भोपळा


परीक्षेचा निकाल पाहण्याची गरज राहिलीच नाही. उलट भोपळा नाही मिळाला तर आश्चर्य असेल. आता अभ्यास न करता गेल्यावर हेच होणार होत. असो, चूक झाली. आणि मला ती मान्य सुद्धा आहे. अजून तीन विषय बाकी आहेत. याची कसर त्यात काढेल. नेहमी आजच उद्यावर ढकलले. परवा माझा मुंबईचा मित्र आलेला. तरी अभ्यास झाला असता. पण नंतर करून म्हणून राहिलं. त्याला काल दुपारच्या साडेतीनच्या ‘डेक्कन’ने बसवले. त्यानंतर साडेचारला मी घरी आलो. जरावेळ विश्रांती घेऊ म्हणून जरा झोपलो. तर साडेसातला जाग आली.

आवरून पुस्तक उघडल. दोन चार ओळी वाचल्या नसतील तर मैत्रिणीचा फोन. जायचे का बाहेर जेवायला म्हणून. तिला म्हटलं उद्या परीक्षा आहे. थोडं तरी काही तरी अभ्यास करतो. आपण नंतर जाऊयात. तिला राग आलेला. मला म्हटली उद्या घरी ये. मी हो ला हो केल. पुस्तकात डोक घालून कुठे होतो म्हणून पहात होतो तेवढ्यात मित्राचा फोन. त्याच्या गप्पात वीस पंचवीस मिनिटे गेली. मग मूड गेलेला अभ्यासाचा. म्हटलं जरा वेळ गाणी ऐकू. म्हणून संगणक सुरु केला. आणि गाणी लावली तर, एक मित्र ऑनलाईन आलेला. त्याच्याशी गप्पा मारता मारता साडेआठ वाजून गेले. त्याला म्हटलं जेवण करून येतो. जेवण करून यायला दहा वाजले. कपडे धुण्यासाठी भिजवले. पण मुडच येईना अभ्यासाचा. रात्री झोप देखील येईना. शेवटी तीन वाजता झोपलो. सकाळी दहा वाजले उठायला. तशी माझी सुट्टीच्या दिवशी (दुपारी) चारच्या पुढे पहाट होते. पण आज त्यामानाने लवकर उठलो.

आवरण्यात साडेअकरा वाजले. दुपारी पुन्हा खूप झोप यायला लागली. एक डुलकी मारू म्हटली तर पावणे दोनला जाग आली. परीक्षेची वेळ अडीचची. अडीच ते साडेपाच. आवरून गेलो. माझ्या लहान बहिण भावाच्या शाळेत परीक्षा होती. तसे ते सेंटर मीच निवडलेल. जातांना पेन्सिल, शार्पनर, पेन, पट्टी अस सगळ् घेऊन गेलेलो. प्रश्नपत्रिका पाहून भीती वाटण्यासारखे काहीच नव्हते. कारण, अवघड किंवा सोपा ठरवणे तेव्हा शक्य असते जेव्हा आपल्याला काय येते आणि काय नाही हे आपल्याला माहिती असेल. इथं विषयाचे नाव टाकण्यापासून बोंब. पहिल्या अर्ध्या तासात एक ‘विभूती’ पेपर देऊन गेले. मग थोडा जीवात जीव आला. म्हटलं भोपळा मेंबर मी एकटाच नाही इथे. जरा वर्गात नजर टाकली तर मी सोडून बाकी सर्वजण ‘टेन्शन’मध्ये.

अर्ध्या तासाच्या अंतराने एक एक पेपर टाकून जात होते. आणि माझ्या इकडे गोळ्या सुरु होत्या. यार इतक्या थापा मारल्या ना. माहित नसलेल्या गोष्टीवर देखील मी किती गोळ्या टाकू शकतो याची कल्पना आली. दुखणे फक्त हे होते की, माझी बोटे अर्ध्याच तासात हार मानलेली होती. तरी माझ्या हातातली एके फोर्टी सेव्हन चालूच. हाहा! मी सोडून कोणीच पुरवणी जोडली नाही. पुरवणीवर जाऊ नका. कारण, शंभर पैकी साठ मार्कांच्या गोळ्या आहेत. आणि उरलेल्या चाळीस मार्कांच्या प्रश्नाचे गोळ्या मारणे कठीण होते. त्यात मी दाराजवळच्या पहिल्याच बेंचवर. बहुतेक माझा इतिहास पाहून मला त्रास नको अशा विचाराने मला दिली असावा तो बेंच.

त्यात दुपारी जेवण ना झाल्यामुळे मी पूर्ण गळून गेलेलो. आणि त्या वातावरणाने इतकं घाम घाम झालेलं. शेवटी नको नको झालेलं. हात दुखायला लागलेला. आणि घामामुळे तिथे बसण्याची देखील इच्छा राहिली नव्हती. पाच वाजता बाहेर पावसाची सर् पाहिली. म्हटलं चला निदान आज भिजण्याची इच्छा पूर्ण होईल. भरभर पेपर चेक केला. आणि परीक्षाकडे देवून टाकला. बाहेर आल्यावर इतकं मस्त ना. पण माझा मूड गेलेला. कारण यार, हे सगळ् तिला मिळवण्यासाठी करतो आहे. आणि असा आळस केला तर कधीच पूर्ण होणार नाही माझ बीसीए. आणि ती मुख्य आहे. उद्या या विषयामुळे अडचणी नको यायला. काय यार, चूक झाली माझी. असो आता फार टाईमपास झाला आहे. मी आजपासूनच पुढच्या पेपरचा अभ्यास सुरु केला आहे. असो, आजचा पेपरमध्ये काही मिळाले तर तर आश्चर्य. आणि पास झालो तर प्रश्नपत्रिका तपासानार्याची परीक्षा घ्यावी लागेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.