राज ठाकरेंचे आंदोलन आणि मी


ही गोष्ट २००८ मधील आहे. त्या वेळी मी फोर्ट मधील (मुंबई) एका छोट्याशा सॉफ्टवेर कंपनीत कामाला होतो. आणि रहायला बोरिवलित. बोरीवली ते चर्चगेट असा माझा दररोजचा प्रवास. मुंबईचे आकर्षण कोणाला नाही? कंपनी तुन सुटल्यावर घरी जाण्याची घाई कधीच नसायची. लवकर घरी जायचे असे पण काही नसायचे.  मुख्य म्हणजे मी रहायला मावशीच्या जुन्या घरात असल्याने तिथे मी एकटाच. म्हणतात ना ‘एकटा जीव सदाशिव’ त्यातली गत होती. कंपनीतुन मला निघायला ७ वाजायचे. आणि बोरिवलित पोहचयाला ८- ८:३० व्हायचे. लोकलला कायम गर्दी. पण कधीही त्याचा तिटकारा वाटला नाही.

आणि वाटणार पण नाही. जेवण करून घरी जायला ९:३० व्हायचे. तर असा माझा दिनक्रम असायचा. कंपनीत कधी कधी जास्त काम असले किंवा उशिरा जाणे झाले तर मात्र थांबावे लागायचे. त्यावेळी जेवण करून घरी जायला १२- १ वाजून जायचे. कंपनीत अशी काही ठरवलेली वेळ नव्हती. कधीही या आणि ८ तास पूर्ण करून घरी जा, हाच नियम. आणि कधी कधी मी गेट वे ऑफ़ इंडिया ला जून बसायचो त्यावेळी घरी जायला उशीर व्हायचा. असो, लोकलचा अनुभव तुम्ही सगळ्यानीच घेतलेला असेल. दुःख फक्त या गोष्टीचे असायचे की मी मराठीत काही विचारले किंवा बोललो तर लोकल मधील इतर लोक मला “मराठी नाही समझता हिंदी में बात करो” असे म्हणायचे. मला त्यांचा राग यायचा. पण काय करणार कोणालाच मराठी येत नव्हती.  २००८ च्या सुरवातीला राज ठाकरे यांचे विक्रोली येथे भाषण झाले. मी काही ते पाहिले नाही आणि मला काही त्या बद्दल काही वाटले पण नाही. पण एवढी चर्चा ऐकायला मिळाली की काही तरी राज ठाकरे बोलले. राज यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळेपासून मला त्यांच्या बद्दल अनादराची भावना होती. की आपल्या पित्यासमान काकाला धोका दिला.

आमच्या कंपनीत माझा सीनियर हा यूपी वाला होता. खर तर तो मागच्या ५ वर्षापासून मुंबईत रहायला होता पण तो स्वताला कधी महाराष्ट्रात राहतो अस समजत नव्हता. त्याने नेहमी एकच मी मराठी नाही. मी मराठी शिकणार नाही आणि कधी बोलणार पण नाही. आणि मला त्याची गरज पण नाही. काय करणार तो माझा सीनियर असल्याने मी काही त्याच्याशी वाद घालायचो नाही. आणि मला कधी असाही वाटल नाही की त्याने मराठी बोलावे. कारण माझा आणि त्याचा संबंध कामा पुरताच. आणि तो मराठी बोलल्याने तसा माझा काहीच फायदा नव्हता.त्यावेळी मी टाईम्स ऑफ़ इंडिया नियमित वाचायाचो. खर तर मुंबई शांत होती, पण त्यात उगाचच जणू काही मोठा आगडोम्ब. बातम्या अशा की मराठी मुद्द्यावरून माणसे एकमेकांचे खून पाडतात अशा.

मी रेलवे स्टेशन वर बघायचो, कंपनीत किंवा होटल मधे कुठेच असा वाद होताना मला त्यावेळी दिसत नव्हते. नंतर पुन्हा एक बातमी वाचाली की, राज ठाकरे अस म्हणाला की जर महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे. वाचून खर तर आनंद झाला की चला कोणी तरी बोलले. पण राज ठाकरे बद्दल माझे काही मत बदलले नाही. मुंबईत मला कुठला पत्ता हवा असेल तर कोणाला मराठीत विचारले तर तो बोलायचा “क्या?, बॉम्बे में नये आये हो क्या?”. म्हणजे काय की मराठी बोलणारा इथे नविन. राग यायचा पण काय करणार.

शेवटी भड़का उडाला. राज ठाकरे यानी दोन दिवसाची मुदत दिली की, मुंबई मराठी माणसाची आहे. जर इथे रहायचे असेल तर मराठी बोला. नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु. एखाद्या साध्या बातमी प्रमाणे ती बातमी त्यावेळी मला वाटली. माझ्या सीनियर वाचून म्हणाला “ऐसे बोहोत आके गए’. मी देखील राजकारणी लोक कसे असतात हे माहिती असल्याने वाचून सोडून दिले. पण दोन दिवसाने ज्या गोष्टी बघितल्या त्याने विचारच बदलून गेले. राज यांचे आंदोलनाचा पहिला दिवस म्हणजे तोड़ फोडिचा. दुसर्या दिवशी मी बघितले की दादरला लोकल अडवन्यात आल्या.  एक म्हण आहे “बोले तैसा चले त्याची वन्दावी पाउले” पुढे नंतर राज ठाकरे ना पकड़न्याच्या  दिवशी तर काही विचारूच नका. राज ला पकडले अशी बातमी एखाद्या आगीप्रमाणे पसरली आम्हाला लवकर सुटी देण्यात आली. बाहेर येउन बघतो तर,  सगळी कड़े धावापल . दुकाने बंद होत होती, बस, आणि नेहमीची वर्दळ नव्हती.

माझा मित्र मला म्हणाला की cst वरुन दादर पर्यंत जाऊ तिथून बोरीवली पकडू. मी आणि तो दादरला पोहचलो तर दादर बंद झालेले. लोकालाला फुल गर्दी. चढायला जागाच नाही. पाउण तास नंतर आम्ही लोकल पकडली. बोरिवलित ९ वाजता पोहचलो. स्टेशन बाहेर येउन बघतो तर सगळ सामसूम. ना फेरीवाले, ना दुकाने ना गर्दी आणि ना होटल. सगळे बंद. मग काय करणार करावा लागला सक्तिचा उपास. त्यावेळी मला मुंबईकरांचे मराठी प्रेम पहायला मिळाले. की ते जर चिडले तर काय करू शकतात. पुढच्या दोन दिवस लोकल मोकळ्या. त्या दिवशी दादर, कल्याण, बोरीवली, ठाणे अशी सगळी महत्वाची ठिकाणे बंद होती. खर तर मला मराठी भाषेबद्दल अभिमान आणि प्रेम जागृत व्हायला ते आंदोलन कारणीभुत ठरले. मी आता पर्यंत कधी कोणत्याच राजकीय किंवा सामाजिक आंदोलनात सहभाग घेतला नाही. आणि तशी इछा पण झाली नाही. मला राज ठाकरे चांगले की वाईट या, किंवा त्याचे आंदोलन मराठीसाठी की मतासाठी  यावर बोलायाचे नाही.पण जो कोणी आपल्या भाषेबद्दल, आपल्या प्रश्नावर लढत असेल तर, त्याने वापरलेली पद्धत यापेक्षाही त्याची बाजु घेणे अधिक महत्वाचे आहे. आणि जर आपल्याला त्याची बाजु आवडत नसेल तर त्याला विरोध करण्यापेक्षा काही  बोललेले बरे. मला तरी असे वाटते की प्रत्येक जण त्याच्या मेहनितेने मोठा होतो. तो जे काही आहे ते त्याच्या मेहनितेने आहे. आपण देखील आपल्या मेहनितेने आहोत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.