मन म्हणजे..


मन म्हणजे एक मोठे गूढ आहे. कधी काय करेल काही सांगता येत नाही. कुठल्याच गोष्टीला कशाचेच बंधन नाही. न कसली मर्यादा. ताब्यात राहणे हे मुळी माहितीच नाही. न वयोमर्यादा. जस वय वाढते, तसा याचा अल्लडपणा वाढत जातो. क्षणाक्षणाला बदलते.

कधी प्रश्न बनते. कधी प्रश्नाची उकल. जगात कायम अशांत राहणारी गोष्ट म्हणजे हे मन. मनाचा शोध घेणे म्हणजे एखाद्या काळ्याकुट्ट गुहेत जाण्याप्रमाणे आहे. कधी वेडावेल. कधी विचित्र गोष्टीचा हट्ट करेल. आणि कधी भूतकाळात जावून बसेल. न होणाऱ्या गोष्टीचा विचार करेल. म्हणजे सगळे विरूद्ध की. कितीही समजावा. कितीही दमदाटी करा. ऐकेल तर शपथ.

मनाच्या राज्यात, सगळे आहे. असलेल्या गोष्टी आणि नसलेल्या गोष्टी सुद्धा. गेलेल्या गोष्टी, पाहिजेल तेव्हा पुन्हा येतात. एक स्वप्ननगरी आहे. आणि त्याचे मन म्हणजे राजा. ह्या राजाला वर्तमानातील गोष्टी त्याच्या राज्याप्रमाणे हव्यात. ‘नाही’ हा शब्दच नाही माहिती या राजाला. का कुणास ठाऊक मनाच्या उद्योगांवर राग येण्याऐवजी हसू येते. पण ‘मन’ कायमच प्रत्येक गोष्टीत ‘सिरिअस’. मनाला न कुठली दवा बाधते. न कोण त्याला काबूत ठेऊ शकते.

, ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.