वाढदिवस


काल माझ्या सहकारीचा वाढदिवस होता. सकाळी काम सुरु असतांना त्याला ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांचा’ इमेल आला. मग ह्यानेही सगळ्या टीमला माझ्या मेजवर चॉकलेट आहे असा इमेल केला. आता मी त्याच्या शेजारीच बसलो होतो म्हणून चॉकलेट आणि त्याला शुभेच्छा ही लवकर देता आल्या. परवा माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. मग काय परवा दुपारी तीने मला आणि तीच्या काही मैत्रिणींना पार्टी दिली. मस्त वाटलं. गप्पाही खूप झाल्या. ती म्हणत होती की तीच्या वाढदिवसाला नेहमी पाऊस पडतो. म्हणजे अस काही नियम वगैरे नाही. पण अस घडतं. मी नुसतंच हसलो त्यावेळी. ती ज्यावेळी हे सगळ सांगत होती त्यावेळी दुपारी कडक ऊन पडले होते. आणि संध्याकाळी खरंच पाऊस आला. पण यावेळी माझी पावसात भिजायची इच्छा पूर्ण झाली नाही. मी घरी आलो त्यावेळी पाऊस पडून गेला होता. कालही असंच.

कधी कधी आपला वाढदिवस म्हणजे पुढच्या वर्षाचा ट्रेलर असतो की काय अस वाटत. म्हणजे मागील वर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी कंपनीत बसून काम केले होते. आणि काम खूप होते. आता अजून देखील रोज तसचं घडतं. काम द्याव यासाठी आधी मी माझ्या सिनिअरशी बोलतो. आणि नंतर काम एवढे येते की संपता संपत नाही. त्याआधीच्या वाढदिवसाला रविवार आला होता. म्हणून मी काही तरी चांगल करायचं म्हणून संपूर्ण घर साफ केल. त्यावेळी मी मुंबईला होतो. मग काय ते वर्षभर मलाच दिसेल तिथे कचरा जाणवायचा. आणि माझी आपली साफ सफाई चालू. मग ठरवलं वाढदिवसाच्या दिवशी असल् काही करायचं नाही  म्हणून. तस वाढदिवस वगैरे प्रकार घरात चालत नाही.

माझ्या वाढदिवसाच्या महिन्यात आंब्यांचा सिझन असतो. आणि मग घरी आमरस करतात. बाकी ‘केक’ कापणे. मेणबत्या विझवणे. असल्या गोष्टी घडतं नाही. मागील वाढदिवसाला माझ्या बॉसने कंपनीत केक आणला होता. मग कापावा लागला. पण तोच माझा पहिला आणि कदाचित शेवटचा केक. पण जर कधी वाढदिवसाचा केक कापायचा ठरला तर राज ठाकरेंचा ‘भैय्या’ आदर्श नक्की ठेवीन. तो माझा सहकारी अर्ध्या महिन्यापासून करत असलेल काम आज पूर्ण झालं. त्याच्या कामाची गाडी जिथे अडकून पडली होती. तिथ त्याला ‘धक्का’ दिला. जाम खुश झाला होता. मला त्याने ‘धन्यवाद’चा इमेल त्याच्या टीम लीडर आणि असिस्टन्ट प्रोजेक्ट मेनेजरला सीसी मध्ये ठेवून केला. मागील एका वर्षातली ही पहिली घटना आहे. याआधी माझ्या कामाचा ‘गुड जॉब’ चा मेल माझ्या सिनिअराला असायचा. म्हणजे शून्यापासून शेवटपर्यंत काम करायचं मी आणि ‘गुड जॉब’ सिनिअराला. आणि इथ आल्यापासून तर माझा आत्मविश्वासच खच्ची झाला होता. पण त्या इमेलमुळे माझ्यातला आत्मविश्वास खूप वाढला. त्या दोघांचे लागोपाठ आलेले वाढदिवस आणि त्यामुळे झालेला वातावरणात बदल मस्त होता. पुढील आठवड्यात माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे. तिचा स्वभाव आणि घराच्या सगळ्या गोष्टी सारख्या आहे. बर वाटत की कोणी आपल्या सारखं असले की. तीला काय भेटवस्तू देऊ याचा विचार करतो आहे. मागील महिन्यात माझ्या मित्राचा वाढदिवस होता. मित्र बाकी मस्त आहे. ‘पार्टी’ कधी देतो अस विचारल्यावर ‘तू म्हणशील तेव्हा’ अस उत्तर दिल. आणि हो माझ्या ‘बहिणाबाई’चा पुढील महिन्यात वाढदिवस आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.