मुकामार


आता रात्री जेवायला हॉटेलात गेलो होतो. जेवण यायला वेळ लागेल म्हणून तिथला एक वेटर सांगून गेला. खर तर खुपंच भूक लागलेली. माझ्या समोरच्या बाजूच्या एका टेबलवर एक कपल बसलेले. तसे दोघेही छान होते. अंतर फारसे लांब नव्हते. दोघांच्या गप्पा स्पष्ट ऐकू येत होत्या. ती मुलगी त्याला सांगत होती की मी तुझा फोटो घरच्यांना दाखवून लगेच डिलीट करील. आणि तोही हसून तीचा आणि त्याचा मोबाईल घेऊन काहीतरी करीत होता. बहुतेक फोटो तीच्या मोबाईलमध्ये पाठवत होता. नंतर मी लक्ष दुसरीकडे दिले तर एक मुलगी फोनवर. खाता खाता तीच्या फोनवर एकदम बारीक आवाजात गप्पा चालू होत्या. हे दोघे फारच गुंग झालेले. मी ऐकायचे टाळून सुद्धा, त्यांच्या गप्पा ऐकू येत होत्या. आणि त्यात तो वेटरही लवकर जेवण घेऊन येईना. शेवटी वैतागून मी, तिथून निघून घरी आलो. येतांना दुध आणि आम्रखंड आणले.

आजकाल, रोजचं अस चालू आहे. दुपारी कॅन्टीनमधून येतांना मित्र भेटला. तो मध्यंतरी एका मुलीच्या प्रेमात पडलेला. त्याने मागील आठवड्यात तिला प्रपोज देखील केला. आणि तीच्या ‘नकार’ नंतर देखील खुश होता. मला बऱ्याच टिप्स दिल्या. असो, खर तर त्यावेळीही तिची आठवण येत होती. ती नाही आली कॅन्टीनमध्ये. मागील दोन आठवड्यांपूर्वी माझा एक जुन्या कंपनीतला माझा मित्र माझ्याकडे आलेला. साहेब मुंबईकर, एका पुणेकर मुलीच्या प्रेमात पडलेले. सहा महिने सोबत होते. पण बोलायची हिम्मतच झाली नाही. आता तिने कंपनी बदलली. तीच्या शोधात आलेला. ती भेटलीच नाही. आणि त्यामुळे हा नाराज होऊन पुन्हा मुंबईला गेला. कंपनीतून मी आज लवकर निघालो.

बसमध्ये माझ्या कंपनीतील एक मित्र भेटलेला. तो निगडीला रहातो. आज त्याच्याकडे लक्ष गेल्यावर साहेबांनी दाढी वाढवलेली. खर तर इतकडे दिवस पाहून आजच लक्षात आले. त्याला कारण विचारल्यावर त्याने हसून टाळले. असो, त्याच्या डोळ्यातूनच सगळ् कळत होते. साहेब उदास. म्हणजे हा नेहमी रोज सकाळी यायचा. पण बसमध्ये एक मुलगी याला भेटलेली. तेव्हापासून लेट मोर्निगच्या बसला यायला सुरवात झाली याची. दोघेही एकमेकांशी चांगले गप्पा मारायचे. म्हणजे बस कंपनीतून निघाल्यापासून ते निगडी येईपर्यंत. आजकाल ती दिसत नाही ह्याच्यासोबत. बहुतेक तीने याला नकार दिला असेल. म्हणजे त्याचं दोघांचे वागणे पाहून मी अस म्हटलेलं. यार सगळे प्रेमात कसे काय पडत आहे? का मलाच अस वाटत आहे?

माझा एक मित्र आहे. त्याला एक त्याची मैत्रीण सारखी मेसेज, फोन करीत असते. हा गडी गडबडून गेला आहे. तिच्यापासून लांब असतो. अजून एक माझ्या लेट मॉर्निंगच्या बसला एक कपल असते. आणि संध्याकाळच्या बस ला सुद्धा. हिर रांझाची जोडी. पण आजकाल त्यातला ‘हीरो’ स्वतःला काय समजतो काय माहित. नायिकेला भावच देत नाही. तीही बिचारी उदास बसते. असो, मला त्यांच्याबद्दल काही वाटत नाही. पण त्यांना पाहिल्यावर मला माझा विषय उफाळून येतो. रोजचं हा मुकामार सहन करावा लागतो. आणि मग मी त्यांना पाहून तीच्या आठवणीने उदास होतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.