मूर्खपणा


मी ना खूप मोठा मूर्ख आहे. सोमवारी माझ्या जुन्या कंपनीतील मैत्रिणीला फोन केला होता. माझ्या संगणकावर एक सोफ्टवेअर टाकायचे होते म्हणून. मी तसा प्रयत्न करून बघितला. पण काहीही केल्या ते होईच ना. आता तीने तीच्या संगणकावर केल होत म्हणून तीला फोन केला. तीने सांगितल्याप्रमाणे सुद्धा नाही झाल. शेवटी ती म्हणाली, तुला या शनिवारी माझ्या घरी तुझा संगणक घेऊन येशील का? म्हणजे मला नेमका कुठे अडचण येते आहे ते समजेल. खर तर या आधी कोणत्याही मैत्रिणीने अस मला तीच्या घरी बोलावलं नाही.

काही वेळासाठी मला माझ्या स्वतःवर विश्वासच बसेना. ती खरच खूप छान आहे. म्हणजे फ़क़्त दिसण्यावरून म्हणत आहे अस नाही. या आधी ज्या ज्या मुलींना मी भेटलो. त्यांना संगणकाची माहिती नव्हती अस नाही. पण त्यांना कामाचा कंटाळा. सगळ आयात द्या. स्वतःहून काही करायची इच्छाच नाही. पण ही माझी जुन्या कंपनीतील तशी नाही. उलट तीच्यामुळे मी बऱ्याच नव्या गोष्टी शिकलो आहे. काल दुपारी मी तीला उद्या कधी येऊ विचारण्यासाठी फोन केला. त्यावेळी ती सांगत होती तीला दुपारी तीच्या लहान बहिणीला कुठे तरी सोडवायला जायचं आहे. तीला म्हणालो मग मी सकाळी लवकर येतो. नाही तर संध्याकाळी येतो. नाही तर रविवारी येतो. आणि तेव्हाही जमणार नसेल, तर  मी शोधतो काहीतरी. ती म्हणाली तसं नको तू उद्या सकाळी ये. बर म्हणून मी फोन ठेवला.

संध्याकाळी मोठ्या बहिणीचा वाढदिवस होता. तिथून आल्यावर खर तर खूप झोप येत होती. झोपण्याच्या विचारात होतो. एकदा पुन्हा प्रयत्न करून बघू  म्हणून संगणक चालू केला. ते  सोफ्टवेअर आणि विंडोज च्या फाइल्स चेक केल्या. विंडोजच्या एका फाईल मध्ये छोटासा बदल केला. आणि सोफ्टवेअर पुन्हा टाकल. तर ते झाल. हे अचानक कस घडल. काही कळलं नाही. म्हणून पुन्हा बदल केलेली विंडोज फाईल पहिल्या प्रमाणे केली. तर पुन्हा तोच प्रोब्लेम. मग कळलं. असो, पण माझ काम झाल म्हणून आनंद होण्यापेक्षा दुख वाटायला लागल. एक तर नवीन कंपनीत माझ मन लागत नाही आहे. जुन्या कंपनीची इतकी सवय झाली आहे ना की खूप आठवण येते आहे. कधी कधी अस वाटत की पुन्हा त्या कंपनी जाव. सकाळपर्यंत मला अस वाटत होते की ते सोफ्टवेअर काढून टाकावे आणि संगणक घेऊन तिच्या घरी जावे. तीला भेटता आले असते. आणि तीच घर सुद्धा पाहता आल असत. पण माझ मन कस खोट बोलणार. मी ना कशाला काल संगणक चालू केला आहे अस वाटत आहे. खूपच बेकार वाटत आहे. खूप मोठी चूक केली असल्यासारख वाटत आहे.

तीला आज सकाळी फोन केला आणि सोफ्टवेअर नीट काम करीत आहे, अस सांगितलं. तिलाही विश्वास बसेना. मला कस केल म्हणून विचारलं. मला माहिती आहे मी फ़क़्त तिचा मित्र आहे. अजून काही नाही. तीला माझ्या बद्दल काहीच वाटत नाही आहे. माझ्या मोठ्या बहिणीला तीच्या बद्दल सांगितलं तर ती म्हणाली ‘तुझी मैत्रीण आपल्या जातीतली आहे का?’. सोडा तो विषय. ती पुढे सांगत होती की ‘मी सगळ्यांना सांगितलं की तू येणार म्हणून’. बहुतेक तीलाही आवडल नाही. काय कराव? हा मूर्खपणा का केला. इतकी छान संधी मी वाया घातली. आता आमची मैत्री इतकी वाढलेली नाही की मी तिला कुठे तरी भेटायला बोलवील. आणि म्हटलं तरी ती येईल. खर तर अस झाल खूप छान होईल. पण होईल की नाही हे देव जाणे. तसं चुका आणि चुका करण माझी खासियत आहेच. पण अशी अगदी शेवटच्या क्षणाला घडलेली चूक फारच दुखादायक होती. जाऊ द्या आज खूप वैताग आला आहे. आज संध्याकाळी माझ्या नवीन कंपनीची पार्टी आहे. जाव लागेल. नंतर बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.