लव आजकाल


रक्षाबंधनच्या दिवशी माझी एक जुनी मैत्रिण मला राखी बांधान्यासाठी मला तिच्या कंपनीत यायला सांगितले. मी तीला सकाळी ९:१५ येतो म्हणुन सांगितले. ती ज्या कंपनीत काम करते ती  कंपनी पूणे स्टेशन आयनोक्सच्या  बाजूला आहे. मी आपला ९:१० लाच पोहोचलो. तीला फ़ोन केला तर ती म्हणाली की, १० मिनिटात येते. मग तो पर्यंत करायचे काय म्हणुन आयनोक्स  गेट च्या बाजूला उभा राहिलो. लव आजकाल लागलेला होता. करायचे काय म्हणुन आयनोक्सकड़े बघायचो कधी तिथे जाणारे मुले मुलींकडे बघायचो. बरेच जण येत होते. सकाळच्या शो ला पण गर्दी असते हे मला त्या दिवशी बघून कळले. तिथे एका मुलगा सारख्या फेर्या मारत होता. कोणी तरी यायचे होते वाटत. जसा जसा वेळ जात होता तसा त्याचा पारा चढत होता.

तो दर दोन मिनिटाने कोणाशी तरी मोठ्या आवाजात बोलत होता. मी समजू शकत होतो. शो सुरु झाला होता. त्याला तो चित्रपट जाइल म्हणुन, त्रागा झाला असेल. ९:४५ झाले तरी आमच्या या मैडम चा पत्ताच नाही. मी फ़ोन करणारच तेवाध्यताच तिचा फ़ोन आला की मी पोहचलीच आहे. तुला उशीर होतो आहे का? मग काय इतक्या वेळ थांबलो आणि आता २-५ मिनिटासाठी कुठे जायचे म्हणुन मी म्हणालो की तू ये मी आहे. या मधल्या काळात त्या हिरोकडे माझे लक्षच नव्हते. फ़ोन ठेवून बघतो तर काय. एक मस्त मुलगी आयनोक्स कड़े येत होती. कोणी पण प्रेमात पडेल. वा, ही ज्याची गर्लफ्रेंड असेल तो भाग्यावानाच म्हटला पाहिजे. ती सरळ त्याच्याकडे गेली. आणि मग काय  दोघांचे आयनोक्सच्या गेटवरच वाद सुरु. म्हणजे खर तर ती शांत होती आणि हा हीरो जरा जास्तीच करत होता. तिने त्याला विचारले की, चित्रपट पहायला जायचय का? तर हा तिच्यावर माझे तिकिटे वाया गेली, म्हणुन आणखीच भडकत होता. खर तर सकाळ च्या शो ला ७०-८० रुपयाला असे काही तरी टिकिट असते. तिच्या वर्तनुकीवरुन ती त्याची गर्लफ्रेंड वाटत होती.

ती एवढ्या प्रेमाने त्याला समजावत होती. पण हा काही एकून घ्यायला तयार नाही. मग काय ती मेकडोनाल्ड मधून काही तरी खायला आणले पण हे साहेब काही मानायला तयार नाही. नंतर काय झाले ते माहिती नाही. रक्षाबंधन झाल्यावर मी तिथून निघालो. त्यावेळी देखील त्यांचे वाद सुरूच होते. बघून वाटले. हा गाढव १०० -१५० रुपयासाठी वाद घालतोय. हे कसल प्रेम. त्या हिरोला तिच्यापेक्षा पण तो शो आणि पैसे जास्त महत्वाचे वाटत होते. आहे ती वेळ आणि संधी पुन्हा प्रयत्न करून देखील येत नाही. याची जाणीव वेळ निघून गेल्यावर येते हेही तितकेच खरे. पण खरच अशा प्रेमाला काय अर्थ आहे?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.