राष्ट्रीय प्राण्यांची ओळख २०१३


आपल्याला राष्ट्रीय पक्षी माहिती असेलच. आज आपण, राष्ट्रीय प्राण्यांची ओळख करून घेऊ. गेल्या वर्षीच्या एकूण आढावा व ओळख घेऊन आज या राष्ट्रीय प्राण्याची निवड केलेली आहे. आता जसा चित्रपटात ‘ऑस्कर’ हा पुरस्कार मानला जातो. तसे देशातील तमाम प्राणी समुदायात, या ‘राष्ट्रीय प्राणी पुरस्कारा’ला आगळे वेगळेच महत्व आहे.

राष्ट्रीय मुकबधीर प्राणी – ह्या पुरस्काराचे मानकरी आहेत, ‘मनमोहन सिंग’. मी सोनियाजींचे, आभार मानतो की, आपण अशा मुकबधीर व्यक्तीला देशाच्या ‘पंतप्रधान’पदी विराजमान केले.

राष्ट्रीय माकड – ह्या पुरस्कार कोणाला द्यावा यावर बरीच चर्चा झाली. गेली अनेक वर्षे यावर ‘दिग्विजय सिंह’ हेच एकमेव याचे विजेते होते. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वीच्या महान अजरामर अस वक्तव्य केल्याने या वर्षीचा राष्ट्रीय माकड हा पुरस्कार ‘सुशीलकुमार शिंदे’ यांना देण्यात येतो आहे.

राष्ट्रीय बैल – राहुल गांधी यांना हा पुरस्कार गेल्या वर्षात काहीच न केल्याबद्दल देत आहोत.

राष्ट्रीय हत्ती – ह्यावेळचा हा पुरस्कार महाराष्ट्र जलसंपदा खात्याला देण्यात येतो. करण्यात आलेला खर्च आणि त्यातून निघालेले ‘रिझल्ट’ पाहून ह्यांची निवड करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय गाढव – या वर्षीचा हा पुरस्कार ‘कपिल सिब्बल’ यांना जाहीर होत आहे. टुजी घोटाळ्यात सरकारला तोटा झाला नसल्याच्या मतावर ठाम राहिल्याने ह्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय साप – घराण्याची परंपरा पुढे चालू ठेवणारे आमदार ओवार्सी यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

राष्ट्रीय कुत्रा – दिग्विजय सिंह यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. या सोबतच आम्ही त्यांना ‘राष्ट्रीय जोकर’ ही देखील उपाधी देत आहोत. गेले अखंड वर्षभर न थकता त्यांनी महागाईने त्रासलेल्या देशाला ‘आनंद’ देण्याचे काम केले आहे.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! विजेत्यांना काही सूचना.
१) सर्व विजेत्यांना त्यांचे पुरस्कार भारतीय डाक अथवा स्पीड पोस्टानेच पाठवले जातील.
२) त्यामुळे उगाच पुण्यात येऊन हेमंतचा पत्ता शोधण्यात वेळ वाया घालवू नये.

आणि तुम्हालाही, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.