वाढता वाढता वाढे..


एकदा हनुमान लंकेत सीतामातेचा शोधासाठी गेला असतांना रावणाची सेना त्याला कैद करते. रावण हनुमानाची शेपटी पेटून देण्याची शिक्षा देतो. रावणाचे सैनिक हनुमानाची शेपटीला चिंध्या गुंडाळून पेटवण्याचा प्रयत्न करतात. पण शेपटी मोठी होत जात असते. लंकेतील सगळया चिंध्या संपतात. मग राजवाड्यातील पडदे, नंतर जी मिळतील ती कपडे घेऊन शेपटीला गुंडाळले. तरीही शेपटी वाढतच चाललेली. तस चालल आहे महागाईचे. नाही नाही दरवाढीचे. कारण ही महागाई इतकी वाढण्याचे सारे श्रेय मनिसिंहला जाते. काय चुकीचे वाटते?

ठीक आहे. आपण जरा या एका वर्षातील दरवाढी पाहू. एक जुलै २००९ ला पेट्रोल चार रुपयांनी दर वाढवले. आणि डिझेल दोन रुपयांनी. त्यावेळी पुण्यात पेट्रोल झाले ४९.३० रुपये. आणि डिझेल झाले ३७.१३ रुपये. मग मनिसिंहने २८ फेब्रुवारी १० ला पुन्हा दरवाढ केली. पेट्रोलमध्ये २.७१ रुपये, डिझेलमध्ये २.५५ रुपये. मग पुण्यात पेट्रोलचे भाव झाले ५१.५४ रुपये आणि डिझेल झाले ३९.५२ रुपये. परत एक महिन्याने एक एप्रिलला तेरा शहरात पेट्रोल पन्नास पैशांनी आणि डिझेल तीस पैशांनी वाढवले. आता पुन्हा दरवाढीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. दुध, अन्नधान्य, गॅस, वीज बद्दल तर काहीच बोलायला नको. वीजबिल काय बोलाव! मागील महिन्यात माझ्या घरात ३० युनिट वापरले गेले. तर वीजबिल आले १६३ रुपये. म्हणजे पाच पेक्षा जास्त युनिट भाव आहे. मागील वर्षी २० रुपये लिटर दुध आता ३३ रुपये लिटर झाले आहे. बसभाडे बद्दल काय बोलायचे. दोन वर्षापूर्वी दादर ते नगर २०० रुपये लागायचे. आणि तेसुद्धा निम-आरामी बस. गावी जाऊन यायला ४०० पेक्षा एकाही जास्त रुपये लागत नसायचे.

आता पुण्यातून गावी जाऊन यायला किमान ५०० रुपये लागतात. मुंबईला मी राहायला असतांना माझा महिन्याचा खर्च ३०००-३५०० रुपये यायचा. सगळ अगदीं एक पुण्यात आणि एक चक्कर गावी पकडून. आता पुण्यात महिन्याचा खर्च किमान ६००० रुपये होतो. बर हा माझा एकट्याचा आहे. असो, कुटुंबच्या कुटुंब का आत्महत्या का करतात याच उत्तर हेच आहे. खर्च वाढतो आहे. खर तर लोकसंख्या कमी केल्याबद्दल मनिसिंहला नोबेल मिळायला हवा. काय बोलाव अजून. सगळीकडेच त्रासदायक आणि दुख:दायक घटना घडतं आहेत. आत्महत्येच्या बातम्या वाचून मन सुन्न झालं आहे. तिकडे नक्षलवादी रोज पन्नास ठोकत असतात. बस्स! डोळ्यात आत्ताच गंगा यमुना येण्याची चिन्ह दिसत आहे. आज इथेच थांबतो. नाहीतर महापूर येईल..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.