लोकलमधील आसने


चकित झालात? अहो मी खर तेच बोलतो आहे. लोकलचा प्रवास म्हणाला की त्याबरोबर अनेक गोष्टी आल्याच. या आसनाचा शोध(साक्षात्कार), होण्यासाठी कोणत्याही तपाचा किंवा क्लास, किंवा कोणत्या बुवाची गरज नाही. आता हेच बघा, लोकलची वाट पाहत तुम्ही उभे रहता. कधी गाडीच्या दिशेने, तर कधी सिग्नल्च्या दिशेने बघता ही क्रिया अनेक वेळा होते. आत ही आसनाची पूर्व तयारी.

लोकल आल्यावर तुम्ही धक्का बुक्की करत कसे बसे चढ़ता.आत जाताना तुम्ही हात वरती आणि वाट काढत आत जाण्याचा प्रयन्त करता. वाट मिळाली तर ठीक नाही तर एक पाय मागे आणि दूसरा पाय अडीच फुट मागे. अशी जी स्थिति असते त्याला ‘वीराभाद्रसन’असे म्हणतात. लोकलच्या गेटवर उभे राहणारे वीरपुरुष नेमिच एका हाताने लटकले असतात. गर्दी तर नेहमीच असते. ते ज्या स्थितीत असतात त्या स्थितीला आपल्या योगमधे त्रिकोणासन असे म्हटले जाते.

आता त्रिकोणासन म्हणजे काय ते विचारू नका. मी काही योग शिक्षक नाही. तुम्हाला जागा मिळाली तर ठीक नाही तर तुम्ही उभे.हात वरती असलेल्या लोखंडी मुठेला तुम्ही धरलेले असते. आता तुम्ही परत विचारल की, ‘त्यात काय?’. आता याला योगाच्या भाषेत ‘वृक्षासन’ असे म्हणतात. हे किती वेळ करायला लागते हे तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे. अशाच एका आसनाचे नाव आहे ‘ताडासन’. आता लोकल एकाद्या स्टेशनवर थांबते . नविन लोक पुन्हा धक्का बुक्की करतात. मग तुम्ही एका हाताने वर धरलेल असते आणि गर्दी च्या धक्याने पुढे झुकले जाता. आता तुमची जी स्थिति असते त्याला योग भाषेत ‘अर्धकती चक्रासन ‘ असे म्हणतात. जे बसतात ते शवासन करतात, तेहि आवडीने. अशा पद्तीने आपली लोकल इछितहित स्थळी पोहचते आणि आपण उतरून जातो. बघा झाले की नाही लोकल मधील आसने


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.