लिंग ओळखा


ओळखा पाहू! हाय हायss हाय हाय, हाय! चिकना चिकना. कोणी माल घेऊन गेला. कोणी ताल, कोणी जीवाने गेला. आणि कोणी तर जगच सोडून गेला. लुटली लुटली सारी कंट्री!!! आता तरी… मनमोहना करप्शनला कर नो एंट्री. मँगो मॅन किती दिवस तुझी उदो उदो करणार? मान्य आहे की, तू चांगला अर्थतज्ञ आहेस. साधा माणूस आहे. थोडक्यात ‘चिकना’ आहेस. पण काय उपयोग? देशात भाववाढ होते. आणि तू भाववाढ कमी होण्याच्या ‘डेट’ देणार. तुझी ‘डेट’ येऊन जाणार देखील. मग तू दुसरी ‘डेट’. पण प्रत्येक वेळी फरक काहीच नाही. वाढणारे भाव वाढणारच.

बर, तुझी त्यात काय चूक नाही. पण भाव वाढले तर तू तुझे कर कमी कर ना. थोड दलाल लोकांना दरडावून दाखव. तेही नाही. नुसती ‘चिंता’ व्यक्त करून काय होणार? काल सर्वोच्च न्यायालयाने तुला हसन भाईला का पकडत नाही अस विचारले ना? त्या थॉमस दादाला लाथ मारून हाकललं. ओळखा त्यांना. तरीही तुझी आपली आदराची भाषा चालूच. मला सांग तुझ्या माफीने कुणाच काय फरक पडणार? इतके दिवस तुला ‘तुम्ही’ म्हटलं ना? पण हे ‘चंपकगिरी’ कधी सोडणार रे तू? काळ्या पैशाची यादी जाहीर कर अस सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. धान्य सडण्यापेक्षा गरिबांना फुकट वाट असा आदेश दिला. पण तू तेही करीत नाहीस. इकडे कसाब मुंबईकर आणि तिकडे गुरु दिल्लीवाले ला फाशीची शिक्षा झाली आहे. तिथेही तुझ काय मारलं जात कुणास ठाऊक? तू का काहीच करीत नाहीस?

घोटाळे करणार तुझी माणसे. घोटाळा उघडकीस आल्यावर तू काहीच करणार नाही. बर तुला राग वगैरे येत नाही. मला खरंच तुझ्या वागण्यावर शंका यायला लागली. माणसात षडरिपू असतात. तुझ्यात काय आहे हाच प्रश्न! तू कोण? हाच प्रश्न आहे. तू कायमच काहीही होवू द्या, नुसता रडका चेहरा. जस की तुझ्या घरात कोणाचा तरी ‘दहावा’ झालाय. तुझा रडका चेहरा आणि अति मंजुळ वाणी पाहून ‘ती’ म्हणावे, पण तुझ्या दाढी मिश्या पाहून तुला ‘ती’ उपाधी देऊ शकत नाही. तुला पुल्लिंगी शब्द वापरावा. तर तुझ्यात कोणतीच मर्दानी गोष्ट नाही. तुला पुरुष कसा म्हणू? दमच नाही. मुंबईवर हल्ला झाला. तुझी पहिली प्रतिक्रिया ‘आम्ही प्रतिहल्ला करणार नाही’. अरे काय हे? तुझ हे वागणूक पाहून तुला मर्द तरी कसा म्हणू? दोनशे लोक मारले गेले. परदेशी लोकांवर ताजमध्ये अत्याचार देखील झाले. सारा देश हळहळला. तुझे मत काय? तर ‘शांतता पाळा’. अरे कोणता मर्द हल्ल्याचे उत्तर ‘शांतता’ देईल. काहीच ‘फिलिंग’ नाही का?

१६७ लोकांना मारणारा तो कसाब अजून जिवंत. जे पोलीस शहीद झाले त्यांना रुपयाची मदत नाही. कसाबवर दोन वर्षात ६७ कोटी खर्च. त्याचे ‘बिलिंग’ कोण पे करते आहे? मँगो मॅन ना? ‘१६७ खून माफ’ करायचे का? तो कसाब काय तुझा ‘डार्लिंग’ आहे का? घोटाळा झाला. तुझ्या सही शिवाय कोणता निर्णय कसा होवू शकतो? आणि तू म्हणतो मला माहितीच नव्हत. मला सांग तुला विचारून कोणी घोटाळा करेल का? तुझीच चूक नाही का मग ती? तू आणि सरकार म्हणजे वेगवेगळया गोष्टी आहेत का? तू ‘प्रधान’मंत्री आहेस. देशाचे छत या घोटाळ्यांमुळे फाटले आहे. नुकसानीचा पाऊस धो धो पडतो आहे. तू ‘सिलिंग’ नाही करणार का? नुसती आपली तोंडाची ‘बॉलिंग’ करून वेळ मारून नेण्याचा काय फायदा? काय म्हणे ‘मी दोषी आहे पण तुम्ही म्हणता इतका नाही’. याचा काय अर्थ काढायचा? उद्या कसाब देखील म्हणेल ‘मी १६७ लोकांना मारलं. पण तुम्ही समजता तितका मी क्रूर नाही’. घ्यायचं समजून त्याला. द्यायचं सोडून? वातावरण अशाने ‘कुलिंग’ कसे रहाणार?

तुझे वागणे, तुझे बोलणे पाहून तू ‘पुल्लिंगी’ नाही हाच निकर्ष निघतो. तू स्त्रीलिंगी पात्र देखील नाहीस. सर्वांची हात जोडून माफी मागतो. तुझी देखील रे! पण, मग तुला काय समजायचे? तूच समजून घे. शाळेत व्याकरणातील पुस्तकात ‘प्रकार’ सर्वांनीच शिकलेत. तूच ठरव, देशातील मँगो मॅनने तुला ‘तो’ म्हणावे की ‘ती’? म्हणावे की ओळखा..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.