राँग नंबर


काय बोलू अस झालं आहे. काय चालल आहे हे? आधी मैत्रिणीचे टेन्शन कमी होते की काय म्हणून आता तीच्या सिनिअरचे टेन्शन अजून आले आहे. यार ती तिची सिनिअर थोडीच ‘हेमंत’ आहे, की झुरत बसायला. मला तर आता, ती प्रपोज करील की काय अशी भीती वाटायला लागली आहे. तिचे वागणे एका आठवड्यापासून एकदमच बदलुन गेले आहे. सारखी माझ्याकडे पाहते. नुसती पहात नाही तर एकटक पाहते. साधे मी इकडून तिकडे जात असेल तर तिचे लक्ष माझ्याकडेच. काल दुपारी कॅन्टीनमध्ये तिला पाहून न पाहिल्यासारखे केल. तर ते पाहून तीचा एकदमच चेहरा उतरून गेला. नंतर मलाच खूप बेकार वाटलं.

परवा कंपनीतून निघालो. माझ्या समोरून तीच्या डेस्ककडे चाललेली. माझ्या जवळ आल्यावर सगळ् लक्ष माझ्याकडे. माझ्या पुढे जायला तिला जागा दिली. आता समोर तोंड करून चालायचे ना. तर माझ्याकडे लक्ष देत चाललेली. शेवटी मीच मान खाली घालून गेलो. आधी मला संशय होता. पण कालचे तिचे वागणे पाहून खात्री पटायला लागली आहे. कालही असंच, तिच्याशी मॅनेजर बोलत होता. मी वॉशरूमकडे चाललेलो. तिचे सगळे लक्ष माझ्याकडेच. आधी वाटलं होत, ती टाईमपास करीत आहे. पण या आठवड्यात तिचे वागणे पाहून खरोखर ती सिरीअस झाली आहे का अशी शंका येत आहे. दुपारी मित्रांना तिच्याबद्दल सांगितले तर, एक म्हणाला ‘बोनस आहे’. आणि दुसरा म्हणाला ‘तुला काय फरक पडतो आहे. पहिले तर पहिले’.

पण यार, मला कोणालाच दुखवायचे नाही. पण तीच्या सिनिअरला माझ्यात अस काय दिसले? तेच कळेनासे झाले आहे. अस काही अप्सराला का काही दिसत नाही?. तीच्या सिनिअर मध्ये सर्व गोष्टी आहेत, ज्या एखादया मुलाला हव्या असतात. दिसायला सुंदर आहे. रंगाने गोरी गोरी पान. स्वभावाने चांगली आहे. एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर आहे. आणि स्वतःच्या सौंदर्याचा तिने कधी गैरवापर केलेला नाही. आता याचा अर्थ असा काढू नका की, मला तीच्या बद्दल काही वाटते आहे. मला फक्त फक्त अप्सराच हवी. मी जिचा शोध घेत होतो. ती आता मला मिळाली आहे. आणि तिच्याशिवाय दुसरी तिसरी कोणी नको. पण यार, मला या गोष्टीची चिंता आहे. कदाचित त्या सिनिअरने काही अतिरेक केला तर.. अप्सरा काय विचार करेल? काय करू? काल ती इतकी छान ना! माझ्या मनातलं कसं ओळखते? मी नोंद टाकली आणि एक सेकंद सुद्धा झाला नसेल तर अप्सराने स्वतःहून पिंग करून गुड मॉर्निंग केले. किती गोड आहे ती.

काल तीच्या हसण्याने दिवस खूप छान गेला. काल मी तिला एक मेल पाठवला. दिवाळीच्या शुभेच्छांचा होता. त्यात अस लिहिलेलं की, दिवाळीच्या अडव्हान्स शुभेच्छा देतो आहे. आणि एक छोटीशी गिफ्ट देखील. आणि स्क्रोलिंग केल्यावर एक पाचशे कोटीची एक नोटचा फोटो. आता फोटोशॉपमध्ये करता येण शक्य आहे. आणि त्या खाली आभाराची गरज नाही अस लिहिलेलं. तिने त्यावर ‘थांक्स’चा रिप्लाय मेल केला. किती गोड आहे यार. तिनेही एक मेल पाठवलेला. मस्त! आणि त्यात माझे नाव सुरवातीला. आणि काल डोळेभरून तिला पाहता आल. पण यार, तीच्या सिनिअरच्या वागण्याने मी गोंधळून गेलो. तसे हे असे वागणे मिस्ट्रीचे. पण हे आजकाल राँग नंबर लागत आहे. टेन्शन वाटत आहे. मी काहीच न करता ह्या सगळया गोष्टी घडतं आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.