‘मिशी’ची हत्या


सांगतांना खूप वाईट वाटते आहे. दोन दिवसांपूर्वी माझ्या ‘मिशी’ची हत्या झाली. आणि आता तीच्या पुनर्जन्माची मी आतुरतेने वाट पहात आहे. त्याचे झाले असे. दाढी करतांना एक दोनदा माझ्या मिशीवर मी एक बाजूला ‘चुकून’ कापली गेली. सेट करण्यासाठी दुसऱ्या बाजूची देखील कापावी लागली. मग ती कमी होत होत ‘शत्रुघ्न सिन्हा’ची झाली. अजून थोडी कमी झाली असती तर ‘दबंग’ झालो असतो. माझ्या इमारतीत असलेल्या केशकर्तनालयात शुक्रवारी केस कापायला गेलो असता. त्या न्हाव्याने तिची हत्या करून टाकली. केस कापून झाल्यावर त्याला दाढी सुद्धा करून टाक म्हणालो. आणि त्याने माझी मिशी अशी का विचारल्यावर मी त्याला ‘चुकून’ झालेली चूक सांगितली.

माझ्या डोळ्यावर आणि कपाळावर चंदनाचा लेप लावला. आणि मग त्याने मला मिशी पुराण सांगून, त्यावर उपाय करतो अस म्हणाला. कोणता उपाय अस विचारल्यावर तो ‘थोडी कमी करावी लागेल मिशी’. मला काय माहिती हा एक घाव घालून माझ्या मिशीचे काम तमाम करील. ‘कर’ म्हटल्यावर, त्याने मशीनने ती घोटून घोटू इतकी बारीक केली. बारीक कसली. नाहीशी केली. ज्यावेळी तोंड धुवून पहिले त्यावेळी.. असो, त्याच्यासमोर ‘हा मुन्ना बदनाम झाला, न्हाव्या तेरे लिये’ अस नाचून म्हणावं वाटत होते. आरशात स्वतःला पहिले त्यावेळी दहावीचा मुलगा वाटत होतो. त्याला काही बोलणार, तर तोच म्हणाला की, आता आठवडाभर दाढी करू नकोस. आणि धमकीवजा इशारा दिला की मिशीला आता हात लावू नको. मी आपला गुणी बाळाप्रमाणे पैसे देऊन घरी आलो.

गेल्या तीन दिवसांपासून त्या आरशासमोर तीच्या पुनर्जन्मची आतुरतेने वाट पहात आहे. मित्रांना चेहरा दाखावला तर, ते तुझा न्यू लुक ‘अप्सरा’ला आवडेल. आता त्यांना काय सांगू. सोडा, आता जोपर्यंत ‘मिशी’ येत नाही, तोपर्यंत तीच्या समोर कसा जाऊ?? आता दाढी सुद्धा वाढली आहे. आणि मिशी आली नाही अस नाही. पण.. आधीच्या मानाने काहीच नाही. आणि माझा चेहरा मलाच आरशात पाहून खूप वेगळा वाटतो आहे. तर अप्सराने पहिला तर ती हसणार नाही कशावरून? खर सांगतो, खूप बेकार दिसतो आहे. आणि खूप बेकार वाटते आहे. याआधी अस कधी मिशी शिवाय राहिल्याचा अनुभव नाही. मिशी जाण्याचे दुख खूप मोठे आहे. मिशी कापल्याच्या दिवशी मी ‘व्हायरस’चे दुख अनुभवले. तीन दिवसांपासून रात्री झोपच आली नाही आहे. आणि दुखवटा म्हणून आज बुट्टी मारली आहे.

तसे अजून एक कारण आहे. कदाचित, अप्सरा काय विचार करेल याची भीती वाटते आहे. त्या मोठ्या कंपनीने माझा ‘टेलिफोनीक’ मुलाखत घ्यायचे ठरवले आहे. मी मागील शनिवारी माझा फोन बंद करून ठेवला होता. कारण, मी त्यांना थापा मारल्या होत्या. मला त्या गोष्टींचा अभ्यासासाठी एक आठवड्याचा अवधी हवा आहे. आणि मला विश्वास आहे की मी, ती मुलाखत चांगल्याप्रकारे देवू शकेल. माझ्या कंपनीत बसून माझा अभ्यास होणे शक्य नाही. तिथे मला हवे ते सोफ्टवेअर आणि अभ्यासासाठी हव्या असणाऱ्या साईट एक्सेस करता येणार नाही. असो, ‘मिशी’च्या दुखात दोन मिनिटे मौन पाळूयात..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.