योग्य क्षेत्र


जीवनाच्या प्रवासात मागे वळून पाहिले की अनेक टप्पे दिसतात. शालेय जीवन व त्यापुढील ध्येयाचा/क्षेत्र कडे प्रवास! आयुष्यात काय करायचं आहे हे ठरवावं अस म्हणतात. परंतु माझ्या बाबतीत हे कधी घडलं नाही.

उलट जे काही ठरवलं ते कधी घडलं नाही. त्यामुळे नियोजन करणे अथवा विचार करून एखाद्या गोष्टीवर काम करणे हे सगळं अशक्यच वाटे. दहावी पास झाल्यावर वडिलांच्या सांगण्यावरून पुणतांबा येथील सरकारी कॉलेजात प्रवेशासाठी नंबर लावला. पण भविष्य वेगळेच होते. नंतर कॉलेजमध्ये वडिलांच्या सांगण्यावरून संस्कृत विषयावर बी. ए ची पदवी करण्याचा घाट घातला. आधी म्हटल्याप्रमाणे तेही पूर्ण झाले नाही.

मग का कसे संगणक क्षेत्रात आलो आणि यातच रमलो ते माहीत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे. प्रत्येकाच्या जीवनात अनेक टप्पे असतात. व तो एक जीवनाचा भाग आहे. जीवन अनेक पैलू समोर आणते. प्रत्येकवेळी हेच आपल आयुष्य आपण मानतो परंतु त्याला कलाटणी कधी मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे निर्धोकपणे व चिंता विरहित वर्तमानात रहा. तुमचं जीवन तुमच्या योग्य त्या क्षेत्रात योग्यवेळी नेऊन ठेवते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.