काय बोलावं ‘र’ बद्दल. नावात ‘र’ म्हणजे इंग्लिशमध्ये ‘आर’ असलेल्या लोकांनी या देशात नव्हे तर जगात नावलौकिक कमावला आहे. आताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील , शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपतींचे संपूर्ण नाव ‘अवुल पकिर जलालुद्दीन अब्दुल कलाम’. आता यांच्या नावात योगायोग वाटत असेल तर आपल्या देशात नावात ‘र’ असलेल्या पंतप्रधानांची कमी नाही. भारताचे पहिले पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरू’. दुसरे ‘गुलझारीलाल नंदा’, तिसरे ‘लाल बहादूर शास्त्री’, चौथ्या ‘इंदिरा गांधी’, पाचवे ‘मोरारजी देसाई’, सहावे ‘चरण सिंग’, सातवे ‘राजीव गांधी’, आठवे ‘विश्वनाथ प्रताप सिंग’, नववे ‘चंद्रशेखर सिंग’, दहावे ‘पीव्ही नरसिंहराव’, अकरावे ‘अटलबिहारी वाजपेयी’ हुशः काय यादी आहे. अजूनही एक नाव राहिलेच ‘इंद्रकुमार गुजराल’. आता नावात ‘र’ असलेला भारताचा पंतप्रधान होऊ शकतो असा नियम नाही. पण एक दोन सोडले तर बाकीच्या पंतप्रधानांच्या नावात ‘र’ आहेच.

तो पाकिस्तानचा माजी राष्ट्रपती ‘मुशर्रफ’, किंवा अफगाणिस्तानाचा ‘हमीद करझाई’, किंवा अमेरिकेचा ‘जॉर्ज वॉशिंग्टन’, ‘जॉर्ज बुश’ यांच्याही नावात ‘र’ आहेच की! इस्राईलचा ‘शिमोन पेरेस’, जर्मनीची ‘अंगेला मेर्केल’ नाहीतर कॅनेडाचा ‘स्टेपन हार्पर’, इंग्लंडचा ‘गोर्डन ब्राऊन’ किंवा नेपाळचा ‘राम बरण यादव’ यांच्याही नावात ‘र’ आहेच की. बर राजकारण सोडू. क्रिकेटपटूबद्दल बोलू ‘सचिन तेंडूलकर’, ‘सुनील गावसकर’, ‘सौरव गांगुली’, ‘महेंद्रसिंग धोनी’,’युवराज सिंग’, ‘हरभजनसिंग’, ‘वीरेंद्र सेहवाग’, ‘झहीर खान’, ‘ब्रायन लारा’, ‘रिकी पोंटिंग’, ‘महिला जयवर्धने’, ‘जयसुर्या’, ‘ग्राम स्मिथ’, ‘ड्यानिअल वेटोरी’, ‘वसिम अक्रम’ बस्स. आता थोड टेनिस बद्दल बोलू. ‘सानिया मिर्झा’, ‘मारिया शेरापोव्हा’, ‘आंद्रे आगासी’, ‘लिएंडर पेस’, ‘मार्टिना हिंगेस’, ‘सेरेना विल्यम्स’, ‘स्टेफी ग्राफ’, ‘रॉजर फेडरल’, ‘राफेल नदाल’, ‘एंडी रॉड्रीक’, ‘पेटे संप्रास’, ‘मराट साफिन’, ‘पेट्रिक राफ्टर’. आता मी थकलो बुवा. या टेनिसमध्ये सुद्धा नावात ‘र’ असणारे कमी नाहीत.

जरा हॉकी बद्दल बोलू. ‘धनराज पिल्ले’, ‘बलबीर सिंग’, ‘मेक्समिलन मुलर’, ‘दिलीप टर्की’, ‘दिलावर हुसेन’, ‘रिचर्ड मान्टेल’, ‘रोनाल्ड ब्रौचार’. असो, फुटबॉलपटू बद्दल बोलायचं झालं तर ‘रोनाल्डो’ तर सर्वांनाच माहिती आहे. तसेच ‘रिवाल्डो’, ‘रॉबेटो कार्लोस’, ‘एलन शेरार’, ‘मर्केल डेन्सिली’. आता थोड नटनट्या बद्दल बोलू. ‘अतुल कुलकर्णी’, ‘भरत जाधव’, ‘सोनाली कुलकर्णी’, ‘अक्षयकुमार’, ‘आमीर खान’, ‘शारुख खान’, ‘रणबीर कपूर’, ‘धरमेंद्र’, ‘केतरीना केफ’, ‘दिनो मोर्या’, ‘करीना कपूर’, ‘प्रीती झिंटा’, ‘इम्रान खान’, ‘हिमेश रेशमिया’, ‘श्रीराम लागू’, ‘लक्ष्मीकांत बेर्डे’, ‘अशोक सराफ’. असो अजूनही बरीच मोठी यादी होईल. इतिहासात गेल तर ‘पृथ्वीराज चौहान’, ‘राणा प्रताप’, ‘अकबर’, ‘बाजीराव पेशवा’, ‘स्वातंत्रवीर सावरकर’, ‘बाबर’, ‘चाफेकर बंधू’, ‘रामदासस्वामी’. थोड इतर ठिकाणी बघितलं तर गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर’, ‘झाकीर हुसेन’, ‘जसपाल राणा’, ‘अभिनव बिंद्रा’, ‘वीजेंदरसिंह’. असो, सर्वांचा टाईमपास ‘लालूप्रसाद यादव’. महाराष्ट्रात बघायचे झाले तर ‘बाळासाहेब ठाकरे’, ‘शरद पवार’ ‘विलासराव देशमुख’, ‘नारायण राणे’, ‘सुशीलकुमार शिंदे’, आमचा चप्पलकुमार ‘रमेश बागवे’, ‘सुरेश कलमाडी’, ‘गिरीश बापट’.

असो एकूण शेवटी काय नावात ‘र’ असणारे जगात खूप लोकप्रिय झालेले आहे. आता अझीम प्रेमजी, नरेंद्र मोदी, धीरुभाई अंबानी, रतन टाटा, नारायण मूर्ती यांच्या नावात देखील ‘र’ आहे. आता तो सिकंदर /अलेक्झांडर, अडॉल्फ हिटलर किंवा चर्चिल त्यांच्या नावात देखील ‘र’ आहे. किरण बेदी राहूनच गेली होती. आणि ती मल्लिका शेरावत देखील. जसजसा विचार करतो आहे ‘र’ ची यादी काही संपत नाही आहे. कोणी ना कोणी वाढतच चालू आहे. अरे हो, देवांची नाव आपण कुठे बघितली? ‘राम’, ‘अर्जुन’, ‘शंकर’, ‘दशरथ’, ‘परशुराम’, ‘श्रीकृष्ण’, ‘राधा’, ‘नारदमुनी’. तो विजयनगरचा हरिहर. अजून एक वलयांकित नाव बोलायचं राहूनच गेल की ‘राहुल गांधी’. आणि मागील निवडणुकीत हिट झालेला ‘वरूण गांधी’. अण्णा हजारे, ती एवरेस्टवर सर् करणारी ‘कृष्णा पाटील’. शुभा राउळ, संजय राउत, संजय निरुपम, राम गोपाल वर्मा. बस्स! नाहीतर वेड लागायची पाळी येईल. शेवटचं एक नाव सांगतो आणि ‘र’ पुराण बंद करतो. एक खूप लोकप्रिय नावाबद्दल बोलायचं राहून गेल होते. ते म्हणजे ‘राज ठाकरे’.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.