रेशनकार्ड


रेशनकार्डसाठी आज सकाळी मी निगडीतील रेशनकार्ड ऑफिसमध्ये गेलो होतो. तसं म्हणायला गेल तर मी मे महिन्यापासून चकरा मारतो आहे. आधी महानगरपालिकेत. आणि आता निगडीतील रेशनकार्ड ऑफिसमध्ये. सगळा गोंधळ ऑफिसमध्ये चालू होता. कोणाला कशाचा काही मेळ नाही. एकच कर्मचारी काम करीत होती. बाकीच्या टेबलावरचे निवडणुकीसाठी बाहेर गेलेले. आणखीन एक बाई होती. पण ती मी ‘इलेक्शन ड्युटीवर’ आहे अस सांगून प्रत्येकाला टाळत होती. बर जी काम करत होती. ती काम करण्यापेक्षा अधिक चीड चीड करत होती. मी तिला माझ्याकडील पावती दाखवली आणि विचारलं की ‘इथ कोणाला विचारायचं नवीन रेशनकार्ड बद्दल?’ ती न नुसताच पाच एक मिनिट ती पावती पाहत राहिली. काही उत्तर न देता परत ती पावती परत दिले.

मला काही कळलं नाही ती न अस का केल ते. त्या ‘इलेक्शन ड्युटीवाल्या’ बाईला विचारलं तर तीच वेगळच ‘माझ हे काम नाही’. काय कराव विचार करीत असताना, माझा महानगरपालिकेत ज्याने फॉर्म भरून घेतला तो दिसला त्याला विचारलं ‘कोणाकडे नवीन रेशनकार्डसाठी चौकशी करायची?’ तो म्हटला इथे एक महामुनी नावाच्या बाई आहेत. त्या सद्याला इलेक्शन ड्युटीवर आहेत. त्यांच्याकडे चौकशी करत असतात. मी समजून गेलो. आता जोपर्यंत निवडणुका संपत नाहीत. तोपर्यंत काही ती येणार नाही. माझ्यासारखे अनेक जण होते तिथे. ते नवीन रेशनकार्डसाठीच आले होते. पण त्यांना कोणी काही नीट माहिती देत नव्हते. खर तर या सरकारी कामांचा पहिल्यापासून अनुभव असल्याने मला काही नवीन नव्हत. त्यातले अनेक जण त्या काम करणाऱ्या बाईला ओरडून विचारात होते. पण ती पण भारी. काही न बोलता आपल काम करात होती. एकाला मी विचारल की ‘त्या बाईला कमी एकू येत का?’ तो बोलला की ‘ती मुद्दाम अस करत आहे.’ नाही तरी सरकारी काम आणि कर्मचारी असेच असतात.

कसला महासत्ता होणार आपला देश. त्या ऑफिसची तुलना करायची झाल्यास भाजी मंडई अशी करता येईल. पण तिथ गेल्यावर निदान भाजी तरी मिळते. इथ त्रास सोडून बाकी काही मिळत नाही. मी येत असताना चार जणांशी ती ‘इलेक्शन ड्युटीवाली’ बाई भांडली होती. इथ काही आता काम होणार नाही अस बघून मी आपला घराचा रस्ता पकडला. बघू आता निवडणुकी नंतर रेशनकार्ड मिळणार बहुतेक. येताना मस्त पाऊस आला होता. खूप दिवसांनी भिजायला मिळाल. ते टपोरे टपोरे थेंब. खूप छान वाटल. त्या रेशनकार्डच्या ऑफिस मधील काम न झाल्याचे दुख कधीच वाहून गेल या पावसात.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.