रेल्वे


काल ममताजीन रेल्वे बजेट सादर करायला सकाळी घरातून निघाल्या असतील. आणि इकडे आमच्या चिंचवडमध्ये सकाळची सात वीसच्या लोकलच्या कृपेने ती ओव्हरहेड वायर तुटली. मग काय पुढच्या लोकल रद्द आणि मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस तासभर उशिरा सुटल्या. डेक्कन क़्विनने पिंपरीत तासाभराची विश्रांती घेतली. तीच्या विश्रांतीनंतर प्रगती, सह्याद्री देखील तासभर उशिराने निघाल्या. सगळ्या लोकल प्रवाश्यांचे हाल झाले. तस हा योगायोग जरी घडला असला तर ममताजींनी जे बजेट सादर केल ते खरच खूप चांगल होत. मुंबईत एकशे एक नवीन लोकल, मुंबई शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस सारख्या अनेक गाड्या सुरु केल्या आहेत. ममताजींनी जे केल त्यामुळे खर तर त्याचं अभिनंदन करायला हव. आज मी त्यांना ‘धन्यवाद’ चा एक इमेल टाकणार आहे. जमल्यास तुम्हीही टाका.

ही माझी पहिली वेळ असेल की मी रेल्वे खात्याच्या बद्दल चांगले बोलत आहे. आतापर्यंत त्यांनी तसचं केल होत. आणि काल ते बजेट आपल्या महाराष्ट्राच्या अनेक प्रश्न सोडवणार होत. तस काल पुणे लोकलचा गोंधळ, या बजेटने धुवून टाकला. निदान महाराष्ट्राच्या शहरांत म्हणजे मुंबई,पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, शिर्डी अशा शहरांत जोडणाऱ्या  इंटरसिटी एक्सप्रेस खूप मोजक्या होत्या. पण आता अनेक नव्या सुरु होत आहे. चांगल झाल. पटना-पुणे, हावडा-पुणे सारख्या एक्सप्रेसचा आपल्याला काय उपयोग होता? तो उपयोग फ़क़्त परप्रांतीयांनाच. खर तर महाराष्ट्राचा हक्क या रेल्वेवर जास्त आहे. मुळात भारतीय रेल्वेचा जन्म या महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या सगळ्या रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्र सरकार पन्नास टक्के खर्च उचलते. सुरवातीपासून हे असंच चालत आलेल आहे. जमीन विकत घेऊन, त्या जमिनीची पातळी समान करणे. असली कामे आपल महाराष्ट्र सरकार करते. पण भारताच्या इतर राज्यात ज्यावेळी रेल्वे प्रकल्प राबवते त्यावेळी सगळा खर्च रेल्वे खाते उचलते. सगळे पैसे केंद्र सरकारचे. आणि मुख्य म्हणजे जो काही रेल्वे खात्याला पैसा मिळतो त्यातील ७५% पैसा एकट्या महाराष्ट्रमधून मिळतो. तरी नेहमी अन्याय केला जायचा.

बिहारी तर त्या रेल्वेला दावणीची गाय समजत होते. पण निदान आता तरी ममताजींच्या कृपेने बदलले आहे. तस काही परप्रांतिय गाड्या वाढल्या आहेत. पण एकूणच रेल्वे बजेट चांगल आहे. आणि मुख्य गोष्ट सांगायची राहूनच गेली. भाडेवाढ केलेली नाही. सात वर्षांपासूनचा रेल्वेचा भाडेवाढ न करण्याचे रेकोर्ड कायम राहिले आहे. पण बाकी पुण्याच्या लोकलने पुण्यातील रेल्वे प्रवाश्यांचे चांगलेच हाल केले. असो, बाकी बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.