यंदाच कर्तव्य आहे..


माझा ना आज काम करायचा बिलकुल मूड नाही. काय मस्त विकेंड गेला आहे म्हणून सांगू! असो, फार पिळत नाही. माझ्या लग्नाची तारीख फिक्स झाली आहे. वीस मे. गेल्या शनिवारी ‘बोलणी’चा कार्यक्रम होता. माझे आई वडील, मावशी, काका आणि आमचे बंधुराज हजर होते. ती, तिचे काका, मामा, आई वडील जवळपास सर्व नातेवाईक आलेले तिचे. मस्त एकदम. सुरवातीला साखरपुड्याची तारीख ठरलेली. म्हणजे १४ मे ला साखरपुडा आणि काहीतरी २ जूनच्या आसपास लग्नाची तारीख ठरवलेल. पण नातेवाईकांना डबल चक्कर होणार, म्हणून दोन्ही कार्यक्रम एकत्रच करूयात अस सगळ्यांच मत पडलं. मग २० मे ही तारीख सर्वांनुमते ठरली.

खर तर तारीख ठरवतांना मला जाम बोर झालेलं. पण गेले दोन दिवस असल मस्त वाटत आहे ना. रविवारी ती आणि तिचे नातेवाईक घरी आलेले. तिची लहान बहिण जाम मस्त आहे. म्हणजे माझ्या लहान बहिणी सारखी मस्तीखोर. आणि ह्या माझ्या ‘मॅडम’ म्हणजे टिपिकल आहे. पण छान. ती खूप हुशार आणि समजूतदार आहे. माझ्या मित्रांनी सांगितलेलं की, लग्नाचे फिक्स झाले की तिच्याशी बोलत जा. जेणेकरून तिला तू तिची काळजी घेतोस अस वाटायला हव. पण गेल्या दोन तीन दिवसात तिची माझी फार काळजी अस वाटत आहे. शनिवारी घरी आली तेव्हा ती स्वत:हून भाजी चिरायला घेतलेली. माझ्या आईला मदत केली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की, कुठेच नाटक करते अस वाटलं नाही. मला ‘तुम्ही’ म्हणत होती.

आज सकाळी मेसेज करून विचारात होती की ‘मी तुम्ही म्हणून की तू?’. हाहा! हे तर सोडाच सकाळी तर ‘तू खुश आहेस ना?’ अस विचारलं. मी थोड्या वेळासाठी गडबडलेलो. तिला विचारलं ‘तू अस का विचारते आहेस? मी आनंदी नाही अस वाटते का?’ तर म्हणाली, ‘नाही, तस् नाही. मी ज्या व्यक्ती सोबत पूर्ण आयुष्यभर असणार. तो माझ्याशी सोबत असल्याने आनंदी आहे की नाही’. काय यार, कसली आहे! म्हणजे पुढे जाऊन आमच्या गप्पा फारच ‘रोमेंटीक’ मोड मध्ये गेलेल्या. ती आणि त्यांच्या घरचे खूप खुश आहेत. खुशीला पारावारच उरलेला नाही. आणि खर सांगू का? दुसऱ्याच्या आनंदात मिळणारा आनंद खूप मोठा असतो. म्हणजे गेल्या तीन दिवसापासून, ती माझ्याशी बोलायला खूप अधीर असते.

काल रात्रीसुद्धा फोनवर गप्पा मारतांना किती किती हसत होती. मेसेज तर खच झालाय माझ्या मोबाईलमध्ये. मला मान्य आहे की, मला जरा जास्तच ‘सुंदर’ स्थळांचा होकार होता. पण काय करू? मला अशी हवी होती. जिच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेऊ शकेल. मला अशी हवी, जी माझ्यासाठी ‘वेडी’ असेल. जी माझ्यासाठी अधीर असेल. फक्त मीच तिच्यासाठी. आणि ती? अस मुळीच नको. पण मला आता मी घेतलेला निर्णय योग्य असल्याच जाणवते आहे. ती अगदी तशीच आहे. इतकी छान की, लग्नासाठी साडी घेतांना शालू घेऊ की पैठणी अस विचारलेलं. खर बोलायचं झाल तर शालू आणि पैठणी म्हणजे नेमक काय हे मला माहित नव्हत. वेळ मारून नेली. एक गोष्ट सांगू. हे सगळ वूवू आहे. हे मी आधी पाहिलेलं आहे. एकूणच आजकाल अगदी स्वप्नात असल्याप्रमाणे सगळ घडते आहे. आता ती गोष्ट वेगळी की, माझ्या बहिणाबाई आणि माझ्या इतर बहिणींचा विचार न घेता हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या सर्वजणी नाराज आहेत.

मला त्यावेळी लग्न विषयावर बोलायची बिलकुल इच्छा नव्हती. सोडा ते. काल मी गाडी पार्किंग मधून काढतांना पडली. आणि उजव्या बाजूचा आरसा फोडण्याचा पराक्रम केला. आणि मित्र मैत्रिणींच तर काही विचारूच नका. कंपनीतही तसचं. सर्वजण खूप खुश आहेत. घरात तर आनंद उत्सव चालू आहे. कारण एकच यंदाच कर्तव्य आहे ना. पण एक गोष्ट आहे. माझ्या मॅडम एमसीए तिसऱ्या वर्षाला आहे. मी चुकून आधी दुसऱ्या वर्षाला म्हणालेलो. तिला या डिसेंबरपर्यंत कॉलेजला जावे लागेल. त्यामुळे मॅडमचा विरह सहन करावा लागेल. पण एकूणच छान चालू आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.