मी कोण?


परवा आमच्या चिंचवडमधील एका मुलीवर झालेल्या बलात्काराची बातमी वाचली. आता तर खुपंच बेकार वाटत आहे. हिंजवडीच्या घटनेनंतर मुळात मन उदास झालं आहे. त्यात ह्या घटनेने अजूनच मन गोंधळून गेल आहे. सगळी आपली माणस. जिच्यावर तो प्रकार घडला ती आणि तीच्या आई वडिल काय परिस्थितीत असतील. असा विचार मनात सारखा येतो. आणि मग आपणच याला जबाबदार आहोत असे वाटते. त्या ‘भोसले’ला ‘चौरंगे’ करावं अस सारखं मनात येत आहे. फार फार काय होईल? पण निदान समाज चिडू शकतो ही तर कळेल. असो, जर सरकारने त्याचा ‘चौरंगे’ केला नाही आणि मोकळा सोडला तर मी देखील ‘चाफेकर’ बंधूंच्या शहरात राहतो हे नक्की दाखवून देईल. रामाच्या, शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायच्या आणि गप्प बसायचं, हे कोणी सांगितलं? रक्त खवळते, मन जागरण गोंधळ घालते. डोके प्रतीहल्याच्या योजना बनवते. मग अजून किती वेळ ‘निर्जीव’ असल्याचे नाटक करायचे. माझ्या शहरातील मुलींवर कोणीही कधीही आपली हौस भागवायची. आणि सगळ्यांनीच बघ्याची भूमिका घ्यायची.

बस्स! कसाबचे लाड कसेबसे सहन केले. पण आता नाही सहन होत. म्हातारा होऊन मरण्यापेक्षा हे असले राक्षस मारून मरणे जास्त उत्तम. देवाच स्तोत्र म्हणायचं. देशाची प्रतिज्ञा म्हणायची कशासाठी? आपल्या मनातील होणारा उद्रेक दाबण्यासाठी. कोणी ना कोणी याला प्रत्युतर द्यावेच लागेल. आता सरकार त्या राक्षसांना यमसदनी पाठवेल, अशी देवाचरणी नाही सरकारचरणी प्रार्थना करतो. आणि एक सुजाण नागरिकाची असल्याची प्रचीती देतो. पण जर तो ‘भोसले’ नावाचा राक्षस जामिनाच्या नावावर पुण्यात मोकाट फिरतांना सापडला. तर मग त्याच वरच तिकीट त्याला नक्की मिळेल. आणि जर चिल्लर शिक्षा सरकारने दिली तरीही त्याला ‘देवाघरी’ पाठवण्याची व्यवस्था मी स्वखर्चाने करेल. पुढंच पुढे बघुयात.

पण सध्यातरी ‘मी कोण?’ हाच प्रश्न सतावतो आहे. नोकरी करणे फ़क़्त यासाठी देवाने आपल्याला जन्माला नक्कीच नाही घातले. स्वामी विवेकानंद, किंवा शिवाजी महाराज नाहीतर ज्ञानेश्वर महाराज यांनाही काही ना काही उद्येशाने पाठवले असणार ना. त्यांच्याही काळात अशा घटना घडतं असतील. जर राजे वाडवडिलांनी दिलेले किल्ले आणि जहागिरी सांभाळत बसले असते. तर किती वाईट अवस्था झाली असती. आपल्या प्रत्येकाच्या लहानपणी आपण महाराजांच्या आणि रामायणाच्या गोष्टी नक्की ऐकल्या असतील. आता याच गोष्टी का? दुसऱ्या पऱ्यांच्या आणि न घडलेल्या रम्यकथा का नाही सांगितल्या? कधी कधी वाटत आपल्या घरच्यांना आपण शिवाजी महाराज व्हावं, किंवा निदान त्यांचा साधा मावळा व्हावं अस वाटत असणार. नाहीतर असल्या गोष्टी वर्षानुवर्षे मनावर परिणामकारक नसत्या होवू शकल्या. मुंबईवरील हल्ला, पुण्यातील हल्ला आणि आता हे बलात्काराच्या घटनांची मलिका काय दर्शवते? आता हे अस शांत राहणे म्हणजे ‘स्पिरीट’ असेल तर, पाण्यात आणि स्पिरीटमध्ये फरक काय उरला? म्हणजे शेळीला सिंह म्हणण्यासारखे झाले.

असो, मनात असे अनेक गोंधळलेले प्रश्न येत आहेत. आणि मी यामुळे शांतपणे बसून राहणे कठीण झाले आहे. मला खरंच या भुईला भार बनण्याची इच्छा नाही आहे. मनात अनेकदा ‘काही तरी करावं’ अशा इच्छा होतात. नुसतं प्रेक्षक किती दिवस बनायच? आणि काही करता येत असून देखील दुसरा कोणीतरी करेल याची कशाला वाट पाहायची. सरकारला नाव ठेवून काय फायदा नाही. शेवटी ‘मतदार तसे सरकार’. ‘पांढऱ्या पेशीचे’ काम मी नक्की पार पाडील. मी मृतपेशीचे सोंग अजून किती दिवस करायचे? जर राक्षस सुटले तर त्यांना ‘परलोकात’ पाठवण्याचे सत्कार्य करायला मला नक्की आवडेल. मग सरकारने खुशाल ‘मी कोण?’ चा तपास करावा. हवं असल्यास ‘अहवाल’ तयार करत बसावे. मग कळेल..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.