मन भटकंती


काल कंपनीच्या बसमधून कंपनीत जात असतांना एक मुलगी माझ्याकडे बघत होती. असो, आधी मी तिच्याकडे बघायचो. काल चक्क ती माझ्याकडे बघत होती. तसे आम्ही रोज एकमेकांकडे बघतो. पण कधीच बोलत वगैरे नाही. तिच्याही घरी माझ्याप्रमाणे तीच्या लग्नाची बोलणी वगैरे चालू आहे. आता हे कळायला मला फारसे श्रम करावे लागले नाहीत. परवा मी, माझी मैत्रीण संध्याकाळी फिरायला गेलो होतो. काही तरी खावे म्हणून ‘बर्गर’ घेतला. मी खात असतांना सहज लक्ष गेल तर एक छानशी मुलगी माझ्याकडे एकटक नजरेने बघत होती. बहुतेक तिचेही मन माझ्याप्रमाणे भटकत असावे. थोड्या वेळाने आमच्या दोघांच्या बाजूला ती आणि तिचा तो येऊन कच्ची दाबेली खात होते. तर तो माझ्या मैत्रिणीकडे बघत होता. बहुतेक त्या दोघांचेही मन अजून जुळलेली नाहीत.

म्हणजे जसे भूक लागल्यावर आपण कुठे काही मिळत आहे का ते पाहतो. तसेच बहुतेक मनाचे आहे. इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मन असेच भटकत रहाते. माझा एक कंपनीतील मित्र आहे. जेव्हापासून त्याला पाहतो आहे तेव्हापासून त्याचही मन कायम भरकटत असत. दिसेल तीच्या हा प्रेमात पडतो. त्याच मन मग त्याला दिवास्वप्ने दाखवते. थोड्या फार फरकाने माझेही तसेच आहे म्हणा. एखादी मिळावी यासाठी माझेही मन भटकत रहाते. खर सांगायचं झालं तर जाता येत मुली पाहणे हा माझा पार्टटाईम छंद झालेला आहे.

बर या मुळी एवढ्या सुंदर का असतात? आणखीन एक प्रश्न मला नेहमी पडतो की मुली त्यांचे केस सोडायचा आणि पुन्हा बांधायची कसरत कशासाठी करतात? असे केस सोडतांना एखादी मुलगी दिसली की माझे मन मग कामात लागत नाही. कधी कधी वाटत की त्या हे मुद्दामच लक्ष जाव म्हणून करत असतील. असो  सोडा तो विषय. कधी कधी वाटत अस सगळ्यांचीच मन भरकटत असतात का? म्हणजे बघा. आमच्याच कंपनीत एक मुलगी आहे. जिचे काम माझ्या बाजूच्या डेस्कवर बसलेल्या एका मुलाशी असते. ती जेव्हा केव्हा येते त्यावेळी माझे लक्ष जाईल अस काहीतरी करते. उदाहरणार्थ माझ्याकडे पाठ करून उभी राहिलं. किंवा थोड्या मोठ्या आवाजात काही तरी बोलेल. ती तर खुपंच छान आहे. गोरी गोरी पान फुलासारखी छान. या सगळ्यांत रोज माझे मन भटकत असते. कुठेच एका ठिकाणी स्थिरावत नाही. दोन तीन आठवड्यांपासुन चाललेले ते सानिया प्रकरण आज संपले. बर आता तीच लग्न झालं तर मला बोर होत होते. म्हणजे त्या शोएब मलिकच्या ऐवजी दुसरा कोणी असता तर मला इतके जास्त बोर झाले नसते. हे अस चालू आहे. असो, भटकंती कधी थांबणार देव जाणे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.