राजकारणी, क्रिकेटर आणि कलाकार


राजकारणी, क्रिकेटर आणि कलाकार मागील काही दिवसांपासून ह्या तीन गोष्टींनी खूप वैताग आणला आहे. काय कळत नाही, की आपण सगळे आणि मुख्य म्हणजे हे मिडीयावाले एवढा काय मोठेपणा देतात. काही दिवसांनी बहुतेक राजकारण्यांचे क्रिकेटर आणि कलाकार यांच्या प्रतिमा लावतील. आणि ह्या सगळ्यांचे वाढदिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतील. देशावर रोज पाक हल्ले करतो आहे. कधी नकली नोटा, कधी बॉम्ब हल्ले आणि कधी कधी आपल्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करतो आहे. आपले जवान त्यांच्याशी लढताना शहीद होत आहे. रोज नक्षलवादी देशात कोणाची ना कोणाची हत्या करतात.

पण या गोष्टी घडत असताना आपण त्या क्रिकेटचे सामने पाहण्यात आणि चित्रपटांची गाणी गुणगुणण्यात दंग असतो. क्रिकेटचा सामना हरला तर आपल्या येथील अनेकांना रात्री झोपा येत नाहीत. तिकडे आपले सैनिक मरतात. आणि आपण निदान ते होते. आणि का शहीद झाले याचा साधा विचारही करत नाही. या असल्या बातम्यांपेक्षा राजकारणी लोक कुठेही आणि कधीही वाट्टेल ते बरळतात. कालच आपले मुख्यमंत्री कसाबला त्याला बचावाची संधी द्यायला हवी अस म्हणाले. मला वाटत आहे, की आपल सरकार पाकच्या आतंकवाद्यांची वाट पाहत आहे. की ते आपल्या येथील एखाद्या दोघांचे अपहरण करतील आणि बदल्यात कसाब मागतील. आणि आपले गृहमंत्री त्या कसाबला मेजवानी देऊन पाकिस्तानमध्ये सरकारी खर्चाने पाठवतील. आणि आपले मिडीयावाले ह्यावर चर्चा करत बसतील. आणि त्यांच्या ह्या चर्चेच्या गुऱ्हाळात भारत किती सहिष्णू आणि मोठ्या मनाचा आहे हे तात्पर्य निघेल. नाही तरी कसाबला आपल्या मिडीयाने ‘हीरो’ म्हणून बनूनच टाकले आहे. आपण फ़क़्त बघत बसायचे.

तिकडे ते क्रिकेटर एक शतक किंवा एखादा कप जिंकला की ‘महान’ अशी बिरुदे जोडायची. त्यावरही हे मिडीयावाले त्याच्या करिअरचा इतिहास उगाळून अगदी लोकांना पाठ होत नाही तो पर्यंत दाखवत बसायचा. आणि आपण ढम्म पणे पहायचा. भाववाढ, रस्ते, पाणी, वीज ह्या समस्या आपल्या सगळ्यांच्या आजोबा पणजोबापासून चालत आलेल्या समस्या. त्या त्यावेळेसही सुटल्या नाहीत. आणि आता सुटेल याची अपेक्षाही न केलेलेच बरे. काय चालल आहे आपल्या देशात. देश आपला म्हणायचा आणि तिकडे विदर्भाची वेगळी मागणी करायची. बर मुंबई सर्वांची म्हणायची. आणि मग मुंबईचे प्रश्नावर आणि तिथल्या समस्यांकडे लक्ष कोणी द्यायचे? बिहारींनी मुंबई वाचवली म्हणणारे राहुल हे मुंबईत दोन चार गल्ल्या आणि दोन स्टेशन मधून लोकलने फिरले तर त्यांनी लोकांची मने जिंकली अशा बातम्या येतात. आणि भाववाढीने, कर्जाच्या ओझ्याने मेलेल्या मनांचे काय? तो प्रश्नाचा जवळही कोणी जात नाही. आणि आपण कसल्या विश्वात जगात आहोत.

आमच्याकडे चालायला अजून रस्ते नाहीत. वीज आणि पाणी यांचा विषय तर सोडूनच द्या. आणि आयटीमध्ये पुढे आहोत, विमान प्रवास स्वस्त आहे, याच्या बढाया मारायच्या. ते राजकारणी विकासाच्या थापा मारतात आणि आपण ऐकतो. इथे साध रेशन देऊ शकत नाही. आणि मोनोरेल आणि स्कायवॉकवर गप्पा मारायच्या. आकाशात क्षेपणास्त्रांची चाचणी करायची. आणि पोलिसांना साधी बुलेटप्रुफ जाकीट नाही. सरकारी कर्मचारी जणू काही त्यांचा पिढीजात सावकारी व्यवसाय असल्याप्रमाणे वागतात. काम न करण्यात आणि हाडतुड करण्यात मोठेपणा मानतात. आणि आपण फ़क़्त बघ्याची भूमिका घेतो. काय महत्वाच आणि काय उपयोगाच यातील फरक आपण करू शकत नाही. पाक आपला हाड वैरी आहे. आपल्या सहिष्णुतेच्या आणि एकतर्फी प्रेमाचा काय उपयोग? त्यांनी आपले भाऊ बहिणी मारायच्या आणि आपण त्यांच्या खेळाडूंना ‘पाहुणे’ म्हणायच. काय चालल आहे? आपण सगळ एवढ सहन करतो. निर्ल्लज आणि भेकड आहोत बहुतेक आपण सर्व. अजून काय बोलू. आपल्या मुख्य प्रश्नात आपणच लक्ष घालायला हव. आपले निर्लज्ज राजकारणी, आणि त्याचबरोबर बिनडोक मिडीयावाले आपल्याला नुसत झुलवत आहेत. काय उपयोग आहे त्या प्रतिभा पाटीलचा? सांगा मला. तिच्या पेक्षा एखादा गल्लीत गोट्या खेळणारा मुलगा नीट व्यवस्थित न्याय करेल. आमची ही बाई, महिला विकास सोडून दुसर काही बोलतच नाही. विजेचे साध बिल भरलेली नाही अजून तीन. तो दुसरा मनमोहन. कायम रडका चेहरा. कधी बघाल तेव्हा तसाच. बस आता इथे थांबतो. नाही तरी मी जे बोलतो आहे हे तुमच्याही मनात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.