मित्रास पत्र


प्रिय राहुल बाबास,
सा.न. वि.वि. मागील महिन्याच्या आठ सप्टेंबरला तुझा वाढदिवस होता ना! चल मला ते माहिती आहे. तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पोळा पाहिल्यावर पत्र टाकणार होतो. पण काय सांगू आजकाल माझ्या आयुष्यात खूप बदल घडतं आहेत. त्यामुळे नाही जमलं. मग तुला फोनच करणार होतो. पण मध्यंतरी तुझा ब्लॅकबेरी चोरीला गेल्याची बातमी वाचली होती. आणि मेल चेक करायला तुला वेळ कुठे असतो तुला? प्लास्टिकची घमेली उचलण्यात तू खूप बिझी असतो, अस पहिले टीव्हीवर मी. म्हणून मुद्दामहून पत्र टाकत आहे. मध्यंतरी तू पुण्यात आला होतास. म्हटलं असते तर भेटलो असतो. बर माझ सोड. आठ सप्टेंबरला काय बुवा एका मुलाची मज्जा झाली असणार! फुगे काय, घेरू काय आणि झूल काय, सगळंच छान. अगदी हॅंडसम दिसत असशील. तू काय बाबा, आधीच इतका गोरा गोमटा. त्यात हे सगळ् पाहून गायीच काय म्हशी सुद्धा चेकाळल्या असतील. तुझे पराक्रम तर जगविख्यात आहे.

तू मध्यंतरी, मुंबईला आला होतास. लोकलचे तिकीट सुद्धा काढलेस. एकदा पुण्याच्या लोकलमध्ये सुद्धा ये ना. तुझ्या ‘सुदाम्या’ची इच्छा समजून. निदान तू येणाऱ्या दिवशी तरी ती वेळेवर येईल. नाहीतरी रोज ‘ढूंढते रहो’च असते. किंवा पीएमपीएमएलच्या बसमध्ये म्हणजे निदान ‘सेवा’ कशी असते याची देखील दाखल घेईल तुझी अम्मा. चल बाकी ते सोड, तुझ कसं चालले आहे? लग्नाचे कुठपर्यंत आले? म्हणजे तू अजून जवान आहेस. चाळीस म्हणजे जवानाच रे ‘राजकारणात’. मग यंदा कर्तव्य आहे ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव. त्या आठवलेचे काही ऐकू नको बर का! आठवले ना? बर चल ते सोड. तुझ मध्यप्रदेशातील ते ‘संघ आणि सिमी’ वरच विधान जाम आवडले. ए खुपंच हसलो बुवा. तू खरंच खूप विनोदी आहेस. बिहारमधील मत नक्की वाढली असतील रे.

अजून काही विधान सांगू का? अरे तू राजकारणी बाबा. पण माझ्याही कमी बुद्धीचे थोडं! पटले तर बोल. ‘शिवसेना आणि लष्करे तोयबा यात फारसा फरक नाही’. आहे की नाही विनोदी? अजून एक ‘राज आणि दाउद यातही फारसा फरक वाटत नाही’. मला माहिती आहे तुला नक्की आवडेल. तस् बोललं तर कॉंग्रेस आणि मुस्लीम लीग यातही काहीच फरक मला वाटत नाही. म्हणजे दोघांची कार्य एकच आहे ना. माझ सगळ् व्यवस्थित आहे. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. उगाचंच, ओरिसात तुला त्रास झालेला. आदिवासी देतात म्हणून खाल्लं पाहिजे अस नाही. पोटाचा त्रास कमी झाला का रे? चल तू कामात असशील. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुझ्या जरसी आईच्या चारही पायांना लोटांगण सांग. डॉ. नंदी सिंग सुद्धा माझा शिंग सांग. तुला भेट म्हणून घासाच्या दोन पेंढ्या कुरिअरने पाठवत आहे. माझी भेट!

तुझा दोस्त
हेमंत..

प्रति-
राहुल बाबा,
गुरांचा गोठा, १०/२० जनपथ,
दिल्ली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.