महा’राज’


खर तर माझ्या सारख्याने महा’राजां’बद्दल काही बोलण म्हणजे मुंगीने हत्तीबद्दल बोलण्यासारखे आहे. त्यांच्याबद्दल जेवढ बोलाल तेवढ कमी आहे. आता त्यांचे वागणे, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची भाषणे सगळ काही वादातीत. त्यामुळे त्यांना सोडून महाराष्ट्रातील ‘राज’कारणाबद्दल विचारही होवू शकत नाही. थोडक्यात, सांगायचे झाल्यास नटरंगमधील ते एक वाक्य आहे ना ‘राजा आक्शी राजावाणी दिसतो’.

आता ‘शिवसेना आणि राज’ भाग वेगळा. कोणत्याही मराठी माणसाच्या मनात डोकावलं तर ‘राज’ आणि ‘शिवसेना’ हेच एक द्वंद्व आहे. न संपणारी शोकांतिका आहे तो विषय. आता ‘भाऊबंदकी’ बद्दल काहीही न बोलले तर बरे.कारण ‘उद्धव’ देखील तेवढेच महत्वाचे आहेत. आणि त्यांचे ते छायाचित्रांचे ‘महाराष्ट्र माझा’ पुस्तक बघितल्यापासून मलाही त्यांचा आदर वाटतो. आणि कोणीही ते पुस्तक बघेल तोही त्यांच्या बद्दल आदर निर्माण होईलच! महाराष्ट्रातील एकूणच राजकारण पहिले तर कोणाच्याही मनात राजकारणाबद्दल द्वेषच निर्माण होईल. आणि चीडेने अंगाची लाही लाही होईल. कितीही घाणेरडे आणि किळसवाणे कृत्य करणारे सरकार असले तरीही कायम तेच सत्तेवर येते. आणि कितीही आंदोलने केली तरीही विरोधी पक्ष कायम विरोधातच राहतो. पण एक आशेचा किरण आहे. आणि तो म्हणजे महा’राज’.

किर्र अंधारात आणि चिखलाच्या दलदलात चालत असतांना अचानक कुठून तरी प्रकाशाचा किरण यावा आणि त्याने रस्ता स्पष्टपणे दिसावा. अगदी तसं आहे महा’राजां’चे. परप्रांतीयांनी इथे यावे आणि मराठी लोकांना मराठी शहरे सगळ्यांची आहेत अशी पिरपिर करावी. आणि ताबडतोप महाराष्ट्रातील सरकारने त्याची री ओढावी. असंच कायम चालू. शिवसेनेने आवाज उठवावा. पण भाजपने मौन घ्यावे. आणि मराठी माणसाने अगतिकतपणे बघत रहावे. हेच कायम चालू. पण आता महा’राजां’च्या आगमनाने सगळंच उलट पालट झाल आहे. म्हणजे दिसते आहे. मराठी पाट्या, मराठी लोक दिसत आहेत. आणि आता आम्ही हक्काने ‘माझा महाराष्ट्र’ म्हणू शकतो. आणि दिल्लीच्या बिल्लीनाही निमुटपणे ऐकावे लागते.

महाराष्ट्राच्या वाघासमोर दिल्लीच्या बिल्लींचे, आणि युपी, बिहारी कुत्र्यांचे काय चालणार. महा’राजां’चे व्यक्तिमत्वच बघा ना, राजबिंडे. आणि ते बिहारचे नेते कानातील आणि दाढीचे खुंट वाढलेले. युपीचा मुलायम बघा, किंवा मायावती. पाहताक्षणी अमिताभ बच्चनचे जुने चित्रपट आठवतात. त्यातली खलनायकाची पात्र शोभतात ती. आणि महा’राज’ बघा एक नवी तरुण उमेद, सळसळत्या रक्ताची, मनातील खदखदत्या अपमानाच्या बदल्याची ज्वाला. दिल्लीच्या शीलाबाई बघा. सुरकुत्याच सुरकुत्या. बघितल्यावर अस वाटत खूप विचारी आणि करारी नेतृत्व. आणि कृत्य पहिली तर गुरूची ‘बॉडीगार्ड’. आणि महा’राज’ची नुसती आठवण झाली तरी अबू गालाला हात लावत असेल.

वकृत्वबद्दल बोलायलाच नको. कधी आठवते का शरद गवाराचे किंवा हारजीतच टीव्हीवर लाईव्ह भाषण? बर पहिले तरी काही कळत का? किंवा आपले लाडके मुख्यमंत्री घ्या. उभा राहिल्यावर, भाषण ऐकताना एखादा तरी अंगावरील केस उभा राहतो का? किंवा अंगावर शहारे येतात का? मुळात भाषणच एवढे निरास असते की दुसर्या सेकंदाला बघणारा कंटाळतो. महा’राजां’ची लाखालाखाची सभा. आणि सभेतून काहीतरी दिशा मिळते. उगाचं, आपल ‘मी वाढपी आहे. माहितीच्या माणसाला जास्त माप वाढेल’. किंवा ‘तीन वर्षात चोवीस तास वीज देऊ’. अशा भूलथापा नसतात. जे आहे ते, जसं आहे तसं अस असतं भाषण महा’राजा’च. नुसत्या घोषणा नसतात. पुढे काऊन डाऊन सुरु होते. मग कोणीही असो. माफी मागून माघार घ्यावीच लागते मराठी माणसाची. उगाचच नाही बिहाऱ्यांचे डोके ठाण्यावर आणले. जे बोलतो तसे करतो असा आहे महा’राजा’. मग समोर कोणीही असो एन.डी असो किंवा पी. एम. मराठी म्हणजे मराठीच. पण कधी कधी ‘विधान’ परिषदेच्या घोळात मलाही महाराजाबद्दल थोडा घोळ निर्माण होतो. असो, पण महा’राज’ शेवटी मराठी मनांचे ‘राजे’ आहेत. आज त्या राजाचा वाढदिवस.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.