वशिला


कोणी तरी सोडवा या ‘वशिल्या’च्या लफड्यातून. यार हे मित्र ना! ह्यांच्यापेक्षा नसलेले परवडले. काय करू, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आणि ‘थोडा वशिला’ लाव म्हणतात. मागील आठवड्यात गावी चाललो होतो. बसमध्ये भेटलाच एक मित्र. घरापर्यंत माझ्या मागे जॉब लावून दे म्हणून. बर ह्याचे शिक्षण माझ्यापेक्षा जास्त. हातपाय हलवायला नको. मला म्हणाला ‘मी पुण्यात आलो की तुझ्याकडे येतो. मला तू सॉफ्टवेअर शिकव. मी तुझ्याकडे राहतो. कारण पैश्यांचा अडचण आहे. आणि तूच तुझ्या कंपनीत माझ्यासाठी जॉब बघ’. कसाबसा पिच्छा सोडवला.

दुसरा एक आहे. तो तर इमेल इमेल खेळत असतो. जॉबचे काय झाले? असे मेल करतो. बर मी काही फार मोठा माणूस असतो. आणि माझ्या बड्या असमिंशी ओळखी असत्या तर मदत केलीही असती. आणि मदत केली नव्हती असेही नाही. पण तिघांनी मला चार ठिकाणी शेण खायला लावले. एकाला जॉबसाठी माझ्या जुन्या कंपनीच्या बॉसला गळ घातली. त्यानेही माझ्या मित्राला मुलाखतीला बोलावले. तर हा आलाच नाही. कारण विचारल्यावर मला वेळ नाही म्हणाला. दुसर्यावेळी माझ्या एका मैत्रिणीला गळ घातली. तिने तिच्या बॉसला माझ्या मित्रासाठी शिफारस केली. त्यानेही फोन करून साहेबांना मुलाखतीला बोलावले. पण पुन्हा माशी शिंकली. साहेबांना ती कंपनी आवडली नाही. बर कंपनी न पाहताच ‘कंपनी आवडली नाही’ हे कारण कोणाला पटेल?

अजून एक दुसरा आहे. त्याला एका ठिकाणी १००% जॉब देण्यासाठी माझ्या एका मित्रातर्फे एका उत्तम ब्रँड कंपनीत ‘वशिला’ लावला. बर त्या माझ्या मित्राला साधा रिझ्युम पाठव म्हणून म्हटलं तर आठवडाभर कुठे गायब झाला कुणास ठाऊक! फोन सुद्धा बंद. आणि दुसर्या आठवड्यात ‘जॉब’चे काय झाले म्हणून त्याचा फोन आला. बर इकडे ज्याला मी जॉबसाठी मदत करायला लावली होती. तो काय आठवडाभर थांबणार होता? आणि आता हा गाववाला. आता हा काय माझा ‘गर्लफ्रेंड’ आहे का? गावात असतांना कधी साधी ओळख दाखवत नव्हता. आता पार हातपाय जोडायला तयार. बर आत्तापर्यंत माझा कोणी वशिला लावला नाही. आणि हा मला वशिला लाव अस सांगतो आहे. आयटी वशिलेबाजी चालते की नाही मला माहित नाही. पण आजकाल ह्यांनी माझे डोके फिरवले आहे. त्यात ‘परी’ला एका मित्रासोबत बघितल्यापासून काहीच सुचत नाही आहे. खूप बेकार वाटत आहे. असो, नंतर बोलू.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.