वाहिनी साहेब


काय बोलाव आता? हे मित्र लोक ना, सगळे मित्र इकडून तिकडून सारखेच. परवा ‘परी’ सोबत गप्पा मारून कंपनीत आलो. नाश्ता करावं म्हणून मित्रांसोबत कॅन्टीन मध्ये आलो. काय सांगू किती खुश होतो. परी सुद्धा तीच्या टीममेट सोबत नाश्ता करायला आली होती. मी माझ्या मित्रांना ती दाखवली तर, माझा एक मित्र तिला ओळखत होता. मग काय, साहेब आधीच तिच्यावर फिदा. फारच काकुळतीला आला होता तिच्यासाठी. हो नाही करत शेवटी मलाच माघार घ्यावी. ती आणि तो एकाचं फ्लोरवर बसतात. आणि त्याला ती मनापासून आवडते. असो, मला कुणाच्या चित्रपटात ‘खलनायक’ चा रोल मुळीच करायचा नाही.

जाऊ द्या, परीची आता वाहिनी साहेब झाली. दिवसभर जाम बोर झालं. पण आता अशा दुखांची सवय होते आहे. मला ना असेच मित्र भेटत आले आहेत. म्हणजे तसे ते खूप चांगले आहेत. पण मला आवडलेली ‘परी’ यांनाही आवडते. मी नगरला संगणकाचा कोर्स करीत असतांना माझी एक मैत्रीण होती. तीच आणि माझ खूप छान जमायचं. पण काय करणार, माझ्या एक मित्र तीच्या प्रेमात पडला. आता तिला त्याचे सगळे कळायचे. पण तिला त्यात काहीही रस नव्हता. आणि तो देखील इतका बुजरा होता की, प्रत्येक गोष्टीत मलाच पुढाकार घ्यावा लागायचा. बर, सगळं त्याच ऐकून त्याला माझ्या आणि तीच्या विषयी शंका यायची. शेवटी शेवटी तर त्याला मी त्याच्या ‘प्रेमकहाणी’ मधील खलनायक वाटायला लागलो. मग त्या दोघांची गाडी पुढे जावी म्हणून मी तिच्याशी बोलणे बंद केले.

बर, तीही खूप बहाद्दर. सर्व गोष्टी कळत असून न कळल्याचे दाखवायची. त्या बिचाऱ्याला छळायाची. शेवटी तिचे दुसऱ्याशी लग्न झाले. आणि हा मला अजूनही दोष देत आहे. दुसरी एक मैत्रीण होती. तिच्यावर तर माझे एक सोडून पाच मित्र. आम्ही दोघांनी त्यांचे नाव ‘पांडव’ ठेवले होते. असो, त्यांच्यासाठी त्यावेळी मी ‘दुर्योधन ‘ होतो. म्हणजे खलनायकच. ‘ती’ नंतर माझ्या जुन्या कंपनीतील आवडली होती. पण तिला माझ्यात रस नव्हता. नव्या कंपनीत आलो. तर नेहमी बसने जाता येता एक मुलगी रोज मला बघायची, आणि माझ्या डेस्कच्या जवळच तिचाही डेस्क आहे. छान आहे. पण माझ्या एका मित्राला ती आवडली. मग काय या प्रेमकहाणी मध्ये देखील ‘साईड हीरो’चा रोल. त्यानंतर अजून एक छान वाटली. पण तिथेही एक मित्राचे तिच्यावर ‘प्रेम’.

मध्यंतरी, माझ्या एका मित्राला त्याच्या कामात माझी मदत हवी होती. म्हणून त्याने मला बोलावले. त्याची मदत करीत असतांना त्याची मैत्रीण तिथे कोलमडली. झालं काम झाल्यानंतर ह्याने त्या विषयावरून मला अर्धा तासाचे ‘दोस्ती’ या विषयावर व्याख्यान दिले. आणि परवा ‘परी’ची वाहिनी साहेब झाल्या. इति श्री मित्र कृपा. मला एक कळत नाही की नेहमी मला साईड हीरो किंवा खलनायकचा रोल का मिळतो? मी हीरो असलेला चित्रपट कधी येणार कुणास ठाऊक? बहुतेक तो चित्रपट येण्यापर्यंत माझा ‘चिनीकम’ होणार याची शंका वाटते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.