राहू


बाबा राहू घरात पाऊल ठेवताच, मॉम खेकसते ‘ए कुठे घुसतो आहेस? हाकला रे! या भिकाऱ्याला’. बाबा राहू हसून’ हे काय मॉम? तू मला आजसुद्धा नाही ओळखलंस? माय नेम इज राहू गंदी’. मॉम गडबडून ‘हम्म, आली स्वारी. कुठले उकिरडे घोळले?’.  राहू ‘ बिहारात गेलो होतो’. वाक्य तोडत मॉम बोलली ‘किती घमेले उचलली?’ राहू ‘मॉम, मी कशाला घमेली उचलू? भाषणाला गेलो होतो’. मॉम उसासा टाकत ‘थांक ग्वाड! मग असा अवतार कसाकाय झाला? म्हणजे नक्कीच बिहारचा विकास झालेला नाही’. ‘नाही मॉम, बिहार खूप सुधारला आहे. महाराष्ट्राच्या पेक्षाही पुढे गेला आहे. दिल्लीच्या विमानतळावरून घरी येतांना जनपथवर उतरलो. टपरीवर चहा मारला. आणि घरात वळतोय, तेवढ्यात एक गाडी बाजूने गेली’ राहू बाबा बोलला. मॉम विचित्र चेहरा करून ‘मग तुझे कपडे चिखलाने कसे काय माखले? आणि फाटले देखील?’.

राहू उदास चेहऱ्याने ‘ती गाडी खड्यातून गेली. आणि त्या खड्यात पावसामुळे चिखल झालेला. त्यामुळे माझ्या अंगावर तो चिखल उडाला. माझे कपडे आणि चेहरा भरला त्या चिखलाने’. ‘आणि मी त्याला हात हलवत मोठ्याने, शुक्रिया म्हटले’. मॉम उत्कंठेने ‘मग?’. राहू बाबा ‘ती गाडी थांबली. आणि त्यातील माणूस गाडीतून उतरला. माझ्याकडे पाहून, ए वेड्या अस म्हणाला’. ‘पुढे काय झालं?’ मॉम बोलली. राहू बाबा ‘मी त्याला थांक्स म्हणून त्याच्याकडे पाठ करून उभा राहिलो’. मॉम डोक्याला हात लावत ‘आता ते कशाला?’. ‘मॉम, तू ग्रँड ग्रँड पा ची शिकवण विसरलीस का? एका गालात..’. मॉम ‘अरे त्यांनी ते किस बद्दल सांगितलेलं’. ‘नाही मॉम, त्यांनी सगळया गोष्टीत अस करायचे सांगितलेलं. म्हणून मी पाठ करून उभा राहिलो तर तो माणूस मला वेडा म्हणून माझ्या पाठीत लाथ घातली. मी उठून पुन्हा थांक्स म्हटलं, तर तो भडकला. आणि माझी ही हालत केली’. मॉम राहु ला कुरवाळत ‘पुढच्यावेळी अस नुसत्या कपड्यातून नाही फिरायचे रे बाबा. हेल्मेट आणि बुलेटप्रूफ जॅकेट वापरत जा. जा आता फ्रेश हो’.

राहू ‘डियर डिनर तयार झाला असेल ना?’. मॉम लडिवाळपणे ‘यस् डार्लिंग, आज सांग कोणी स्वयंपाक केला असेल?’. बाबा आश्चर्यकारक चेहरा करून ‘मॉम, मुलगी मिळाली?’. मॉम गडबडून ‘नाही रे, आज सुर्या वेटरने बनवला आहे’. ‘कोण तो?’ राहू बोलला. मॉम ‘तोच रे, सीडब्लूजीचा खादाडी’. राहू वैतागून ‘ठीक आहे. म्हणजे आज शिंग पा नाही आले तर’. मॉमने हसऱ्या चेहऱ्याने मान डोलावली. जेवण झाल्यावर राहू बाबा आणि मॉम हॉलमध्ये गप्पा मारत बसले. मॉमने विचारले ‘सभेत काय बोललास?’. ‘मी म्हटले, बिहारी लोकांमुळे महाराष्ट्राचा विकास झाला आहे’. मॉम चिडून ‘वेडा कुठला, याने थोडीफार मते वाढणार. तू बिहारी लोकांमुळे जगाचा विकास झाला अस बोलायला हवं होत’. राहू बाबा ‘अरे हो, हे मला सुचल कसं नाही?’. मॉम हसत ‘चल, पुढच्या सभेत बोल’. ‘नाही ग, मी पुढच्या सभेत आईन्स्टाईन हा मुळचा बिहारी होता अस म्हणणार आहे’. मॉम ‘हो, नक्की बोल. आणि हे सुद्धा बोल की नेपोलियनला बिहारमध्ये जन्माला यावं अस सारखं वाटायचे’. ‘वॉव! मॉम तू खरंच खूप ग्रेट आहेस’.

मॉम लाजत ‘उगाचंच नाही तुझे पा माझ्यासाठी पागल झाले होते’. बाबा उदास चेहऱ्याने ‘मॉम, मी कधी पा होणार?’. मॉम लडिवाळपणे ‘आधी घो तरी हो’. राहू बाबा ‘मॉम, लगीन???’. मॉम ‘होईल रे, चल झोप जा आता. उद्या पुन्हा बिहारला जायचे आहे तुला’. राहू ‘मॉम, बाळासाहेबांनी सांगितलेले ऐकू का?’. मॉम ‘हम्म, त्यांना सुद्धा कोणी मिळाली तर सांगा बोलले. त्यांनी मला राखीचे स्थळ सुचवले. पण मला मायावती फार आवडली तुझ्यासाठी’. राहू लाजून ‘मॉम, माझ्या मनातलं कसं ओळखलंस तू?’.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.