माझा आवडता खेळाडू


माझा आवडता खेळ ‘भ्रष्टाचार’. कारण, हा खेळ एकट्याने आणि सांघिक अशा दोन्ही पद्धतीने खेळता येतो. भ्रष्टाचार हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. माझ्या देशात हा खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. आताच होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी आमच्या सुरेशने हा खेळ खेळून जगभर त्यांचा नावलौकिक कमावला. या खेळातील ‘मास्तर ब्लास्टर’ तोच आहेत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. पण मला गारद गवार हा खेळाडू खूप आवडतो. तोच या खेळाचा खरा ब्रॅडमन आहेत.

बारामतीसारख्या लहानशा गावात गारदचा जन्म झाला. या खेळाडूचे कौशल्य पाहून त्याकाळचे वासंतदादानी त्यांना खऱ्या अर्थाने मैदानात आणले. आणि गारद अर्थमंत्री झाला. पुढे जाऊन मुख्यमंत्री बनला. त्यावेळी आलेली किल्लारी भूकंप निधीत त्याने हा खेळ असा काही खेळला की, अमेरिकेला सुद्धा याची नोंद घ्यावी लागली. त्याचा पुढे जाऊन खेळ बहरत गेला. आणि आता आयपीएल मध्ये त्याने त्याचे कसब दाखवून दिले आहे. आणि विशेषतः धान्य सडवण्याच्या सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचा उपयोग करून त्याने खेळातील श्रेष्ठत्व सिद्ध केल आहे. खेळाडूचे खिलाडू वृत्तीचे सर्व लक्षण त्यांच्यात आहे. एकदा भाईला भारतातून बाहेर नेण्यास मदत केली होती. पण त्याने खेळात याचा कधीच फायदा करून घेतला नाही.

मध्यंतरी शेतकरी वर्गात खूप आत्महत्या घडल्या. खूप टीका झाली त्यावर. परंतु त्याने न डगमगता आपले क्रिकेटचे क्रीडा आणि त्यातून आपला खेळ यशस्वी करून दाखवला. खेळाडू कसा असावा याचे एक उदाहरणच गारद गवारने दाखवून दिले आहे. खेळाडूने कितीही खेळले आणि कितीही विक्रम केले तरी त्यात समाधान न मानता खेळात सातत्य ठेवला पाहिजे. आणि हेच गारदने केले आहे. गारदने केलेल्या पराक्रमाने आज तो या ‘ध्रुवावर’ आहे. त्याने केवळ स्वतःचेच खेळ न उंचावता राष्ट्रवादी क्रीडा अकादमी उघडून अनेक खेळाडूंना राज्य आणि देशपातळीवर नेले आहेत. त्यातील छगु आणि आबा हे राज्यपातळीवर अनेक मोठे विक्रम केले आहेत. छगुचा स्टंप टाळा मध्ये त्याने केलेल्या यशस्वी खेळीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. तसेच आपला चेला पराजित पुण्यात नेट प्रॅटिस करीत असतो. आणि तिकडे बिल्लीत प्रफुल्ल विमानतळकर आणि सूले बाई आपल्या खेळाची प्रॅटिस करीत असतात. त्यामुळे मला गारद गवार खूप आवडतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.