मराठी वाढवण्याचे ध्येय आणि आपण


मराठी ची गळचेपी होते. हा अनुभवाचा विषय आहे. काही ठिकाणी जाणून बुजून होत. मी गेल्या काही वर्षातील अनुभव सांगतो. इतरांचा अनुभव वेगळा असेल. त्यामुळेच मते वेगळी असतात. त्यामुळे नाकारण्याचे कारण नाही.

साधारण मे २०१५ची गोष्ट. नवीन घराच्या शोधात होतो. कधी बजेटमध्ये नसायचं. तर कधी पसंती होत नसायची. चिंचवड, निगडी, रावेत, चिखली. देहूरोड व हडपसरमधील काही स्कीमला भेटी दिलेल्या. नंतर चिखलीत एक वन बीएचके बुक केला. जिथं जिथं घरासाठी फिरलो. पण तिथं भाषेची अडचण आली नाही. ज्या कंपन्यात नोकरी केली तिथं साधारण ८०% लोक मराठी होती. व्यवसाय सुरु करतांना व दोन वर्षांनंतर कुठेही भाषेची अडचण आली नाही.

नोकरीत काही मराठीद्वेषी होते. पण भूमिकेवर ठाम राहिलो तर परिस्थिती बदलते. आताही कोणतीही गोष्ट घेतांना मी मराठीचा वापर करतो. कोण भाषेसाठी गिह्राईक सोडेल?. हेच तत्व अंगिकारले तर मराठी वाढेल. आणि टिकेलही. आपण संख्येने अधिक आहोत. आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे. कशासाठी संधी सोडायची?. मराठी वाढवण्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. ‘मला मराठीच कळते’ म्हणा. विचार समोरच्याला करू द्या. विजय आपलाच होईल.

प्रत्येकाकडे ही शक्ती आहे. फक्त आपल्या लक्षात येत नाही. आपण चर्चा अधिक करतो. यानेच वेळ वाया जातो. कृतीवर लक्ष केंद्रित केल तर लवकर ध्येय गाठू! म्हणजे ध्येय असायला हवं! 🙂

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.