मला काय त्याचे ?


परवा रात्रि दहाच्या सुमारास कोरेगाव पार्कमध्ये एका अपघातात एक युवक ठार झाला. काल सकाळी मी सकाळी कंपनीत येत असताना ती कार बघितली. ती कारने त्या युवकाला उडवून रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्तानाकत, त्या स्तानाकाचे आणि गाडीचे  बरेचसे नुकसान केले. बघून अंगावर काटा उभा राहिला. कंपनीत या घटने बद्दल मी माझ्या सहकार्यांशी चर्चा केली. पण त्याना या विषयात रसच नव्हता.

मुळत ही घटना घडली, ही घटानाच त्याना माहित नव्हती. त्याच रस्त्याने दररोज ये जा करणारे. त्याना कधी विचार की चांगला बर्गर कुठे मिळेल?, नाही तर नविन कोणता चित्रपट बघावा?. ते याना  माहिती. पण शेजारी कोण गेल हे याना माहित नसत. दूसरी घटना आज सकाळी घडली.मी नेहमी प्रमाणे कंपनीत येत असताना एका दिल्लीच्या दिलवाल्याने (त्याच्या कारचा क्रमांक DL ने सुरु झाला होता म्हणुन दिल्लीवाला ) माझ्या अंगावर गाड़ी घातली. साहेब वेगात होते नाही तर त्यांच्या श्रीमुखात माझ्या हाताने समाचार घेतला होता. कंपनीत आलो तरी आमचे सहकारी(?) थंड प्रतिसाद देऊन त्यांच्या आवडत्या विषयात गुंतले.

मला काही क्षणासाठी असे वाटले की हे खरच माणस आहेत की जिवंत प्रेत. पुण्यात मध्यंतरी पाण्याची बोम्ब होती, पण हे मात्र नळ न बंद करताच… जेवण करताना भाजी कशी बनवायची यावर चर्चा करणार. पण चर्चा करणारे घरी भाज्याच बनवत नाहीत. खाण्याचे काम मात्र जमते. जे कोण बनवत त्यांच्या भाजी कधी करपलेली नाही तर कधी तिखट. आणि एकानारे त्याहून पुढचे म्हणजे जे जेवणाचा डबा लावतात. ह्याना सोनियाचा राग येणार, राज चे  नाव काढले की भाषावादी वाटणार. आणि देशाचा प्रश्न म्हटला की यांना तो विषय म्हणजे डोकेदुखी वाटणार. अशी सध्याची माझ्या सहकर्यांची स्थिति आहे. प्रत्येक ठिकाणी ‘मला काय त्याचे’ . आपण ज्या देशात समाजात वावरतो ज्याचा आपण एक हिस्सा आहोत, याची जाणीव नसलेले, देश भाषा यावर  प्रेम नसलेला मुर्दाड समाज काय उन्नति करू शकतो?. देश हा एका माणसाच्या शरीर सारखा असतो.

पायात काटा घुसला तर त्याच्या मदतीला हाताने मदतीला जायला हवे.  जर त्या हाताला मेंदू आणि उरलेल्या शरीराचे सोयरे सूतक नसेल तर त्या शरीराला त्या हाताचा काय उपयोग? आणि असल्या लोकांचा देशाला काय उपयोग?. जावू द्या मला काय त्यांचे?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.