मी आणि माझा ब्लॉग


यार, काय बोलू? प्रतिक्रिया वाचून हसावं की रडावं अस होते आहे. माझा ब्लॉग माझी भलतीच इमेज बनवतोय. कधी ज्योतिषी, कधी इतिहासकार तर कधी कधी हा ‘हेमंत’ वेडा. खर तर ‘हेमंत’ ना ज्योतिषी ना इतिहासकार. ‘वेडा’ म्हटल्यावर माझी काही हरकत नाही. कारण, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विषयात वेडा असतोच.

त्यामुळे, भविष्य कथन करण्याएवढी माझी योग्यता नाही. इतिहासाबद्दल बोलाल तर, शालेय अभ्याक्रमात जे शिकलो. आणि जे वडीलधार्या व्यक्तींकडून जे ऐकले. तेवढंच! बाकी ‘शून्य’. एका ‘छोट्या’ कंपनीत काम करणारा एक ‘छोटा’ व्यक्ती. यापलीकडे माझ्यात वेगळेपण अस काहीच नाही. ब्लॉग सुरु करतांना, मी अस काही स्वतःला ‘जसा आहे तसाच’ दाखवण्याच्या प्रयत्न करीत होतो. जे वाटत ते बोलत गेलो. पण, रोजच्या प्रतिक्रिया पाहून वेगळ वाटत आहे. गोंधळून टाकण्याचा किंवा सतावण्याचा यात माझा मुळीच हेतू नव्हता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.