मत आणि मतांतर


खर तर आज यावर बोलणार नव्हतो, पण एका नोंदी वरील प्रतिक्रिया वाचून बोलावेसे वाटले. माझ स्पष्ट मत आहे की प्रत्येकच मत प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबर असते. आता यावरून देखील मतांतर असू शकेल. अनेकांना महात्मा गांधीजी ह्यांच्या मुळे देश स्वतंत्र झाला असा दृढ विश्वास आहे. अनेकांना गांधीजी हा चेष्टेचा विषय आहे. प्रत्येकच मत तो ज्या परिस्थितीत जन्माला आला आणि वाढला. ज्या गोष्टी त्याला पटल्या यावरून बनत असते. यात अनुभव हा प्रत्येकाच्या मताला दृढ बनवतो. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाची गोष्ट. एकदा ‘राम मंदिर’ या विषयावरून माझा एक मित्र खूपच पेटला. मला त्याने राम मंदिर विषयाने देशात तणाव निर्माण होतो. दंगली होतात. तर जर राम मंदिर न बांधता तिथे एखादा सगळ्या धर्मासाठी दवाखाना बांधावा अस त्याच मत होत. मी त्याला माझ मत सांगितलं की, राम मंदिर ह्या विषयात बोलायचं ठरलं तर हा मुद्दा राजकारण्यांनी वाढवला. सगळे पुरावे आहेत की तिथे आधी राम मंदिर होत. आणि ते नंतर पाडलं गेल. त्याला म्हटलं मला एक सांग की जर उद्या तुझ घर कोणी जबरदस्तीने बळकावलं आणि नंतर कोणी तुला तुझ्या घराऐवजी एखादा दवाखाना किंवा सार्वजनिक मुतारी बांध म्हटलं. तर तुला ते पटेल का? तरी देखील त्याला माझ मत पटलं नाही. शेवटी त्याला आपल्या इथ लोकशाही आहे. प्रत्येकाला मत ठेवण्याचा अधिकार आहे अस म्हणून विषय बंद करावा लागला.

संगणकाचा कोर्स करीत असताना, असाच एकदा एका मुलाने एक मुलीला प्रपोझ केल. ती त्याला ‘नाही’ म्हणाली. इथपर्यंत सगळ ठीक होत. आणि खर तर हा विषय फार नवीन असही नव्हत. तो मुलगा खूपच टुकार होता अशातला काही भाग नव्हता. पण त्या मुलीच्या मैत्रिणींनी त्यांच्या इतर मित्रांना सांगून क्लास मधील सगळ्यांना त्याच्याशी दोस्तीच सोडा पण साध बोलणही बंद करायला लावलं. म्हणजे अस कधी माझ्या बाबतीत घडल असत तर मलाही राग आला असता. त्या मुलींनी त्याच्या बरोबर जे केल ते चुकीच होत. तो खूपच नाराज झाला होता. मग शेवटी मलाही ‘राजकारण’ कराव लागल. दोन महिन्यात जीने ह्या सगळ्याची सुरवात केली तीलाच एकट पाडलं. मग आली वठणीवर. जाती बीती अशा विषयात माझ काही मत वगैरे नाही. ब्राम्हण कोण आणि दलित कोण यात ना मला इंटरेस्ट ना कोणी कोणावर काय अन्याय केला यावर माझ काही मत.

हा पण परप्रांतीयांवर माझा राग आहे. आता तोही माझ्या बरोबर घडणाऱ्या घटनांमुळेच. जुने पुराने सोडा आजचंच बोलू. काल माझा बॉस कामानिमित्त बाहेर गेला होता. माझा ‘बंगाली’ सिनिअर दिवसभर ‘हे कस केल आणि ते कस’ यातच दिवस घातला. आज सकाळी माझ्या समोर बॉसला सांगत होता की काल मी हे काम पूर्ण केल. वास्तविक पाहता मी काल जे काम केल त्याच सगळ क्रेडीट त्याने घेतलं. असो सगळेच परप्रांतीय असे नसतात. पण मोठ्या प्रमाणात असेच असतात. ‘चमचेगिरी’ करणार. काम येत नसताना मी करतो म्हणून ते काम घेणार मग नाही जमल की मला येत नाही हे मान्य करणार नाही. मला आता दुसर एक महत्वाच काम करायचं आहे. आपण हे काम नंतर करू म्हणून टाळणार. पण दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसणार. सकाळी ‘गुड मोर्निंग’ आणि जाताना ‘बाय’ सोडून तिसर काय येत? जाऊ द्या, मला एक सोडला तर बाकी सगळेच परप्रांतीय सिनिअर भेटले. आणि खर सांगायला गेल तर त्याचं वागण, त्यांना काही नवीन शिकाण्याची नसलेली आवड. आपल ज्ञान दुसऱ्याला न देण. पण दुसऱ्याला त्रास होईल इतका मनस्ताप देण बघून हे माझ मत बनल आहे. अस माझे मराठी मित्र किंवा मी देखील त्यांच्यासारख का वागू शकत नाही देव जाणे. मी पुण्यात घर घेण्यासाठी लोन घेतलं. मीच काय पण कोणीही घर घ्याव किंवा निदान सध्याला भाड्याच्या घरात रहाव असाच विचार करतो. झोपडी बांधावी असा विचार का येत नाही आपल्या मनात? हाच काय तो फरक मतांचा. अबू आझमीला हिंदीचा तर राज ठाकरेला मराठीचा मुद्दा महत्वाचा वाटतो. हे त्यांची मत आहेत. मतांतर होणारच, एकमत झाल तर आपला देशात वर्तमानपत्र, बातम्यांच्या वाहिन्या बंद नाही का पडणार? आता अस माझ मत आहे. कदाचित यावरूनही मतांतर असू शकेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.