मस्त


काय सांगू आणि काय नको अस झालं आहे आता. कालचा तो दिवस. दिवस कसला स्वप्नंच. परवाचा दिवस आणि ती रात्र. रात्री असली चित्रविचित्र स्वप्न पडली ना. असो, नीट झोपच आली नाही. काल सकाळी उठलो तरी सर्दी आणि डोकेदुखी कमीच होईना. व्यायाम करतांना खुपंच हाल झाले. शेवटी अर्धवट व्यायाम सोडला. सुट्टी घ्यावी अस मनात येत होते. पण गेलो तसाच. दाढी सुद्धा नाही केली. एकतर आधीच अशक्तपणा, त्यामुळे काळवंडलेला चेहरा आणि बिनदाढीचा. आणि ते बंडल कपडे. थोडक्यात ‘अवतार’ झालेला माझा. तसाच गेलो. डेस्कवर बसल्यावर ती ऑनलाईन आहे का ते पहिले. तर ती आलेली. खर तर काल मी तिला ‘गुड मोर्निग’चा मेल टाकायचे ठरवलेले. पण पिंग केले. सोडा, मी पण काय पान्हाळ लावत बसलो आहे.

आज दुपारी तिने स्वतःहून पिंग केले. काय यार, माझ्या मनातलं तिला कसं कळत तिला?? म्हणजे अगदी त्याचवेळी तिला पिंग करू की नको याचाच विचार चालू होता. मला म्हणाली ‘आपण आपल्या दोघांचे काम एकमेकांना बदलून घ्यायचे का?’ मी ‘का’ अस विचारल्यावर, मला म्हणाली ‘कारण तुला काहीच काम नाही आहे’. खरंच, माझे या प्रोजेक्टमध्ये उंदीरमामा एवढे काम दिलेले. आणि डायनासॉर इतका वेळ. मग काय, खूप आधीच काम संपलेले. त्यानंतर मी माझ्या सिनिअर लोकांना काम मागितले. पण त्यांनी दिलेले काम देखील खूप पिल्लू. ते देखील संपले. मित्रांच्या प्रोजेक्ट्स अधूनमधून मदत करतो. इतरवेळी आपला ‘अप्सरा’चा विचार हेच मुख्य काम. तिला हसून ‘चालेल, आजपासून तू डिझायनर आणि मी डेव्हलपर’. तिने स्माइली टाकल्यावर. मी तिला ‘दे मला तुझे काम’ अस म्हणालो.

मग म्हणाली ‘तू कसला अभ्यास केला आहेस?’ मग काय बोलणार, खर तर खुपंच लाज वाटत होती सांगतांना. मी कसं खोट बोलू तिच्याशी? नाहीतरी आज ना उद्या तिला कळणारच होते. तिला म्हटलं ‘डिप्लोमा वेब’चा मग तिने विचारले ‘तुझे पद कंत्राटदार का आहे?’. मी ‘कारण मी डिप्लोमा होल्डर आहे. बारावी नंतर डिप्लोमा. पदवीधर नाही’. खर तर खुपंच बेकार वाटत होते. आता ती माझा विचार का करेल अस सारखं मनात येत होते. मला वाटलं होत. आता पुढे ती काहीच बोलणार नाही. पण ती ‘तुझे वय किती?’ खर तर या प्रश्नाने मी अजूनही गोंधळलो आहे. तिने अस का विचारले म्हणून. मी ‘पंचवीस’. मग ती नुसतीच ‘ओके’ म्हणाली. खर तर ती आज माझ्याशी बोलली. हेच खूप मोठे होते. मी तिला ती रहात असलेल्या ठिकाणाचे बीएसएनएलच्या ऑफिसचा पत्ता विचारला. तिने मला जवळपासचा भागाची माहिती सांगितली. पण मला काहीच माहित नव्हते. मी गुगलवर ते ठिकाण शोधले. पण ती ‘बिझी’.

मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये गेलो त्यावेळी खूप हैराण झाले होते. म्हणजे डोकेदुखी कधीच पळून गेलेली. पण ती माझ्याबद्दल काय विचार करीत असेल या विचाराने मन हैराण झाले होते. खर तर अजूनही माझ्या मनात तीच शंका चुकचुकते आहे. मित्र काय मग, ‘हरिश्चंद्राचा’ अवतार घ्यायची काय गरज होती. म्हणून माझी उडवू लागले. त्यांना समजावून सांगितले तरी सगळे फिल्मी ‘प्रेमात आणि लढाईत सर्व काही माफ असते’. असो, मित्र त्याच्या बाईकवर जाऊ बोलत होता. पण नाही गेलो. डेस्कवर आलो तर तिचे पिंग. मग काय आनंदी आनंद. पण ती ‘अवे’. ती आल्यावर तिने मला ‘कधी जाणार आहेस?’ मी ‘सहा:पंचेचाळीसच्या बसने’. ती ‘आज माझा सकाळी मूड ऑफ होता’. मी ‘का?, कामाचा लोड जास्त आहे का?’ तर ती बोलली ‘विकेंडमुळे’. काय सांगू तिथेच नाचायला सुरवात करावीशी वाटायला लागले होते. तिला विचारलं तू विकेंडला काय करतेस? तर बोलली ‘ऑफिसमध्ये येते’. तिला विचारलं ‘उद्या सुद्धा येणार का?’ तर ‘नाही. प्रवासाची अडचण’ बोलली.

मी म्हटलं ‘तुला ओ टी मिळतो का?’ ती ‘ओ टी ?’. मी ‘ओव्हर टाईम’. तर ‘नाही’ बोलली.’ हे चुकीचे आहे. तू त्यांना सांग. की कंपनीच्या नियमानुसार विकेंड चे दोन दिवस सुट्टी असते’ खर तर माझ्या बसला उशीर होत होता. पण तिच्याशी बोलायला बसचं काय?? असो, तीच ‘बाय’ म्हणाली. मग काय तिला ‘थांक्स’ बोललो. तर ती ‘थांक्स?’. तिला म्हटले मी हेच म्हणणार होतो. आणि संगणक बंद केल्यावर रहावलच नाही. तीच्या डेस्कच्या बाजूने गेलो. तीच्या एका स्माईलसाठी. किती गोड आहे ती. खूप खूप छान दिसत होती. आणि तीचा तो नेत्र कटाक्ष. आणि ते स्माईल. असो, अजूनही तेच डोळ्यासमोर फिरते आहे. सगळ् स्वप्नंच वाटत आहे. माझ्याशी स्वतःहून बोलेल. अजून स्वप्नंच वाटत आहे. असो, येतांना ट्राफिकमध्ये खूप वेळ अडकल्याने जेवण झाले नाही. पण दिवस ‘एकदम मस्त’..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.