मी एक मूर्ख


खूप आधीपासून बोलायचे होते. पण नेहमी मी टाळत होतो. म्हणजे अगदी त्या इमेलच्या प्रकरणाच्या वेळी. मागील मराठी दिनाला मी एक ओळीचा इमेल टाकला होता. त्यावर पुढे काही जणांनी त्या मेलचा वापर त्यांच्या ब्लॉगच्या प्रसिद्धीसाठी करून घेतला. तेव्हाच एकीने ‘मूर्ख आयटीवाला’ अशी पदवी दिली होती. तेव्हाच माफी मागितली होती पण अनेक ब्लॉग बंधूंनी माझी हवी तशी आणि हवे त्या भाषेत त्यांची मते दिली होती. आणि ती मते मला मान्य देखील होती. कारण ती चूक माझ्यामुळेच सुरु झाली होती. प्रत्येकाला हवी ती आणि तशी मते मांडण्याचा अधिकार आहे. आणि मला देखील ते मान्य आहे. मी देखील माझी मतेच मांडत असतो रोज. फरक फक्त इतकाच की मी, फक्त माझ्याच बद्दल बोलतो. मला काय वाटले, माझ्यासोबत काय घडले. बस्स! यापलीकडे मी जातच नाही. आणि गेलो तरी जेवढ्यापुरते तेवढेच.

जास्त स्वताचे ज्ञान! म्हणजे मी ज्ञानी आहे अस मला बिलकुल म्हणायचे नाही आहे. मी एक मूर्खच आहे. नव्हे तर महामूर्ख आहे. बघा ना! मला कधीच चारोळी, कविता किंवा देशात काय घडले पाहिजे. लोकांनी काय केले पाहिजे. कर किंवा देशाचे संरक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे. यावर कधी बोलतच नाही. काय खाल्लं, काय केल. यावर बोलतो. आता समाज किंवा देश, धर्म यावर बोलत नाही. म्हणून कदाचित माझ्या नोंदी ‘अर्थहीन’ असतील. कदाचित काय आहेतच. बरोबर आहे. मला गर्लफ्रेंड नाही म्हणून मी काहीही बोलायला नको. मी स्वतःला ‘आवरा’यला हवे.

असो, माझ्या ब्लॉग मित्र आणि मैत्रिणीची… आता ते मानतात की नाही देव जाणे. पण त्या सर्वांची मी महामूर्ख हात जोडून माफी मागतो. तुम्हाला त्रास झाला. त्याकरिता मी तर खरा क्षमेचा देखील पात्र नाही आहे. पण तरीही तुम्ही क्षमा मागतो. माझ्यामुळे मराठी ब्लॉगचा स्तर घसरला. मराठी भाषेत ‘अर्थहीन’ नोंदींचा कचरा वाढवला. यापलीकडे मी काहीच नाही केले. आणि हे सर्व मला मान्य आहे. आणि माझ्या नोंदींना काहीच ‘दर्जा’ नसतो हे देखील मान्य. पण मुर्खाकडून दर्जाची अपेक्षा करणे हे देखील मूर्खाचेच लक्षण आहे म्हणा! तरी माझी सर्वांना हीच विनंती आहे, की आपण यापुढे घडणाऱ्या माझ्या ‘अर्थहीन’ नोंदीना क्षमा करावे. कारण उगाचंच तुम्ही, मी कसा आणि किती मूर्ख आहे यावर नोंदी लिहिण्याचा त्रास घेणार. आणि मी त्या वाचून नाराज होणार. आता खर तर मला कोण आवडते, काय आवडते किंवा माझे मत महत्वाचे नाही. आजी काय करतात किंवा इंडिया पुढच्या सामन्यात काय करणार यावर चर्चा महत्वाचे आहे. पण मी त्या गोष्टींवर कधीच काही बोलणार नाही. मग तुम्हाला ते आवडणार नाही.

कारण माझ्यासारखा महामूर्ख स्वतःची अक्कल पाजळणे योग्य नाही अस मला वाटते. तरी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की, कृपा करून माझ्याकडून त्या ‘एक्स्पर्ट’ नोंदींची अपेक्षा ठेवू नका. अर्थहीन नोंदींची अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.