला. प्रत्येकाचे काय काय तर्क असतात ना!

आमच्या कंपनीचे डॉक्टर माझ्याच रूटचे आहेत. आणि माझ्याच बसला असतात. आज सकाळी ते सांगत होते की काल ते निघण्यापूर्वी एकजण त्यांच्याकडे आला होता. आणि मला आताच तपासा, कारण मी तिच्या बाजूला बसतो अस त्यांना म्हणत होता. असो, संध्याकाळी खूप बेकार वाटत होते. एकतर हे असले काहीतर ऐकले. आणि अप्सरा दर्शन झाले नाही. आणि मी काल चिडून डब्बा कपडे घालून गेलो होतो. पण ती आलीच नाही. काही उपयोग झाला नाही. घरी जातांना मुद्दाम त्या ‘पुणे दर्शन’ बसने गेलो. म्हणजे ती बस खूप फिरून जाते म्हणून त्याचे बारसे करून टाकले. तर त्यातही एक जोडपे. म्हणजे माझ्या बसला असणारी एक मुलगी आणि तिचा ‘तो’. असो, आजकाल रोजच असे दिसतात. बर आहे. संध्याकाळी जातांना देखील एक असते रोज ‘पाच’च्या बसला. आणि काल संध्याकाळी ७:४५ बसला देखील बघितले. अप्सरा कधी असणार अशी माझ्यासोबत? रात्री देखील असेच!

सोडा तो विषय, आज सकाळी आल्या मॅडम. नुसत्या नाही लाल नाक! इतकी गोड आहे ना ती! गोरी गोरी आणि ते लाल नाक. पाहूनच हसू येते अजून. आणि हो, आज हिम्मत केली तिच्याशी बोलायची. पण समोर गेल्यावर काही बोलताच येईना. तिला कधी आली अस विचारल्यावर तिने ‘दहा’ वाजता अस उत्तर दिले. मग तिला मी ‘आता कशी आहे तब्येत?’ अस विचारले. तर ती तुला नाही तुम्हाला कसे कळले अस विचारले. मग मी ‘काल नव्हती आलीस ना म्हणून’. तर मग हसून ‘सर्दी झाली होती म्हणून’. मग काय पुढे माझ्यी बोलायची इच्छा होत होती. पण शब्दच फुटेना. आणि घसा नेहमीप्रमाणे कोरडा. तरी मी जातांना पाणी पिऊन जात असतो. तरीही हे आजकाल नेहमीचेच झाले आहे. मग तीच स्वतःहून ‘नाश्ता झाला?’ मी काय बोलणार? नेहमीचेच ‘त्यासाठीच चाललेलो आहे’. मग तिला मी ‘तुझा?’ तो ‘हो, मी येतांनाच करते’ म्हणाली. आता खर तर हे मला माहिती होते.

पण ती समोर आली की, सगळेच फूस! आजही मी काय काय सांगायचे अस ठरवून गेलो. आणि नेहमीप्रमाणे फूस झालं. आणि सुरवातीला बोलण्यासाठी जाणार तेवढ्यात तो ‘शेपट्या’ मित्र टपकला. सारखा तिच्या मागे मागे. मला माहिती आहे मी त्याच्या समोर एकदम चिंधी आहे. पण मला ती खूप आवडते. काय करू? तो आलेला मला नाही आवडत. असो, सोडा. पण मी आज खुश आहे. बाकी सगळेच कालच्याच विषयावर चर्चा करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.