राशी


माना अथवा नका मानू. पण हा ‘राशी’ विषय खूप मजेदार आहे. आता मी काही यातला पंडित नाही. पण जे अनुभवले तेच बोलतो. माझे अनेक मित्र आमचा यावर विश्वास नाही बोलतात. पण त्यांना त्यांची रास माहिती असते. मध्यंतरी असंच नेटवर सर्वात जास्त हिटिंग कुठल्या विषयावर होते ते पहात होतो. तर, सेक्स, खेळ आणि नंतर राशी. बापरे! आई इथे आली की, रोज येणाऱ्या सकाळ वर्तमान पत्रातील फक्त भविष्य वाचते.

असो, थोडक्यात, एक खूप मोठ्या ‘आकर्षणाचा’ विषय आहे. साधारतः मेष राशीवाल्यांची चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, ए पासून नावे सुरु होतात. वृषभ राशी वाल्यांची ई, यु, इ, ओ, वा, वी, उ, वे, वो. तर मिथुनला का, की, कु, घ, अं, छ, के, को, हा. आणि कर्क राशीच्या नावांची सुरवात ही, हू, हे, दा, दि, दे, दो. सिंह राशीच्या नावांची सुरवात मा, मी, मु, मे, ता, ती, तू, ते. कन्या राशीची तो, पा, पी, पू, श, थ, पे, पो. तूळ राशीच्या नावांची रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते. वृश्चिक राशींची तो, ना, नी, ने, नो, या, यी, यु. धनु राशींची ये, यो, भा, भी, भू, धा, फा, टा, भे. मकरची भो, जा, जी, खी, खु, खे, गा, गी. कुंभ राशी गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, द. मीन दि, दु, ठ, थ, झ, यां, दे, दो, चा, ची अशा नावांनी सुरवात होते. आता अस काही नाही की, अमुक रास असल्यावर त्यातलाच शब्दांनी सुरवात असलेली हवी. अनेक जणांची नावे वेगळी आणि रास वेगळी असते. शेवटी हा इच्छेचा प्रश्न आहे. माझ नाव राशीतील शब्दावर ठेवलं आहे. प्रत्येक राशीची स्वतःची एक ओळख आहे. आणि प्रत्येक राशीत स्वतःचा स्वभाव.

आता राशी भविष्य खूप वेगळा विषय आहे. आणि त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण हे सगळ असलं तरी शेवटी प्रत्येक जण जितका चांगला असतो तितकाच तो वाईट देखील असतो. फक्त आपण तो दाखवत नाही. पण रास आणि स्वभाव यात मला तरी फार संबंध आहे असा वाटतो. म्हणजे माझे मित्र, मला भेटलेल लोक. त्यांचे वागणे, बोलणे. एकूणच त्यांचा स्वभाव आणि रास यात खूप साम्य वाटल. प्रत्येक राशीला एक चिन्ह आहे. खर तर चिन्हाच सर्व राशीचे वर्णन करून टाकते. माझी रास कर्क आहे. त्याचे चिन्ह ‘खेकडा’ आहे. खेकडा एखादी गोष्ट पकडली की, ती सोडत नाही. कर्क राशीवाल्यांचे देखील असेच आहे. लवकर कोणत्या गोष्टीत माघार घेत नाही. मी जे कंपनीत काम करतो. ते करतांना होत नसेल तर सोडून देतो किंवा होवूच शकत नाही, अस कधीच करत नाही. मी जे मराठीत टाईप करतो आहे. ते शोधायला सहा महिने लागले. आता असे प्रत्येक राशीत असा एखादा खूप चांगला गुण असतो.

मेष मध्ये कामात गर्क राहणे. दुसर्याचे ऐकणे. मितभाषी. वृषभ राशीचे मेहनती असतात. आणि निर्णय खूप कमी वेळा बदलतात. मिथुन मुळातच हुशार आणि कलात्मक असतात. खूपच प्रेमळ असतात. सिंह रास नावाप्रमाणेच असतात. अधिकार गाजवणे हे त्यांच्या स्वभावातच असते. मला आलेले पहिले स्थळ. ती जी होती ना. ती सिंह राशीची. सुरवातीला तिच्या घरच्यांनी होकार नंतर नकार दिला. पण हिने पुन्हा नकाराचा होकार करून घेतलेला. असो, हे तिनेच मला सांगितलेलं. आणि का ‘हो’ आणि का ‘नकार’ आणि का पुन्हा ‘होकार’ इतिहासासकट सगळा वर्णन केलेलं.

असो, कन्या राशीचे खूपच लाजरे, भावनिक असतात. सौंदर्यवान असतात. तूळ राशीचे निर्णय योग्य देतात. भेदभाव नाही करीत. त्यांचा स्वभाव रोखठोक असतो. वृश्चिक राशीचे खूपच स्पष्टवक्ते असतात. एखाद्याला राग आला तरी चालेल पण ते निर्णय बदलणार नाहीत. धनु बद्दल काहीच बोलायला नको. कारण त्यांनी एकदा कोणता निर्णय केला की तो फुल आणि फायनल असतो. मकर राशीचे चांगले कलाकार आणि कष्टाळू असतात. कुंभ राशीचे व्यवहारी असतात. मीन राशीचे तर्क चांगले करतात. कुठलीही गोष्टीचा फायदा तोटा यावर सखोल विचार करू शकतात. असो, यावर पूर्णपणे विश्वास ठेवावा अस माझ काही नाही. राशी आणि भविष्य हे एक संकेत आहे. अगदी तसच असेल किंवा असायलाच हवं अस काहीच नाही. फक्त एक वेध आहे. माझाही हेच मत आहे की, पूर्णपणे बुडून यावर विश्वास घातकच होवू शकतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.