रेशनकार्ड मिळाल


शेवटी आठ महिन्यानंतर पांढऱ्या रंगाच ‘केशरी’ रेशनकार्ड मिळाल. मागील वर्षी आठ मे मध्ये फॉर्म भरला होता. काल जेव्हा ते मिळाल, त्यावेळी खरंच मला पुत्रप्राप्ती एवढा आनंद झाला. पाच एक मिनिटे काय करावं सुचलंच नाही. आईला ताबडतोब फोन सांगितलं. तिला विश्वास बसेना. या आनंदात पुढची ठरलेली काम सोडून तडक घरी आलो. अस घडेल याची आशा मी सोडून दिलेली होती. काय करणार, कोगलाईमध्ये इतकं घडतं आहे. सुरवातीला तो फॉर्म भरला. तिथल्या कर्मचाऱ्याने तो व्यवस्थित तपासाला. आणि वीस रुपये घेऊन तो जमा करून घेतला. मग अजून एका महिला कर्मचारीने तो फॉर्म आणि जोडलेली कागदपत्रे तपासली. आणि मला पंधरा जूननंतर चौकशी करा म्हणून सांगितले.

गेलो पंधरा जून नंतर, मला म्हणाले त्या यादीत नाव शोधा असेल तर आमच्याशी बोला. झाले असे एक एक आठवडा संपायचा. आणि मी किंवा माझी आई त्या मनपा मध्ये चकरा मारायचो. तीन महिन्यानंतर मला म्हणाले निगडीच्या ‘शिधापत्रिका’ कार्यालयात जाऊन चौकशी करा. तिथ सुद्धा तेच. यादीत नाव बघा. नंतर म्हणाले, निवडणुका झाल्यावर चौकशीला या. निवडणुकीनंतर दिवाळी. ते झाल्यावर पुन्हा चौकशी केली तर मग उडवा उडवीची उत्तरे. एकदा म्हणाले, तुमचं एकट्याच काम करत नाही इथे आम्ही. आई बिचारी नेहमी चकरा मारून वैतागून जायची. मागील डिसेंबर महिन्यात मी तिथे पुन्हा एकदा गेलो. आणि ‘रेशनकार्ड झालं का जरा बघता का?’. बापरे, अस म्हटल्या म्हटल्या जणू काही त्या कर्मचारी बाईंना मी शिवीगाळ केल्याप्रमाणे ती माझ्यावर खेकसली ‘बाहेर यादी लावली आहे. तिथ बघा. नेहमी नेहमी सांगून कळत नाही का?’. तो पाणउतारा केल्यावर सुद्धा मी तिला शांतपणे विचारलं ‘नसेल तर ?’. परत ती खेकसली ‘मग जा घरी. आणि या पुढच्या मंगळवारी’. काय बोलणार. निघतांना बाकीच्या माझ्याप्रमाणेच प्रेमाने विचारांना बघून थोडा वेळ दुख झालं. तिथच दहा मिनिट थांबून त्या कर्मचाऱ्यांचा तो कारभार पहिला तर डोकंच हलल. कोणाचाच काम होत नव्हत. मग काय  माझ्यातला राज ठाकरे जागा झाला.

पुन्हा त्या कर्मचाऱ्याकडे गेलो. आणि मोठ्या आवाजात ‘अजून किती वेळ लागणार आहे?’ ती माझ्याही दुप्पट आवाजात ‘यादीत बघा एकदा सांगितलेलं समजत नाही का? आणि आम्ही का तुमचे नोकर आहोत का? कधी होईल विचारणारे तुम्ही कोण?’. मी म्हणालो ‘मला उद्या माझ्या नव्या कंपनीत निवासी दाखला द्यायचा आहे. त्यासाठी रेशनकार्ड हवे आहे.’ तिथला शिपाई बोलला ‘वीज बिल घेऊन जा’. त्याला म्हटले ‘जर ते असते तर इथ कशाला आलो असतो’. मग पुढे खूप भडकलो. मग म्हणाले तुमचा अर्ज सापडत नाही आहे. माझा अवतार बघून बाकीचे लोकही मोठ मोठ्याने त्या कर्मचाऱ्यावर बोलायला लागले. मग ताबडतोप अर्ज सापडला. तसा पुढे परत ‘हे चालणार नाही, ते लागेल’ करून त्रास दिला. पण शेवटी आज रेशनकार्ड मिळाले. पांढऱ्या रंगाच आहे. पण त्यावर निळ्या शाईने ‘केशरी’ अस लिहिलेलं आहे. विचारल तर म्हणाले की केशरी कार्ड संपली आहेत म्हणून अस. जाऊ द्या. एखादे बाळच झाले आहे की काय एवढा आनंद आज झाला होता. मिठाई वाटायची राहून गेली होती. असो, अजून बरीच कामे बाकी आहेत. गावाकडील मतदार यादीतून नाव कमी करून इथ मतदार यादीत नाव घालायचं आहे. विजेच्या बिलासंदर्भात त्या वीज नियामक कार्यालयात चक्कर टाकायची आहे. सोलर उपकरणांची माहिती घेऊन गावी निदान दोन दिवे लागतील एवढी सोय करायची आहे. इथेही एक सोलर कंदील घ्यायचा आहे. पाण्यासाठी एक टाकीची व्यवस्था करायची आहे. ही सगळीच काल रद्द केली होती. असो, बाकी बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.