माझी प्रतिक्रिया


मी माफी मागतो, मला येणाऱ्या प्रतिक्रियांना काहीच उत्तर देत नाही म्हणून. मी प्रतिक्रिया न देण्यामागे, मी फार मोठा किंवा वेळच नसतो अस काहीच नाही. उलट तुम्ही माझ्याशी बोलता. खूप चांगल वाटत. आनंद वाटतो. मलाही समजून घेणारे मित्र असल्याचा आनंद, निराळा आहे. मला येणाऱ्या प्रतिक्रिया माझ्यासाठी आदर्श आणि मार्गदर्शक असतात. मी माझ्या मित्रांशी या विषयावर गप्पा मारल्या तर ते ‘बोर’ करू नको असे म्हणतात.

काही तर त्यांची दुख: ऐकण्याचे मशीनच समजतात की काय याची शंका येते. माझी जी मोठी बहिणाबाई आहे ना! तिला माझ्या मनातलं अस काही सांगतो. पण तिला सगळ्याच गोष्टी कस सांगणार? आणि चुकून ‘ही आवडली’ असा विषय काढला तर ती ‘करिअर’कडे लक्ष देण्याचे सल्ले देते. मग बोलणार कोणाशी? आई वडील खूप चांगले आहेत. पण अगदी सुरवातीपासून, वडिलांशी बोलायची मला भीती वाटते. आणि आई म्हणजे आईच आहे. खर तर तुम्ही माझी हिम्मत वाढवली नसती तर, माझी तिच्याशी बोलायची उभ्या जन्मात हिम्मत झाली नसती. तुम्ही सर्वजण होतात म्हणून तर माझी गाडी चालू शकली.

आता अधून-मधून ती गाडी बंद पडते. आज देखील असंच! ती समोर आली की, बोलायची हिम्मत होत नाही. आणि नसली की तिला बघण्याची, बोलण्याची खूप इच्छा होते. ती आज पांढर्या रंगाचा ड्रेस मध्ये इतकी छान दिसते आहे ना! नुसते बघत रहावेसे वाटते आहे. आज कॅन्टीनमध्ये ती समोर होती. पण पुन्हा फूस! पण आजही मी बोलेलच! असो, तो विषय आता नको. मला सगळ्यांच्या प्रतिक्रिया नेहमी मान्यच असतात. मग ‘धन्यवाद’च्या फोर्मेलीटी कशाला? तरीही मला माहिती आहे कदाचित, माझे मत चुकीचे वाटत असेल. पण माझ्या मनात अस काहीच नाही. कृपा करून मला तुम्हाला कोणत्याच प्रकारचा दुखावण्याचा हेतू नाही. मी आजही तिच्याशी बोलण्याची हिम्मत करतो आहे. ती माझ्याशी कधी स्वतःहून बोलणार देव जाणे. मी सगळ्या प्रतिक्रिया वाचत असतो. पुन्हा एकदा हात जोडून क्षमा मागतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.