माऊवादी


आम्ही माऊवादी, सरकार उगाचंच आमच्याविरुद्ध शस्त्राचा वापर करीत आहे. बघा ना! आम्ही लाल वस्त्रे घालून, अरे असा काही विचार करू नका. आम्ही ओशोवाणी ऐकून तसले काही उद्योग करीत नाही. आम्ही फक्त क्रांती करतो. हो! खोट वाटत का? दांतेवाड्यात आम्ही काय ७६ सैनिकांना मारलं. आमच्या लॉर्ड माऊ ने हे अस केल म्हणजे क्रांती झाली अस म्हटलं आहे. कोण माऊ? काहीतरीच काय विचारता. गिनीज बुक कधी तरी चाळा. सर्वात जास्त बायका करणारा हाच तो नरश्रेष्ठ. नुसत्याच केल्या नाहीत तर नंतर त्यांना मारून टाकले. बघा! नाहीतर तो तुमचा श्रीराम. आत्ताच दोन दिवसांपूर्वी ते लिंबूसरबतंम् येऊन गेले. आम्हाला लाल कपड्यात बघितल्यावर, ते लिंबूसरबतंम् लूंगी सोडण्याची भाषा करायला लागले.

मग आम्हालाही स्व: संरक्षणाचा काही अधिकार आहे की नाही? सांगा ना, तुम्ही ‘गे’ लोकांसाठी कायदा केला ना. आम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण करणार नाही अस दिसल्यावर सरबतंम् जाम भडकले की हो. त्यांनी त्यांच्या भाषेत आम्हाला शिव्या देखील दिल्या. आम्ही खर तर त्यांना आमचे चिनीमातीच्या घरात बनवलेलं ‘म्याऊ म्याऊ’ हे माऊ गीत म्हणून दाखवलं होत. बघा आमच्या माऊ ने त्याच्या काळात देखील असेच हल्ले करून चीनीमातीचा देश काबीज केला होता. मग आता चिनीमातीच्या देशातूनच असे क्रांती करण्याचे आदेश आणि सोबत शस्त्रे येत आहेत. आम्ही काय बुवा हुकमाचे ताबेदार. तरी तुम्हाला आमच्याबद्दल काहीचं वाटत नाही. किती उन वाढल आहे. त्यात नीट रस्ते नाहीत. तुमच्या इथं असलेली बेस्ट पीएमपीएल देखील नाही. मग आम्हाल राग येणार नाही का?

म्हणून मग एकदा झारखंडमध्ये ३०० प्रवासी असलेली एक एक्सप्रेस पळवली होती. आणि दिवसभर नुसतचं बसून काय करायचे म्हणून आम्ही वेळ घालवण्यासाठी कधी कधी करतो बॉम्बस्फोट. आणि कधी कधी सैनिकांना किंवा लोकांना मारतो. २९ जून २००८ ला ओरिसात ३८ कमांडो. १६ जुलै २००८ ला ओरिसातील मलकनगिरी जिल्ह्यात २१ पोलीस, १३ एप्रिल २००९ ला ओरिसातील कोरापूत जिल्ह्यात बॉक्साइटच्या खाणीजवळ निमलष्करी दलाचे १० जवान, २२ मे २००९ ला गडचिरोलीतील १६ पोलीस, १० जून २००९ ला झारखंडमधील सारंदा जंगलात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसह नऊ पोलीस, १३ जून २००९ ला बोकारो १० पोलीस, १६ जून २००९ ला बेहेराखंड आणि पालामाऊ जिल्ह्यात ११ पोलीस, १८ जुलै २००९ ला छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात एका गावकऱ्यावर हल्ला केला. काय करणार तो आमचे ऐकून घेतच नव्हता. आणि म्हणून आम्ही सुद्धा रस्त्याचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक गाडी पेटवली. २३ जुलै २००९ ला बिहारमधील लखिसराई जिल्ह्याच्या कोर्ट परिसरातील वाहने पेटवली. २३ जुलै २००९ ला गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील एका महिलेवर हल्ला, आणि एकदा तर आम्ही म्हणजे २६ सप्टेंबर २००९ ला छत्तीसगडच्या जगदाळपूर-मधील पैरागुडा येथे भाजपच्या खासदाराला. ८ ऑक्टोबर २००९ ला महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये १७ पोलीस, १५ फेब्रुवारी २०१० ला पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यात ईस्टर्न फ्रंटियर रायफल्सचे २४ जवान, ४ एप्रिल २०१० ला ओरिसाच्या कोरापूट जिल्ह्यातील तांगिनीगुडा येथे ११ जवान आणि शेवटचा ६ एप्रिल २०१० ला छत्तीसगडमध्ये दांतेवाडा जिल्ह्यातील मुकरानाच्या जंगलात ७६ जवान मारले.

बस्स! ह्याच्यापलीकडे आम्ही काहीच केलेलं नाही. आणि तरीही सरकार आमच्या विरोधात शस्त्राचा वापर करीत आहे. सरकार असा अन्याय कसा करू शकते. तुम्ही दहशवाद्याशी बोलणी करता. त्या कसाबला तुम्ही किती सांभाळत आहे. आणि आम्ही उन्हात. पोट-पाण्यासाठी करतो खंडणीचा बिझनेस. काय चुकीच आहे? तो दाउद ला तुम्ही डॉन करता. त्याला काहीच म्हणत नाही. मग आम्ही केल तर काय चुकल? बर हे आधी ज्योतीसोबत बसून बोललो होतो आम्ही. तोही खुश होऊन लालगढ दिला होता आम्हाला. बर आम्ही चंदन एक्सपोर्टचा बिझनेस देखील करतो. बघा देशाच्या विकासाला हातभार लावतो. आणि नोकरी नसलेल्या पोरांना हा मारण्याचा लघुउद्योग सुरु करून देतो. काय पटत नाही. या कधी गडचिरोलीत. दिसेल तुम्हाला. तुम्ही फ़क़्त बस स्थानकात उतरा. लगेच आमचा लालभाई तुम्हाला आमच्यापर्यंत आणेल. बघा जो पैसा घेतो. तोही आम्ही देशाकार्यालाच तर लावतो. आता या सगळया गोष्टी सरबतंम् बरोबर बोलून झाल्या. पण तो नुसतंच लाल कपड्याकडेच पहात होता. तुम्ही तरी काही तरी समजाल म्हणून बोललो. चला ‘जय माऊ’..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.