माझ्यासाठी


आला एकदाचा सोमवार. दोन दिवस दोन वर्षाप्रमाणे वाटले. अरे सांगायचे राहूनच गेले, रविवारी मला नेटवर अप्सराचा एक फोटो मिळाला. किती छान दिसते ती! रविवार दिवसभर तिच्या फोटोचाच अभ्यास केला. बस! बहिणाबाईला तो फोटो मेसेज केला. तिलाही ती खूप आवडली. उगाचंच बहिणाबाई, मला ‘नाय’ नाय करत होती. चला आता माझ्या घरून नकार होणार नाही. नाहीतरी अप्सरा इतकी छान आहे की, नकार होवूच शकत नाही. कालच मी माझ्या इमारतीच्या बिल्डरला फोन केला होता. आज संध्याकाळी जाणार आहे त्याच्या नवीन साईटवर. आता माझे घर आहे ना! ते दोन खोल्यांचे आहे. चारशे स्क़ेअर फुट. ठीक आहे.

पण अप्सराला आवडेल की नाही? म्हणून मी जर नवीन बांधकाम छान वाटले तर त्या बिल्डरला हे घर विकून आणि अजून काही रक्कम टाकून एक वन बीएचके खरेदी करेल. सध्याला माझी खरेदीची एवढीच ताकद आहे. तीला मी आवडलो तर, खूप छान होईल. सध्याला काय करू आणि काय नको अस झाल आहे. यावेळी बीसीएसाठी अभ्यास करीलच. आणि चांगल्या मार्कांनी पास देखील होईल. उगाचंच, तिला नंतर या विषयामुळे मनस्ताप नको. आणि हो, माझा व्यायामात देखील मी कालपासून डंबेल्स वाढवले आहेत. माझ्यात अस काहीच नाही, की ज्यामुळे तिला मी आवडेल म्हणून. निदान नुसता ‘हेमंत’पेक्षा ‘बलदंड हेमंत’ तिला नक्कीच सुट होईल. आणि नाही तरी आपण देवाला सुगंधी, छान, टवटवीत फुल अर्पण करीत असतो. सुकलेले फुल नाही. अगदी तसं!

एका जुन्या मराठी चित्रपटातील तो एक डायलॉग आहे ना की ‘स्त्री चे सौंदर्य हे त्यांचे सामर्थ्य असते. आणि पुरुषांचे सामर्थ्य हे सौंदर्य’. बरोबर आहे. सगळ अगदी छान चालू आहे. हे सगळ मी माझ्यासाठी करीत आहे. तिच्यासारखी इतकी छान मला मिळाली तर, दुसर्या कशाची गरज? काल रात्री मी दुध आणण्यासाठी दुकानात चाललो होतो तर मला माझी मैत्रीण दिसली. नेहमीप्रमाणे फोनवर! पण काल मला तिच्याशी जावून बोलायची इच्छाच होईना. मग पाहून न पाहिल्याप्रमाणे केले. काय करणार, अप्सरा सोडून कोणाशी काही बोलायची इच्छाच होत नाही. आणि दुसर्याशी कोणाशी अप्सरा सोडून दुसर्या तिसर्या विषयावर गप्पा मारण्याची देखील. काय करू काही सुचत नाही आहे. कालचा दिवसभर तो फोटो पाहून पाहून. झोपेत देखील मी संगणकावर फोटो पाहत आहे याचा भास व्हायचा. पण छान वाटत होते, ती माझ्या जवळ असल्याचा भास व्हायचा. कधी तो दिवस उगवणार?

काल म्हटलं ‘आजींचे भाषण’ टाकावे पण तेही नाही. मुळात मुडच येत नव्हता. दिवसभर बसून काही झाल नाही. कपडे धुवावे, तेही राहिले. सोडा, माझ्यासाठी देवाने इतकी छान अप्सरा दिली आहे. ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. फक्त आता तिला मी आवडायला हवा. आज मी तोच ड्रेस, पहिल्यांदी तिच्याशी बोललो ना! तोच काळपट रंगाचा शर्ट आणि काळी पॅंट घातला आहे. आज देखील तिच्याशी खूप बोलायची इच्छा आहे. थोडी हिम्मत वाढवावी लागेल बस्स! तिलाही इच्छा असेल तर देव पावला म्हणायचा. चला, ती येण्याची वेळ झाली आहे. नंतर बोलतो..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.