रामाने फळे आणली.. मिडीया स्टाईल


आजच्या मिडीया / भेडिया ‘रामाने फळे आणली’ या वाक्याची बातमी करायची झाल्यास…

सकाळ – अखेर रामाने फळे आणली.

महाराष्ट्र टाईम्स – रामाने फळे आणली?

लोकमत – नाईलाजास्तव रामाने फळे आणली.

सामना – रामाने फळे आणली. सर्वत्र जल्लोष.

पुढारी – रामाने फळे, फुले आणली.

टाईम्स ऑफ इंडिया – रामाने केवळ फळेच का आणली?

डी एन ए – रामाने फळेच आणली.

टाईम्स नाऊ – रामाने फळे कशासाठी आणली?

आज तक – ब्रेकिंग न्यूज : रामाने फळे आणली..

दूरदर्शन – राम आज फळे घेऊन आला.

आय बी एन लोकमत – रामाने टोपलीभर फळे आणली.

झी चोवीस तास – झी चोवीस तास इफेक्ट : रामाला फळे आणावीच लागली.

एन डी टीव्ही इंडिया  – राम फळे घेऊन परतला.

इंडिया टीव्ही – रामाने परत फळेच आणली..

आस्था – रामाने फळांची भेट आणली..

मिडीया 🙂


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.