मिशी


मिशी ही गोष्ट खूप जुनी आहे. अगदी सर्व धर्माच्या प्रेषितांच्या जन्माआधी ‘मिशी’चा जन्म झाला. यावर सर्व धर्मांचे एकमत होईल. सोडा. मिशीमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. अगदी सुरवातीला येणारे ‘मिसरूड’. विशीत असणारी थोडी दाट लव. त्यानंतर मग मात्र जाड मिशा. म्हणजे लोकमान्य टिळकांसारख्या. पिळदार मिशा, तलवारी प्रमाणे, बारीक अगदी रेघे प्रमाणे, चार्ली चाप्लीन/ हिटलर यांची देखील मिशी. असे अनेक प्रकार आहेत. आजकाल मिशी न ठेवणे हाच प्रकार रूढ झालेला आहे. काय म्हणतात ‘युथ आयकॉन’चा एक प्रकार. पण आधी ज्याला मिशी राखता येत नसे तोच ठेवायचा नाही.

मिशी म्हणजे पुरुषाचे लक्षण अस आधी म्हटलं जायचं. पिढी दर पिढी मिशी कमी होत गेली. आणि आता बहुतांशी मिशी नसलेले पुरुष बाकी. ते मानवाच्या उक्रांतीच्या वेळी शेपटीच्या बाबतीत घडलं तस. तशी मिशी ठेवणे आणि ती सांभाळणे हे देखील एक कसब आहे. दोन्ही बाजूची मिशी एकसारखी असायला हवी. नाहीतर उगाचंच वेगळ वाटत. त्यांची जाडीपासून ते दोन्ही बाजूच्या लांबीपर्यंत दोन्ही बाजू समसमान असायला हवी. मिशी हा शुरतेचा मापदंड आणि पुरुषाचा सौंदर्याचा एक भाग मानला जायचा. म्हणजे शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या व्यक्तिमत्वाला शोभा आणणारी गोष्टीमधील ही एक ‘मिशी’. अगदी महात्मा गांधीजी पर्यंत, भगतसिंगने सुद्धा मिशी मेंटेन केलेली.

मी अकरावीत असतांना आम्हाला इंग्लिश विषयाला एक नवीन शिक्षक शिकवायला आलेले. पहिल्या आठवड्यात आले त्यावेळी मिशी होती. आठवडाभर ठेवली. आणि पुढच्या आठवड्यात मिशी उडून टाकली. मग सुरवातीला पाहिलेले. आणि दुसऱ्या आठवड्यात एकदम वेगळंच वाटायला लागलेलं. सर्वजण हसायचे त्यांना. तासात सर्वांचे लक्ष त्या मिशी नसलेल्या ठिकाणीच. त्यांनाही आणि आम्हाला सुद्धा विचित्र वाटायचं. त्यामुळे एकतर मिशी ठेवायची. नाहीतर अगदी मिसरूड नंतर उडवून टाकायची. नाहींतर अस लाजिरवाणे होते. किंवा आधी कधी नाही ठेवली. आणि नंतर ठेवायचा प्रयत्न केला तरीही हाच अनुभव येतो. त्यामुळे मिशी ठेवायची हा प्रत्येक मुलाचा (मुलाचाच कारण मुलींना मिशी कुठे असते??) महत्वाचा निर्णय असतो. आता सगळे थोडीच ‘बाबा’ असतात. एका राज्यात दाढी मिशी. आणि दुसऱ्या राज्यात घोटून टाकायला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.