राज इज बुलशेट


परवा म्हणजे बुधवारी कंपनीत जेवणाच्या वेळी माझ्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना मी राज ठाकरे दसऱ्याला नगरला आला होता. त्याची सभा मस्त झाली अस म्हटलं. आमच्यातील एकाला काय झाले कुणास ठाऊक. मला त्याने विचारले की तुला राज ठाकरे आवडतो ना. मी त्याला म्हणालो माझा त्याच्या कृतीला पाठींबा आहे. तो जे बोलतो तो ते करतो म्हणून मला तो आवडतो. बाकी उद्या मराठीचा मुद्धा घेऊन सोनिया जरी उतरली तरी मी तिला आणि तिच्या पक्षाला चांगले म्हणेन. बहुतेक त्याला माझे म्हणणे पटले नाही. तो मला म्हणाला की ‘म्हणजे मराठी बोलणार्याने महाराष्ट्रात राहायचं, बाकीच्यांनी नाही. नाही तर तुम्ही त्याला मारणार’. त्याचा आवाज आणि त्याच्या एकूण राग रंगावरून तो बहुतेक जाम चिडला होता. मला म्हटला ‘सगळे भारतीय आहेत. पण तुम्ही मराठीच्या मुद्द्यावरून वाद घालता. मारहाण करता. ते नेते लोक हिंदू मुस्लीम यात वाद वाढवतात. ते सगळ मतासाठी करतात. मतासाठी आणि सत्तेसाठी मराठी मराठी करतात’.

खर तर मला हे कळत नव्हत की ह्या मराठीच्या द्वेषाच्या शिळ्या कढीचा उत आता का येतो आहे. बर हा माझा सहकारी मराठी. पण हा असा का बोलतोय हेच कळायला मार्ग नव्हता. त्याला म्हणालो मला जे अनुभव आले त्यावरून मला तरी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतो ते योग्य वाटत. कारण मी मुंबईत असताना मला असे अनेक अनुभव आले आहेत.’ त्याचे आपले तुणतुणे चालूच ‘हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे. आणि तुम्ही त्याचा विरोध करता’. त्याला म्हटलं ‘काही महिन्यांपूर्वी मला वाडिया कॉलेजच्या पुलापाशी एक माणूस भेटला. त्याने मला काही तरी विचारलं, पण मला समजेच न की हा काय बोलत आहे. मी त्याला ‘काय?’ असा प्रश्न केला. त्याने परत काही तरी सांगितले. पण तरीही समजेना. थोड्या वेळाने लक्षात आले. की तो मला इंग्लिश मध्ये ‘व्हेअर इज आयनॉक्स?’ अस विचारात होता. त्याच्या बोलीवरून तो चेन्नईकर वाटला. त्या लोकांची बोलण्याची पद्धत खूप वेगळी असते त्यामुळे मला समजायला वेळ लागला. आता बघ तो चेन्नई म्हणजे दक्षिण भारतीय त्याला मराठी येत नाही. आणि मला त्याची भाषा. त्याला आणि मला दोघांनाही माहिती आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. पण त्याने इंग्लिशचा वापर केला. मग तो जर हिंदीचा वापर करत नसेल तर तो देखील चुकीचा म्हणावा लागेल. आणि तोच काय दक्षिणेतील लोक इंग्लिश किंवा त्यांची भाषा याचाच वापर करतात’. माझा सहकारी पुन्हा सुरु झाला ‘भाषा हे काय आहे एक माध्यम आहे. मग कोणतीही वापरली तर काय बिघडत?’. मग त्याला मी म्हणालो ‘बरोबर आहे’. अगदी खर सांगायचं झाल तर मी न या मराठी आणि नॉन मराठीच्या विषयाला खूप कंटाळलो आहे. मी विषय संपण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो काही विषय संपवण्याच्या रंगात वाटत नव्हता. मी मुंबईत असताना राज ठाकरेंच्या आंदोलन आणि माझ्या तिथल्या अनुभवाविषयी सांगितले. पण त्याचे काही समाधान झाले नाही.

मग मी म्हणालो ‘माझा मुंबईचा पहिला दिवस होता. मी सीएसटी बाहेर उभा होतो. रात्रीचे साडे अकरा वाजले होते. आता मला पुण्याची सवय मोबाईलमध्ये कधीच पैसे न ठेवण्याची. तिथले सगळे क्वाईन बॉक्स बंद झालेले. आणि मलाही मुंबईतमधील काही माहित नव्हत. मला माझ्या मावशीकडे जायचे होते आणि तिच्याकडे माझा मोबाईल नंबर नव्हता. पाऊस पण जोरात सुरु झालेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मला कंपनीत हजर व्हायचे होते. आणि बस पण येत नव्हती. तिथल्या एका ट्याक्सी वाल्याला विचारलं की ठाकूरद्वार चालणार का?. बर मराठीत विचारलं तर त्याला समजेना म्हणून हिंदीत विचारलं. तर त्याने पन्नास रुपये होतील म्हणून सांगितलं. मागच्या ट्याक्सी विचारायला सुरवात करताच पहिला त्याला पंजा दाखवायला लागला. मग काय तो पण पन्नास रुपये होतील म्हणाला. आता ते ग्रुपिंग करून फसवायला सुरवात करत होते. आता ज्या ठिकाणी बसने चार रुपये तिकीट आहे अशा ठिकाणासाठी पन्नास, मला तरी जास्ती वाटत होते. शेवटी शेअर ट्याक्सी करून गेलो. दहा रुपये लागले.’ आता अस म्हटल्यावर सहकाऱ्याने पुन्हा त्याचे हिंदी प्रेम सुरु केले. की ‘मला देखील मराठी ट्याक्सीवाल्याने माझ्या बायकोकडे बघून मनपा ते पुणे स्टेशनला यायला शंभर रुपये सांगितले होते. म्हणजे काय सगळेच मराठी वाईट?’ मी त्याला त्या लोकांच्या पद्धती आणि वागण आपल्यासारख नाही अस देखील सांगितलं. पण तो काही एकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

शेवटी त्याच्या मनातल सगळ त्याने ओकल ‘राज ठाकरे जे बोलतो ते सगळ बुलशेट आहे. तो फ़क़्त मतासाठी सगळ करतो आहे. त्याला काही मराठीसाठी देणे घेणे नाही. राज इज बुलशेट’. त्याच अस बोलून समाधान झाल. त्याचा चेहरासुद्धा खुलला होता. त्याच्या दृष्टीने हा विषय संपला होता. खर तर मला त्याचा बिलकुल राग येत नव्हता. कारण आपले मराठी लोक खरच खूप प्रेमळ असतात. कोणाला देखील ते आपण त्या जागी असतो तर अस समजून त्याला मदत करतात. मुंबई लोकलमध्ये धक्के खाणारा, कोणीही बुटावर बूट ठेऊन उभे राहिले तरीही न चिडणारा. एकटा असेल तर रडका चेहरा करून आणि आपली दुख पिऊन उदास असणारा मराठी असतो. हे माझ्या एका वर्षाचा मुंबईतील अनुभवावरून पक्क माहित झाल आहे. त्यामुळेच माझा सहकाऱ्याच्या बोलण्याने मला काही नवीन किंवा चुकीचे अस काहीच वाटत नव्हते. प्रत्येकच मत प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबर असते. अस माझ मत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.