म्हणे आम्ही मुली


मी ज्या कंपनीत काम करतो तिथे माझ्या सोबत काही मुली(?) काम करतात. आता त्या म्हणतात कि आम्ही मुली आहोत. स्त्रिया आणि मुली यातला फरक काय? या प्रश्नाचे उत्तर देणे अगदी सोपे आहे. साधारणत आपल्या समाजात लग्न झाले कि मुलीला स्त्री मानतात. आता काहीना हे मान्य नसेल. आणि मला सुद्धा मान्य नाही. जी मुलगीला मुले झालेले आहेत, तिला तर आपण GIRL किंवा मुलगी कस मानायचं? हाच प्रश्न मला पडलेला आहे. माझ्या कंपनीत ह्या नियमाने एक दोन सापडतील. पण कंपनीतील उरलेल्या सगळ्या स्वत: ला मुली म्हणवून घेतात.

बर त्यांच्या एकूणच शरीर यष्टीवरून तर त्या मावश्या वाटतात. पण सोडा, प्रत्येकाला आपण तरुण आहोत असाच वाटत. कोणीही आपण आता आपल तारुण्य संपत आलेलं आहे किंवा आपण आता एक पुरुष किंवा स्त्री आहोत हे मानायलाच तयार नाही. निदान आमच्या कंपनीत तरी नाही. आधी एक सहकारिणी आमच्या कंपनीत काम करायच्या. त्यावेळी मी नवा होतो त्यामुळे जुने असलेल्यांना मी सर किंवा मैडम म्हणायचो. त्यावेळी मी त्या मैडमला मैडम म्हटलं कि राग यायचा. सुरवातीला मला काही कळल नाही कि ह्या रागावतात. नंतर ज्यावेळी कळल कि ह्या मैडम म्हटल्यामुळे रागावल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कंपनी सोडली होती. असो पण त्यांना बघून कोणीही तेच म्हटलं असत.

आज घरी येताना लोकल मध्ये एक मुलगी बघितली. खर तर तिच्या हातात एक सुंदरस बाळ होत. आणि बरोबर एक व्यक्ती. आणि हो तिच्या गळ्यात मंगळसूत्र देखील होत. यावरून मी समजलो. पण तिला एक मुल असून देखील ती महाविद्यालयीन तरुणी वाटत होती. आता ती लग्न होवून देखील एक महाविद्यालयीन तरुणी वाटत होती, त्याला मी काय करणार. आणि कंपनीतील सगळ्याच काकू आणि मावश्या वाटतात. तर ह्याला मी तर काय करणार? जस दिसतात त्यावरूनच आपण विचार करणार. बर पण हे मान्य कराव न तर ते नाही. स्वत ला मुली म्हणवून घेतात. ह्या काय मुली वाटणार ह्या तर दोन मुलींच्या आया वाटतात. नाही तरी हे फ्याड काही नवीन नाही. आणि प्रत्येकीला मी अजून लहान आहे. मी अजूनही तरुणी आहे. अस वाटतच. पण सत्य देखील मानायला हव. आज माझ वय जर २५ असेल तर मी आज तरुण आहे. काही वर्षांनी ज्यावेळी मी ४५ चा होईल त्यावेळी तुम्ही मला काका म्हणाले तर मी काय अस रागवायचं? कि मी अजूनही मुलगा किंवा तरुण आहे? वस्तुस्थिती मान्य करण यात काही चूक नाही. आणि आपण आता जवान राहिलेलो नाही. किंवा आपण आता वयाच्या अशा वळणावर आहे कि जिथे आपण एक स्त्री किंवा पुरुष संबोधले आहे, तिथे आपण आपला अस चुकीचा ग्रह करून घेणे कितपत योग्य आहे? पण हे ज्याच त्याला कळायला हव.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.