मला आई व्हायचंय


मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे. मी चित्रपटबद्दल बोलत आहे. काल चिंचवडच्या बिग सिनेमाला चित्रपट पाहायला गेलेलो. चित्रपटाचे नाव ‘मला आई व्हायचंय’. नटरंग, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यांच्या इतका चांगला वगैरे नाही. परंतु, ‘श्वास’च्या टाईपमध्ये बसणारा आहे. पण एकूणच ठीक आहे. एका अमेरिकन स्त्रीला ‘आई’ व्हायचं असते. परंतु, बाळंतपणामुळे बेढबपणा येण्याच्या भीतीने ती सरोगसीचा मार्ग निवडते. सरोगेट म्हणजे पित्याचे शुक्राणू आणि मातेचे बीजाणू कृत्रिमरीत्या तिसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडून बाळंतपण केले जाते. थोडक्यात, ‘भाड्याची आई’. ती अमेरिकन स्त्री कोकणातील एका बाईची निवड करते. ती बाई म्हणजे या चित्रपटाची नायिका.

पुढे तिच्या गर्भाशयात बिजांकुरण केल्यावर काही महिन्यांनी डॉक्टरांच्या तपासणीत बाळ ‘अपंग’ होण्याची लक्षणे मिळतात. ती अमेरिकन स्त्री त्या जन्माआधीच बाळाला नाकारते. जन्मानंतर त्याला अनाथ आश्रमात ठेवण्याचा सल्ला देते. चित्रपटाची नायिका त्या अनाथ आश्रमात ठेवण्या ऐवजी त्याचा सांभाळ करण्याचा निर्णय घेते. पुढे जावून त्या बाळाचा जन्म होतो. आणि बाळ व्यवस्थित असते. थोडक्यात, अपंग नसते.काही वर्षांनी, ते बोलू चालू लागते. मला तरी सर्वात चांगला भाग त्या मुलाची मराठी बोलणे वाटले. त्या अमेरिकन मुलाची मराठीवर उत्तम कमांड आहे. कुठेही त्याला मराठी शिकवलेल किंवा पढवून घेतलं अस वाटत नाही. मुलगा व्यवस्थित जन्माला आल्यावर त्याची खरी आई, म्हणजेच ती अमेरिकन स्त्री त्या नायिकेकडे येते. आणि मुलाची मागणी करते. मुलाचे उत्तम भवितव्यासाठी नायिका मुलाला त्या अमेरिकन स्त्रीला देणाच्या कबुल करते. मुलगा अमेरिकन स्त्रीला पाठवल्यानंतर नायिकेचे आईचे प्रेम उफाळून येते. पुढे जरा जास्तच रडारड आहे.

शेवटी नायिका आत्महत्येचा विचार करून विषाची बाटली घेऊन शेतात जाते. सुदैवाने ती अमेरिकन स्त्री त्या मुलाला घेऊन पुन्हा तिच्याकडे येते. तिकडे आई नाही म्हणून ते मुल न काही खाते आणि न काही बोलते. एकूणच मुलाची एन्ट्री नंतर चित्रपट बरा वाटू लागतो. म्हणजे एकूणच चित्रपट ‘वन टाईम’ पाहण्याजोगा मला वाटला. त्या मुलाचे बोल ऐकतांना मला माझ्या जुन्या कंपनीची आठवण आलेली. म्हणजे मी कोरेगाव पार्कमधील एका कंपनीत असतांना एक फॉरेनर होती. तिला मराठी शिकायची आवड. मी तिला रोज एक मराठी शब्द सांगायचो. कंपनी सोडण्याच्या दिवशी तिने मराठीत दोन ओळी बोलून दाखवलेल्या. असो, कोरेगाव पार्क आठवलं की.. जाम डोक सरकत. नको आज तो कालचा विषय. आणि आज दिवसाबद्दल पण नको काही बोलायला. नाहीतरी नुसते बोलून काहीच होत नसत.

सोडा, चित्रपट पाहतांना सर्वात जास्त दुखाची गोष्ट होती संख्या. हाहा! किती लोक होते माहिती आहे का? हम ‘पाच’. एक मी, माझी आई आणि एक जोडप. आणि अजून एक हिरो आलेला. चित्रपटगृहात बसल्यावर पळून जाव अस वाटायला लागलेलं. रविवार देखील कोणीच नव्हत आलेल. चांगला चित्रपट असून देखील अस. सोडा, पुढच्यावेळी जातांना माझी अख्खी वानरसेना घेऊन जाईल. एकटे जाम बोर होत. असो, एकूणच चित्रपट चांगला वाटला. बाकी बोलूच..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.