भ्रष्टमेव जयते


भ्रष्टमेव जयते! हाईला! तू तू.. तुम्ही नाव पाहून गडबडला? नाही नाही.. ‘शो’च नाव नाही बदललं. तो कार्यक्रम असणार. रविवारी! होता है! होता है! आणि होणार. हा त्याच पद्धतीचा, पण थोडा, वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा. चिंता करू नका अरेs ‘आल ईझ हेल’. मला ओळखले ना? मी आपल्या सर्वांचा लाडका ‘गरीब खान’. या कार्यक्रमाचा होस्ट. या निर्दयी, निष्ठुर आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस जनतेच्या त्रासाने त्रासलेल्या नेत्यांच्या ‘मन’मध्ये काय चाललेलं. त्यांच्या ‘महान’ आणि ‘आदर्श’ कृत्यांच्या आढावा त्यांच्याच तोंडून. त्यांनी केलेल्या  विकासाच्या (स्वतःच्या) आणि त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी. मला खात्री आहे, हा माझा नवीन ‘शो’ तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. चला, एका ब्रेकची वेळ झाली.

ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचे स्वागत. ‘भ्रष्टमेव जयते’च्या  या भागात इतकेच. हा भाग कसा वाटला. हे तुम्ही खाली दिलेल्या प्रतिक्रिया बॉक्स मध्ये नोंदवू शकता. हाईला! मी एक बात तो भूल गया. या ‘भ्रष्टमेव जयते’च्या कार्यक्रमाची वेळ कार्यक्रमाची दर सोमवारी, सकाळी पीसी उघडल्यावर. चला तर मग, भेटूयात सोमवारी.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.