मास्कचे शहर पूणे


आज सकाळी आवरून निघायला उशीर झाला. त्यात लोकल जाते की काय याच टेंशन. घराला कुलुप लावून बाहेर निघालो तर जिकडे तिकडे सगळे हिरवे पांढरे मास्क घालून चाललेले लोक. आधी छोटी मुले त्यांच्या आई वडिलांबरोबर पाठीवर दप्तर, आणि त्यांच्या हातात हात. अशी आरडा ओरडा करत चाललेली नेहमी बघत आलेलो. बघून खुप छान वाटायचे. त्यांचे निरागस चहरे आणि कर्ण मधुर आवाज. सकाळ अगदी छान होवून जायची. पण आज त्याचे चेहरे मास्क मधे. आणि जणू काही कोणती मोठी दुर्घटना घडलेली अशी भयाण शांतता. कसा बसा मी स्टेशन वर आलो. पाहतो तर काय, सगळेच मास्क घातलेले.

मीच त्यात वेगळ वाटत होतो. कोणाकडेही बघा तो मास्क घातलेला. एखाद्या कड़े मास्क नसेल तर तो रुमाल चेहर्यावर लावलेला. मुली आपल्या नेहमी प्रमाणे स्कार्फ, पण विशेष गोष्ट म्हणजे आजी, काकूबाई देखील साडीचा पदर नाका तोंडावर. मी काही स्वप्न पाहतो आहे का असेच वाटायचे. पूणे स्टेशन वर उतरलो आणि बंडगार्डनची बस पकडली. कंडक्टरला पैसे देण्यासाठी त्याच्याकडे बघितले तर तो देखील पांढरे मास्क घालून उभा. माझ्या सारखे काहीच नसलेले बोटावर मोजान्या एवढेच. कोरेगाव पार्क चे काय वर्णन करावे. इथले भिकारी देखील मास्क घालून. ट्राफिक पोलिस, आमच्या कंपनीच्या बिल्डिंग चा वाचमन पण मास्क घालून.

कंपनीतुन निघाल्यावर रस्त्यावर एक तर मास्क वाले, नाही तर हेलमेट वाले. रात्रीची ७ ची लोकल हुकली. मग करायचे काय म्हणुन ए टी म् मधे जाण्यासाठी बघतो तर भली मोठीच्या मोठी रांग ती देखील मास्क वाल्यांची. लस्सी मारावी या उदेश्याने दुकानात गेलो तर तिथे दुकानदार, काम करणारे लोक सगळे च मास्क घालून उभे. जो तो कामापुराते मास्क काढायचा. नंतर पुन्हा घालायचा. स्टेशन मधे तर विचारूच नका. शेंगादाने विकणारे, वड़ा पाव, भाजी विकणारे एवढाच काय रिक्षा वाले देखील मास्क घालून. तिथल्या सायबर कैफेत पण सगळे मास्क घातलेले. बर ते मास्क पण अगदी साध, म्हणजे रुमलाचे कापड जसे असते तस. जर कोणता विषाणु आला तर तो देखील पोट धरून हसेल, जाऊ द्या, घरी जेवणासाठी आलो. आई घरी नसल्याने काका कड़े गेलो. घरी आल्यावर काकाला विचारले की माझी छोटी बहिण कुठे गेली. तर तो बोलला येईलच इतक्यात. ५-१० मिनिटाने ती आली आणि येताना दोन पिवाल्या रंगाचे मास्क घेउन आली. ते बघून माझ डोक खरच दुखायला लागल. आधी पुणेरी पगडी वगैरे असायचे. तेव्हा पगद्यांचे शहर म्हणुन ओळखले जायचे. आजच हे बघून कोणाला देखील पूणे हे मास्कच शहर आहे की काय असा भास होइल हे नक्की.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.